आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलांनी तरी न्यायालयाच्या मर्यादा पाळाव्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायालयाला न्यायाचे मंदिर म्हटले जाते. त्यामुळे येथे शिष्टाचार आणि आदरपूर्वक वर्तणूक महत्त्वाची असते. पण न्यायालयातील लोकांनीच मर्यादांचे पालन न केल्यास यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. गेल्या गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात डिजिटलायझेशनवर चर्चा सुरू असताना एक वकील अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यावर जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळे सर न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांना हस्तक्षेप करावा लागला. या गोंधळाला त्यांनी मासळी बाजाराची उपमा दिली.

एका दृष्टीने पाहिल्यास ही फार मोठी घटना नाही, पण न्यायालय हे सव्वाशे कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असेल तर ही घटना निश्चितच गांभीर्याने घ्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे साहजिकच त्याला जास्त महत्त्व प्राप्त होते. ऑक्टोबरमध्ये वकिलांच्या गैरवर्तणुकीमुळे टी. एस. ठाकूर यांनी त्यांना कोर्टरूमच्या बाहेर जाण्यास सांगितले होते. तीसहजारी कोर्टरूममध्ये एका वाहतूक पोलिसाला झालेली मारहाण किंवा जेएनयू प्रकरणात दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात माध्यम कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले. देशातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या ठिकाणाहून आदेश जारी केले जातात त्याच ठिकाणी वकिलांची अशी अरेरावी पाहता नागरिकांचा न्यायपालिकेवरील विश्वास कितपत टिकून राहील यात शंका आहे.

न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांसाठी ‘न्यायालय अवमान अधिनियम १९७१’ पारित झाला आहे. हा अवमान होण्याचे दोन प्रकार आहेत. दिवाणी आणि गुन्हेगारी. दिवाणीअंतर्गत न्यायाधीशाचा अनादर करणे तसेच न्यायालयातील शांतता भंग करण्याचा समावेश होतो, तर फौजदारीमध्ये न्यायालयाचा निकाल न मानणे वगैरे. गंभीर बाब म्हणजे हे कायदे जाणणारे वकीलच वारंवार कोर्टाचा अवमान करत आहेत. न्यायालयाच्या मर्यादांचे भान राखलेच पाहिजे.
रिजवान अन्सारी, २५,
अॅल्युमनाई, जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...