आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Mulpractice In International Boxing Association, Divya Marathi

आशियाई क्रीडा स्पर्धेला गालबोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सरपटू सरितादेवी हिची कामगिरी उत्कृष्ट होऊनही तिला उपांत्य फेरीत पराभूत करण्याचा पंचांचा निर्णय ही घटना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये नवी नाही. पण खेद यासाठी वाटतो की, असे वादग्रस्त निर्णय घेतले जाऊ नये याची खबरदारी व पारदर्शीपणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने अजूनही आपल्या कारभारात आणलेला नाही. सरितादेवीचा द. कोरियाची बॉक्सरपटू जिना पार्क हिच्याविरोधातील चारही फे-यांतील खेळ इतका उत्कृष्ट होता की अन्य देशांच्या काय, पण द. कोरियाच्या प्रेक्षकांनाही या निर्णयामुळे धक्का बसला.
जिना पार्कला चारही फे-यांत सरितादेवीने इतके ठोसे मारले होते की, जिनाच्या नाकातून रक्त ओघळत होते. प्रत्येक फेरीत सरितादेवीच्या जोरदार ठोशांमुळे तिला दो-यांचा आधार घ्यावा लागत होता. तिची अवस्था पाहून सामना थांबवण्याची गरज होती, पण पंचांनी तसे न करता अनपेक्षितपणे चौथ्या फेरीअखेर सरितादेवीलाच पराभूत म्हणून घोषित करून उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का दिला. हा धक्का, ही अखिलाडूवृत्ती सरितादेवीसह प्रेक्षकांना अनपेक्षित होती. त्यामुळेच नाराज प्रेक्षकांना पंचांच्या निर्णयाची हुर्यो उडवावी लागली. अशाच एका निर्णयाचा फटका तुग्जसोग्त सँगमायोंग हाम या मंगोलियन बॉक्सरपटूलाही बसला. त्याच्याविरोधातही द. कोरियाचा बॉक्सरपटू होता. या खेळाडूला फायदा व्हावा म्हणून पंचांनी आपली खिलाडूवृत्तीही वेशीवर टांगली होती. त्यामुळे चिडलेल्या मंगोलियन प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या व कागदाचे बोळे फेकण्यास सुरुवात केली. सँगमायोंग हामही पंचांच्या निर्णयानंतर पाच मिनिटे रिंगच्या बाहेर पडला नव्हता.
मंगोलियन बॉक्सर पथकाने वादग्रस्त निर्णय बदलावा म्हणून दबावही आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या पदरी निराशा आली. बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमानुसार पंचांविरोधात कोणतेही अपील करता येत नाही. आक्षेप नोंदवायचा असेल तर तो रेफ्रींच्या विरोधात नोंदवता येतो. सरितादेवी असो व सँगमायोंग हाम, या दोघांच्या विरोधात पंचांनी दिलेला निर्णय आशियाई क्रीडा स्पर्धेला गालबोट आहे.