आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sukanya Smruddhi Scheme By Sureshkumar Narula

सुकन्या समृद्धी योजना प्रत्येकासाठी उपयुक्त ठरत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या खूप चर्चा, वादविवाद होत आहेत. या योजनेत मुलींच्या आईवडिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यात दरवर्षी ९.२ टक्के व्याज मिळते. यावर कोणताही कर लावण्यात येत नाही. यामागे मुलींचे शिक्षण आणि तिच्या विवाहाची चिंता हाच उद्देश आहे.
आता ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या आजच्या परिस्थितीत आकर्षकही वाटतात हे खरे. परंतु, त्या सर्वच मातापित्यांसाठी उपयुक्त आहेत, असे नाही. कारण या योजनेत काही त्रुटी आहेत. या त्रुटी व्यावहारिक पातळीवर लक्षात येतात. यासाठी इतका चांगला व्याजदर असूनही यात जास्त लाभ मिळू शकत नाही.

योजनेनुसार कोणत्याही मुलीचे खाते पालक उघडू शकतात. मुलगी जन्मल्यानंतर किंवा १० वर्षे वयापर्यंत खाते उघडता येते. हे खाते १००० रुपयांपासून सुरू करता येते. यात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये दर वर्षास भरताही येतात. या खात्याची सुरुवात झाल्यानंतर १४ वर्षे
मुदतीपर्यंतच रक्कम जमा करता येते. यातील अर्धी रक्कम मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच काढता येते. जेव्हा ती २१ वर्षांची होईल तेव्हा खात्याची मुदत संपते. पीपीएफप्रमाणेच यात ८० सी अंतर्गत कोणतीही करकपात करता येत नाही. खाते मॅच्युअर झाल्यानंतरही कोणताही कर वसूल करता येत नाही.

अन्य लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा या स्कीममध्ये रक्कम गुंतवण्याबद्दल विचार करू शकता. कारण ही योजना मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते; परंतु या योजनेत रक्कम गुंतवण्यापूर्वी तुम्ही यातील अडथळे जाण्ून घेणे गरजेचे आहे.

यात व्याजदर फिक्स नाही
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी ९.२ टक्के व्याज मिळते; परंतु हा व्याजदर संपूर्ण कालावधीसाठी नाही. भविष्यात हाच व्याजदर मिळेल याची खात्री देता येत नाही. दरवर्षी यात व्याजदर बदलत जातो. पीपीएफमध्ये जसा व्याजदर असतो तसे त्या त्या वर्षीच्या प्रचलनानुसार व्याज मिळेल. यात व्याजदर १२ टक्के इतकाही होता. आता ८.७० टक्के इतका असेल. येत्या काही काळात तो आणखी कमी होण्याची शक्यता अाहे. यामुळे सुकन्या समृद्धी योजनेत दीर्घ कालावधीत काय होईल हे सांगता येत नाही. सध्याचा व्याजदरसुद्धा लोकांना पसंत पडेल. हीच या योजनेत त्रुटी आहे.

लॉक इन अवधी जास्त
सुकन्या समृद्धी योजना (एसएसएस) मध्ये लॉकइन कालावधी २१ वर्षांचा आहे, तर पीपीएफमध्ये तो १५ वर्षांचा आहे. यामुळे याला अल्पावधीची गुंतवणूक मानता येत नाही. त्याचबरोबर तुम्हाला दरवर्षी एक हजार रुपये इतकी रक्कम कमीत कमी भरावीच लागेल. अन्यथा ५० रुपये दंड आकारला जातो.

रक्कम अडकून पडते
अशा प्रकारची गुंतवणूक रोख स्वरूपाची मानता येत नाही. यात १५ वर्षांऐवजी २१ वर्षांपर्यंत रक्कम अडकून पडते. कारण मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाहीत. त्याचबरोबर रक्कम अर्धीच काढता येते; परंतु पीपीएफमध्ये ६ वर्षांत रक्कम काढता येते. तथापि, यात काही अटी आहेत. दोन्ही योजनांची तुलना करता, कालावधी पूर्ण होण्याआधी रक्कम भरणे बंद करता येत नाही.

गुंतवणूक मर्यादा आणि अवधी
या योजनेत २१ वर्षांची मुदत आहे. यात पूर्ण कालावधीपर्यंत पैसे गुंतवण्याची गरज नाही. तुम्हाला १४ वर्षेच रक्कम भरावी लागणार आहे. तुम्हाला जास्त कालावधीसाठी रक्कम भरावयाची इच्छा असूनही रक्कम भरता येत नाही. तथापि, पीपीएफमध्ये १५ वर्षे रक्कम जमा करता येते. काही एचएन1 पालक जास्तीचे पैसे भरू शकतात; परंतु यात गुंतवणुकीची मर्यादा दीड लाखापर्यंतच आहे.

ही योजना फायदेशीर आहे का?
याची सर्व वैशिष्ट्ये पाहता या योजनेत पैसे गुंतवणार असाल तर मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी तुम्ही वेळेवर पैशांची व्यवस्था करू शकणार नाही. जर एखादा पालक १.५० लाख रुपये दरवर्षी जमा करत असेल तर मुलगी १० वर्षांची असताना खाते सुरू झाले तर ती १८ वर्षांची होईल तेव्हा १८.२० लाख रुपये होतील. या वेळी तुम्हाला तिच्या शिक्षणासाठी पैसे लागत असल्यास फक्त अर्धी रक्कम काढू शकाल. मुलगी ५ वर्षे वयाची असताना योजनेत पैसे गुंतवण्यास सुरुवात केल्यास तिच्या १८ व्या वर्षी ३८.१० लाख रुपये मिळतील. यातील अर्धी रक्कम काढता येते. या वेळी तुम्हाला लग्नाऐवजी तिच्या शिक्षणाकडेच जास्तीचे लक्ष द्यावे लागणार आहे.

दीर्घकाळ थांबलात तरच गुंतवणूक
जर तुम्हाला वाटते की, मुलींच्या शिक्षणासाठी या योजनेत पैसे लावाल तर ते उत्तम प्रॉडक्ट मानले जात नाही. यासाठी ही योजना मुलगी स्वयंपूर्ण होण्यासाठी असून तुम्हाला कोणती अडचण भासू नये. जर तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर मुलींचे उच्च शिक्षण आणि विवाहासाठी तुमच्याकडे अवधी असेल तर इक्विटीमध्ये रक्कम गुंतवणे चांगले. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मध्ये गुंतवणूक करा. इक्विटी अाधारित म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा. यात तुम्हाला महागाईचा सामना करण्याचे सामर्थ्य येईल. गुंतवणुकीचा विचार करताना भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घ्यावी.
लेखक या सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.