आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Retirment Planning By Manikaran Singhal

निवृत्तीनंतर काय असायला हवी डिस्ट्रिब्यूशन स्ट्रॅटेजी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक उद्दिष्ट समजून घेतो त्याचप्रमाणे आम्हाला डिस्ट्रिब्यूशन स्ट्रॅटेजीवरही काम करायला हवे. कारण हा वैयक्तिक फायनान्सचा सर्वात महत्त्वाचा भाग समजला जातो. तेजी-मंदीमुळे फारसा परिणाम होणार नाही असा शेअर फंड, योग्य वेळी योग्य पैसा आपल्या हातात यावा, तुम्हाला अधिकचा कर भरावा लागू नये व वाढ होत राहावी. हेच काम डिस्ट्रिब्यूशन स्ट्रॅटेजीमध्ये केले जाते. जेथे पैशाची गरज सतत भासते तेथे हे धोरण लागू होते. पहिले मुलांचे शिक्षण आणि निवृत्तीनंतरचे जीवन जगणे या दोन प्रमुख गोष्टी असतात. यासाठीच डिस्ट्रिब्यूशन स्ट्रॅटेजीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

५८ वर्षीय सुरेश याच वर्षी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर आपल्याला ३० लाख रुपये मिळतील, अशी त्यांना आशा आहे. यात ईपीएफ, जीपीएफ, ग्रॅच्युइटी आणि सुट्यांच्या पैशाचा समावेश आहे. त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओनुसार काही मुदतठेवी, एलआयसी पाॅलिसी आणि काही म्युच्युअल फंड आहेत. ते पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करीत असल्याने त्यांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक केलेली नाही. निवृत्तीनंतर २५ हजार रुपये दरमहा खर्च होतील असा त्यांचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत मासिक पेन्शन पुरेशी ठरणार नाही. कुठे गुंतवणूक केली म्हणजे आपल्या मासिक पेन्शनमध्ये अधिक वाढ होईल, असे त्यांना सल्लागाराला विचारायचे आहे. वाढत्या महागाईशी तोंडमिळवणी करता येईल अशा प्रकारची स्ट्रॅटेजी त्यांना हवी आहे.

आर्थिक धोरण आखताना आपल्या मूळ गरजांवर सर्वप्रथम लक्ष द्या. नंतर कर आणि महागाईकडे लक्ष द्या. पैसा सुरिक्षत राहावा म्हणून बँकेत एफडी करून ठेवल्याने टॅक्स आणि महागाईवर मात करू शकणार नाही. म्युच्युअल फंड दुसरा पर्याय आहे, परंतु तेजी आणि मंदीचा परिणाम यावरही होतोच. याव्यतिरिक्त कमी कालावधीसाठी मुदत ठेव कराइतकीच बसते. इक्विटी आणि डेब्टचा योग्य ताळमेळ असलेले धोरण तुम्हाला तयार करायचे आहे. सुरेशची गरज चांगल्या धोरणाची आहे. यासाठी बकेटिंग स्ट्रॅटेजी काम करू शकते. बकेटिंगमध्ये केल्या जाणा-या गुंतवणुकीला वेगवेगळ्या भागात विभाजित केले जाते. प्रत्येक बकेटमध्ये निरनिराळ्या गुंतवणूकदारांचा पैसा ठेवण्यात येतो. ही स्टॅटेजी सर्व निवृत्त खातेधारकांसाठी लागू करता येऊ शकते.

गुंतवणूकदाराला सर्वप्रथम भासणा-या गरजेसाठी पहिली बकेट ठेवण्यात यावी. तीव्र गतीने घट वा वाढ होत नाही, अशा क्षेत्रात हा पैसा गुंतवावा. अशा स्थितीत आपण मुदत ठेव आणि पोस्टाच्या योजना निवडू शकतो. या बकेटमधून होणारे उत्पन्न पेन्शनइतके मानले जाते. ही रक्कम पेन्शनला पूरकही असू शकते. पेन्शननंतरही सुरेश यांना दरमहा १० हजारांची गरज आहे. यासाठी ते मासिक व्याज मिळणा-या मुदत ठेवीची निवड करू शकतात. आठ टक्के व्याजदर असणा-या मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकतात. ते १५ लाख रुपयांपर्यंत मुदत ठेव ठेवू शकतात. यात त्यांना १.२० लाख रुपये वार्षिक व्याज मिळू शकेल.

