आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुडघ्याची जखम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडघ्याला नेहमीच दुखापत होत असते. थोडे काही घडले की गुडघा फुटतो. गुडघा खूप गुंतागुंतीचा सांधा आहे. याचा अनेक गोष्टींशी संबंध येतो.

अॅनाटॉमी
गुडघा शरीरातील सर्वात मोठा सांधा म्हटला जातो. या सांध्याला सहज मार लागू शकतो. हा सांधा चार गोष्टींपासून बनलेला आहे. हाडे, कार्टिलेज, लिगॅमेंट्स आणि नसा.
हाडे : गुडघा तयार करण्यासाठी तीन हाडे एकत्र मिळालेली असतात. यात जांघेतील हाड, पिंढरीजवळील हाड आणि वाटीचा समावेश आहे.

आर्टिक्युलर कार्टिलेज : जांघ आणि पिंढरीचे हाड जेथे संपते तसेच वाटीच्या मागील बाजूस आर्टिक्युलर कार्टिलेजने झाकलेले असते. यात गुळगुळीत पृष्ठभाग असतो. गुडघा वाकवण्यासाठी याची मदत होते.

मॅनिस्कस : पानाच्या आकाराचे मॅनिस्कस कार्टिलेज जांघेतील हाडे आणि पिंढरीतील हाडाच्या दरम्यान शॉक अॅबसॉर्बचे करण्याचे कार्य करतो. हा कडक रबराप्रमाणे असून सांधा स्थिर ठेवण्यास मदत करतो. ज्या लोकांची गुडघ्यातील कार्टिलेज तुटल्याची तक्रार असते, ते मॅनिस्कसच्या दुखापतीबाबत सांगत असतात.

लिगॅमेंट्स : लिगॅमेंट्सद्वारे हाडे एकमेकांशी जोडलेली असतात. गुडघ्यात चार प्रमुख लिगॅमेंट्स दोरीप्रमाणे काम करतात. हाडे सांभाळण्याचे त्यांचे काम असते. यामुळे गुडघा स्थिर राहतो. चार लिगॅमेंट्स अशा प्रकारचे -
दोन कोलॅटरल लिगॅमेंट्स - ही गुडघ्याच्या आजूबाजूला असतात. लॅटरल कोलॅटरल लिगामेंट्स (एलसीएल)बाहेर असतो. ते गुडघ्याची हालचाल नियंत्रित करतात. त्याचबरोबर काही अघटित होणार असेल, तर त्या गोष्टीपासून रोखतात.
दोन क्रुसिएट लिगॅमेंट्स : हे गुडघ्याच्या आतमध्ये असतात. इंग्रजी अक्षर "X' प्रमाणे एकमेकांवर असतात. इंटेरिअर क्रिसुएट लिगॅमेंटप्रमाणे (एसीएल) याबरोबरच पुढच्या आणि पोस्टेरिअर क्रुसिएट लिगॅमेंट (पीसीएल) खालच्या बाजूला असतो. क्रुसिएट लिगामेंट्स पुढे आणि मागे वाकण्यास मदत करतो.
टेंड्स (नसा) : यांच्या साह्याने मांसपेशी हाडाशी जोडलेल्या असतात. नसांचा एक मोठा गुच्छ दोरीप्रमाणे वाटीला मांसपेशीने जांघेच्या पुढच्या बाजूला जोडलेला असतो. वाटी ते पिंढरीच्या हाडापर्यंत शिरा पसरलेल्या असतात.

गुडघ्यास साध्या जखमा
गुडघ्याला होणा-या जखमांत फ्रॅक्चर, डिसलोकेशन, मुडपणे किंवा लिगॅमेंट्स तुटणे आदींचा समावेश असतो. अनेक दुखापती गुडघ्याबरोबरच संबंधित अन्य ठिकाणी असतात.

फ्रॅक्चर : गुडघ्यात सर्वाधिक फ्रॅक्चर वाटीला होत असते. जांघेतील हाड आणि पिंढरीचे हाड जेथे मिळते, तेथे गुडघ्याचा सांधा तयार होतो. तोसुद्धा तुटू शकतो. बहुतांश फ्रॅक्चर गुडघ्यावर एखादी वस्तू जोरात आदळल्याने होतात. जोरात पडणे किंवा रस्त्यावर अपघात घडल्यानंतर फ्रॅक्चर होते.

