आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयाॅर्क टाइम्समधून : पाकच्या भूमिकेवर सौदी अरेबियासुद्धा साशंक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबिया आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांवरून पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या भूमिकेवर ना सौदी अरेबियाचा, ना इराणचा विश्वास आहे. पाकिस्तान इराणमध्ये आपले हित पाहतो आहे, उलट काही काळापूर्वी सौदी अरेबियाशी त्याची घनिष्ठ मैत्री होती. सौदी अरेबियावर कोणी हल्ला केला तर सर्वात आधी पाक त्याच्या रक्षणासाठी धावून जाईल, असे अमेरिकेलाही वाटत होते. हा भरवसा मात्र पाकने गमावला आहे. सौदी अरेबियाचे संरक्षण करण्याचे आश्वासन पाक संसदेने दिले होते. त्याच संसदेने आता घूमजाव केले आहे. येमेनच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पाक सौदी अरेबियास कसलीही मदत करणार नाही, असा ठरावच मंजूर केला आहे. यामुळे येमेनच्या विरोधात पाकचे लष्कर सौदी अरेबियास कोणतीही मदत करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत सौदी अरेबिया एकाकी पडला आहे.
पाकिस्तानच्या संसदेने साैदी अरेबियाच्या भरवशावर पाणी फेरले आहे. यावरून कोणत्याही देशासाठी ही धक्कादायक व अकल्पित बाब ठरते. पाकिस्तानमधील नेते काही कोटी डॉलरच्या बदल्यात त्यांच्याशी मैत्रीचे संंबंध धुडकावून लावू शकतात, याचे सौदी अरेबियास अाश्चर्य वाटते अाहे. पाकिस्तानने स्पष्ट शब्दांत काही सांगितले नसले तरी सौदी अरेबियास कोणतीही मदत करणार नाही, असा स्पष्ट संदेश पाक संसदेने दिला आहे. एका गोष्टीचा इथे उल्लेख करावा वाटतो की, पाकिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर हाकलून लावण्यात आलेल्या नेत्यांना सौदी अरेबियाने आश्रय दिलेला आहे. त्यात नवाझ शरीफ यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. त्यांना परवेझ मुशर्रफ यांनीच देश सोडून जाण्यास प्रवृत्त केले होते. सद्य:स्थिती नवाझ यांच्यासाठी खूप कठीण झाली आहे. तेच नवाझ शरीफ आता सौदी अरेबियाला आपण सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचा खोटा दिलासा देत आहेत. याउलट परिस्थिती पाकिस्तानात असून तेच तालिबानी दहशतवाद्यांशी लढा देत आहेत. त्यामुळे आपल्या देशाने कोणा बाहेरच्या प्रकरणात लक्ष देऊ नये, असे तेथील लोकांना वाटते. विशेषत: ज्या शत्रूचे नाव प्रथमच ऐकले आहे, अशा शत्रूच्या विरोधात तर लक्ष देऊ नये, असे त्यांना वाटते. या शत्रूला इराणकडून समर्थन मिळत असेल तर ती मोठ्या जोखमीची बाब आहे, असे वाटते. इराणबरोबर संबंध बिघडू देण्यास ते तयार नाहीत.

पाकिस्तानी संसदेच्या ठरावामुळे सौदी अरेबियास मोठा धक्का बसला आहे. त्यांचे परराष्ट्रमंत्री अन्वर गार्गश यांनी पाक संसदेचा हा निर्णय धोकादायक आणि अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. खाडीतील आपल्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून इराणच्या हितसंबंधांचे रक्षण करत अाहे, असेही त्यांनी म्हटले. हा सौदीच्या अस्तित्वाचा प्रश्न असून त्याची किंमत पाकला चुकवावी लागणार आहे. सौदी अरेबियाची नाराजी उघड होताच पाक बचावाच्या स्थितीत असून त्यांच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, एका मित्र राष्ट्राकडून असे धमकीवजा शब्दप्रयोग अमान्य आहेत. याउलट नवाझ शरीफ सौदी राज्यकर्त्यांची मनधरणी करत आहेत. कारण, सत्तांतरानंतर सौदी राज्यकर्त्यांनी आपणास आश्रय दिला होता, ते दिवस शरीफ विसरलेले नाहीत.
लाखो पाक नागरिक खाडीत काम करत आहेत, हे कटू सत्य आहे. त्या सर्वांना सौदी अरेबियाने परत पाठवले तर पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती खूप दयनीय होईल. शिवाय अनेक पाक नेत्यांनी आणि जनरल्सनी या खाडीत मोठी गुंतवणूक करून ठेवली आहे. इस्लामी कट्टरतावादास प्रोत्साहन देण्यात जे आघाडीवर आहेत, अशा अनेक नेत्यांचा यात समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी सौदीच्या शाही पाहुण्यांना तसेच श्रीमंत वर्गास पाकमध्ये शाही सेवा-सुविधा देण्यात येत होत्या. त्यांना तेथे शिकारीची तसेच शासकीय नियमांची पायमल्ली करण्याची मूक संमती होती. सौदी अरेबियाला पुढाकारांसाठी उचकवण्यात पाक सरकारमध्ये असलेल्यांचाच भरणा अधिक आहे. सौदी अरेबियाच्या समर्थनार्थ येमेनमध्ये आपले लष्करी जहाज पाठवण्यास तयार असल्याचे पाक लष्कराने गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले होते. तसे झाले तर नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पाक संसदेच्या निर्णयामुळे सौदी अरेबियात चिंतेचे वातावरण आहे. कारण पाक अमेरिकेच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्याने इराणला अणवस्त्रबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यास राजी केले आहे. या संमती कराराच्या आडून अमेरिका आणि इराण जवळ येत चालले आहेत का? अशी जुनीच भीती सौदीला सतावते आहे. जेव्हा अमेरिकेला तो आपला सहकारी देश मानतो. सौदी अरेबियाचे माजी गुप्तहेरप्रमुख प्रिन्स तुर्की अल-फैजल यांनी इराणला "कागदी वाघ' म्हटले आहे. विकिलिक्सनेही खुलासा केला आहे की, सौदी अरेबियाचे माजी राज्यकर्ते किंग अब्दुल्ला यांनी अमेरिकेस सांगितले होते, इराणवर हल्ला करून त्यांनी या सापाचे तोंड ठेचले पाहिजे. आता परिस्थिती बदलत असून पाकने येमेनविरोधात सौदी अरेबियास मदत करण्याच्या मुद्द्यावर गुपचिळी साधली आहे. त्यामुळे सौदी अरेबियास आपल्या मित्राच्या भूमिकेवर संशय येतो आहे. पाकने सौदीकडे दुर्लक्ष केले तर तो आण्विक चाचणीसाठी अन्य मार्गाचा अवलंब करेल. तसेच दक्षिण कोरियाकडून दोन अणुभट्ट्या बनवण्यावर सहमती करार केला आहे. येत्या २० वर्षांत १६ अणुभट्ट्या बनवण्याची त्यांची तयारी आहे. २०२२ पर्यंत त्यांची पहिली अणुभट्टी तयार होईल.
बातम्या आणखी आहेत...