आपल्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरेश यांनी दुस-या बकेटमध्ये गुंतवणूक करावी. निवृत्तिवेतनातील दहा टक्के पैसा यात लावला जाऊ शकतो. कोणत्याही संकटात उपयोगी पडावा म्हणून हा पैसा वेगळा काढून ठेवावा. सुरेश यांच्या प्रकरणात १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करपात्र राहील. यामुळे १२ लाख ५० हजार रुपये बँकेत मुदत ठेवीत गुंतवून ८० सी कलमाखाली व्याजातून मिळणा-या उत्पन्नात ते करातून सूट मिळवू शकतात. अशा प्रकारे त्यांचे करपात्र उत्पन्न बँकेचे व्याज आणि मासिक पेन्शनच्या रूपात पूर्णपणे करमुक्त असेल आणि जे पैसे शिल्लक राहतील ते वाचतील.

बकेट २ चा अर्थ असा, बकेट १ भरणे. जेव्हा गरज भासेल तेव्हा तुमचे मासिक उत्पन्न आणखी प्रभावी पद्धतीने वाढत राहील. या बकेटमध्ये गुंतवणूकदारास मध्यम मुदती डेट किंवा डेट आेरिएंटेड हायब्रीड म्युच्युअल फंडात जायला हवे. जसे मासिक उत्पन्नाचे प्लॅन्स किंवा कन्झर्व्हेटिव्ह अॅसेट अलोकेशन फंड्स इत्यादी असतात. दरमहा पैसे वाढवून मिळत असतील तर सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनचा (एसडब्ल्यूपी) लाभ घेऊ शकता. तरीसुद्धा एसडब्ल्यूपी सर्व युनिट एकदम काढत नाही त्यामुळे कराचा भार जास्त असत नाही. पैसे मिळाल्यानंतर ३ वर्षांनी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन सुरू होत असेल तर भांडवली लाभावर कराचा बोजा पुढे कमी होत जाईल.

बकेट ३ मध्ये पूर्ण पोर्टफोलिओ किंवा गुंतवणुकीला ग्रोथ देण्यासाठी काम केले जाईल. पहिल्या दोन बकेटमध्ये गुंतवणूक कर कमीत कमी ठेवून सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते. परंतु बकेट ३ मध्ये महागाईसह करावरही मात करण्याची व्यवस्था केली जाते. हा पैसा इक्विटी फंड आणि हायब्रीड फंडात लावला जावा. यामुळे शेअर्समध्ये जी तेजी-मंदी असते त्याने फरक पडत नाही. पहिल्या दोन्ही बकेट गुंतवणूकदारांच्या मध्यम मुदतीची गरज पूर्ण करू शकतात. बकेट ३ मुळे होणा-या डिव्हिडंडचे उत्पन्न बकेट १ मध्ये पुन्हा पैसा लावण्यासाठी वापरात आणू शकता. एखादी इक्विटी कामात येत नसेल तर काही वर्षे त्यास बकेट ३ मध्ये ठेवून चिंता करणे सोडा.

पैशाची वाटणी करण्याचा असा काही लिखित नियम नाही, पण ती आपली गरज ठरवेल. तरीसुद्धा ढोबळ अनुमान असे की, बकेट एकमध्ये ४० टक्के पैसा, बकेट २ मध्ये १० टक्के पैसा अडचणीच्या काळासाठी आणि बकेट ३ मध्ये २० टक्के पैसा ठेवण्यात यावा. निवृत्त झाल्यानंतर मनी मॅनेजमेंट खूप कठीण असते. चुकीच्या जागी पैसे लावले तर संपूर्ण पोर्टफोलिओ विस्कळीत होऊ शकतो. पुष्कळदा निवृत्तीनंतर काही जण आपल्या नातवांसाठी दीर्घमुदती महागड्या गुंतवणुकी करतात. यामुळे पोर्टफोलिओ गुंतागुंतीचा होतो. बकेटिंग ओपन एंडेड लिक्विड प्रॉडक्ट्ससोबत असतील तर पोर्टफोलिओ खूप योग्य असतो.
लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत सल्लागार, सदस्य एफपीजीआय आहेत.