डिसलोकेशन : डिसलोकेशन गुडघ्यातील हाडे आपल्या जागेवरून सरकल्यानंतर होते. उदाहरणार्थ, जांघेतील हाड आणि पिंढरीचे हाड सरकते. त्याचबरोबर गुडघ्यातील वाटी आपल्या जागेवरून सरकू शकते. गुडघ्यात काही अघटित कारणानेच डिसलोकेेशन होते. ज्या लोकांचे गुडघे सर्वसाधारण आहेत त्यांच्यामध्ये खूप जोराचा मार लागल्याने किंवा रस्ते अपघातात होऊ शकते.

इंटेरिअर क्रिसुएट लिगॅमेंटमध्ये जखम : अशा प्रकारची जखम साधारणत: खेळताना होते. फुटबॉल, बास्केटबॉल इत्यादी खेळात या लिगॅमेंट्सला दुखापत होते. अनेकदा जोरात पळताना अचानक दिशा बदलली तर किंवा उडी मारली असेल तर लिगॅमेेेंट तुटू शकते. इंटेरिअर क्रिसुएट लिगॅमेंटच्या (एसीएल) तुटण्यामुळे एखाद्या तज्ज्ञाकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे.
पोस्टेरिअर क्रुसिएट लिगामेंटमध्ये जखम : जेव्हा गुडघा मुडपला असेल आणि समोरच्या भागास दुखापत झाली तर पोस्टेरिअर क्रुसिएट लिगॅमेंटला (पीसीएल) मार लागतो. अशा प्रकारचा मार एखाद्या वाहनास टक्कर झाल्यानंतर किंवा खेळताना होते. पीसीएल लिगॅमेंट्स तुटणे म्हणजे किरकोळ तुटणे असे मानले जाते. तो आपोआपही दुरुस्त होऊ शकतो.
कोलॅटरल लिगॅमेंटमध्ये दुखापत : अशा प्रकारची दुखापत गुडघ्यातील हाड मोडल्याने होऊ शकते. अशा प्रकारची दुखापत गुडघ्याला होण्याचे प्रमाण कमी असते.

मॅनिस्कल तुटणे : हे खेळताना मार लागल्याने तुटू शकते. गुडघा वाकल्याने अशी दुखापत होते. हे आर्थरायटिस किंवा वय झाल्यानंतर तुटू शकते. खुर्चीतून उठताना काही गडबड झाल्यास असे होते. वयाेमानानुसार मॅनिस्कल कमकुवत होते.

नसांमध्ये दुखापती : गुडघ्याला जांघेत जोडणारी क्वाॅड्रिसेप्स ताणली जाऊ शकते किंवा तुटू शकते. प्रौढावस्थेत ही शक्यता अधिक असते. या वयात जे खेळतात किंवा उड्या मारतात त्यांना या समस्या जाणवतात. पडल्यानंतर किंवा गुडघ्याला काही मार लागल्याने असे घडू शकते.

उपचार
दुखापतीच्या जागी बर्फ ठेवणे, आराम घेणे, क्रेप बँडेज बांधणे किंवा गुडघा तक्क्यावर ठेवणे आवश्यक ठरते. जर तुम्हाला गुडघ्यात काही आवाज ऐकू येत असेल, खूप ठणक लागली असेल किंवा गुडघा हलवू शकत नाही, गुडघ्यावर सूज आली, तर तत्काळ यावर उपचार करावेत. उशीर करू नये.

शस्त्रक्रियेची गरज कधी
जर गुडघ्यात मॅनिस्कल फाटले असेल तर सर्जरी करणे आवश्यक ठरते. याला होल सर्जरी म्हटले जाते. यात छोट्या उपकरणांचा वापर केला जातो. जर कोलॅटरल लिगॅमेंट्सवर दुखापत झाली असेल तर ओपन सर्जरी करावी लागते. यात रुग्ण काही आठवड्यात हिंडू-फिरू शकतो. नव्या तंत्रज्ञानाने गुडघ्यास झालेल्या दुखापतीचे लवकर निदान होते. खेळाडूंना लगेच उपचार घेऊन मैदानात पुन्हा उतरणे शक्य झाले आहे.

विनाशस्त्रक्रिया उपचार : गुडघ्यास दुखापत झाल्यानंतर शस्त्रक्रिया न करताच दुरुस्त करता येते. डॉक्टर तुम्हाला गुडघा सरळ ठेवण्यास सांगतात. त्याला बांधले जाते. अशी पद्धत तुटलेले हाड किंवा लिगामेंट्सला दुरुस्त करण्यासाठी वापरली जाते.
लेखक हे एमएस, आॅर्थो. असून बाॅम्बेे हॉस्पिटल येथे कार्यरत आहे.