आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अाणि इंटरनेटपासून दूर जात आहेत अमेरिकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाॅस एंजलिसमधील डॅनियल आणि त्यांचे कुटुंब दर आठवड्याला कुठेतरी सहलीला जाते. इतर दिवशी त्यांची मुले नेहमी टीव्हीसमोर बसलेली असतात. आॅफिसमधून घरी आल्यावर डॅनियलही रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत. ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सध्या डॅनियल आणि त्यांची मुले काही वेळच टीव्ही पाहतात. त्यांच्या सवयीतील हा बदल तर चांगला आहे, परंतु अमेरिकेतील लाखो कुटुंबांत सध्या हेच चित्र आहे. केबल टीव्ही आणि इंटरनेटविषयी अनास्था वाढली आहे. उत्तम सुविधांचा अभाव हे याचे कारण आहे. केबल जोडणीत नेहमी उत्तम सेवा मिळत नसल्याने अनेकदा कनेक्शन तुटते. त्यामुळे लोकांची चिडचिड वाढली आहे. इंटरनेटचीही हीच अवस्था आहे. बहुतांश घरांत केबलद्वारे इंटरनेट कनेक्शन देण्यात आले आहे. दिलेल्या हमीनुसार इंटरनेटला स्पीड न मिळणे आणि त्यात वारंवार अडथळे येत असल्याने लोक कनेक्शन काढत आहेत. इंटरनेट आणि केबल कनेक्शन काढणाऱ्यांच्या संख्येत या वर्षी वाढ झाली आहे.

अमेरिकी कन्झ्युमर सॅटिसफॅक्शन इंडेक्सच्या अहवालानुसार, लोक या सुविधांवर नाराज आहेत, हे स्पष्ट झाले आहे. सेवा देणाऱ्यांविषयीची नाराजी मागील वर्षापेक्षा खूपच वाढली आहे. इंडेक्समध्ये ४३ सेवा क्षेत्रांचा समावेश आहे. यात सर्वात शेवटची क्रमवारी इंटरनेट, केबल टीव्ही व फोनची आहे. गेल्या तीन वर्षांत केबल टीव्ही आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे टेकओव्हर करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी चार्टर कम्युनिकेशनने टाइम वाॅर्नर केबल व ब्राइट हाऊस नेटवर्क या कंपन्या टेकओव्हर केल्या. हा सौदा ४१६० कोटींमध्ये झाला. इंटरनेट आणि टीव्ही बऱ्याच काळापासून खालच्या क्रमांकावर होते, परंतु या वर्षी त्यांची आणखी घसरण झाली, असे कन्झ्युमर सॅटिसफॅक्शन इंडेक्सचे संचालक डेव्हिड व्हॅनएम्बर्ग यांनी सांगितले. त्यांनी ४३ सेवा क्षेत्रांचे सर्वेक्षण केले, ज्यात १४ हजार ग्राहकांनी मत व्यक्त केले. यात ० ते १०० रेटिंग द्यायची होती. केबल टीव्ही सेवेत टाइम वाॅर्नर नेटवर्कचे गुणांकन ५१ होते, त्यात ९ टक्के घसरण झाली आहे. ३०० पेक्षा अधिक कंपन्यांच्या रेटिंगमध्ये मीडियाकाॅम कम्युनिकेशनचा क्रम सर्वात खालचा आहे. तथापि, इंटरनेट सेवा देणाऱ्यांत टाइम वाॅर्नरच्या रेटिंगमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. आता कंपनीचे गुणांकन ५८ आहे, तर काॅमकाॅस्टचे गुणांकन ५६, चार्टर कम्युनिकेशनचे ५७, व्हेरिझोन फियाॅजचे ६८ आणि एटीअँडटी व्ह्युअर्सचे गुणांकन ६९ आहे. डेव्हिड व्हॅनएम्बर्ग यांच्या दृष्टीने हे गुणांकन योग्य नाही. अशा सेवांमध्ये ग्राहकांचे पूर्ण समाधान झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ग्राहक आपला अमूल्य वेळ या सेवा घेण्यासाठी देत असतो.
एका कुटुंबातील बहुतांश सदस्य या सेवेशी जुळलेले असतात, असेही आपण म्हणू शकतो. असे असतानाही केबल टीव्ही आणि इंटरनेट सुविधांविषयीची लोकांची नाराजी वाढत आहे. ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे नेमके तंत्र कंपन्यांकडे नाही. तक्रारी नीट ऐकून न घेणे आणि ग्राहकांशी योग्य तऱ्हेने न बोलण्यामुळे नाराज झालेले ग्राहक कनेक्शन काढून टाकतो. कंपन्यांच्या खालावलेल्या दर्जामुळे हे सेवा क्षेत्र दहा वर्षांनी मागे गेले आहे. सेवेतील त्रुटींमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांनी आधीपासून तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींचे निराकरण अजूनही झालेले नाही, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामुळेही लोक निराश होतात तरीसुद्धा कंपन्या आपल्या सेवेच्या दरात सातत्याने वाढ करीत आहेत. अशात चांगली सेवा न मिळताही भरमसाट बिल येत असेल तर काेणीही नाराजी व्यक्त करील. ज्या सेवेसाठी ग्राहक पैसे मोजत आहेत त्याची जबाबदारी स्वीकारून कंपनीने सेवेचा दर्जा सुधारला पाहिजे. कंपन्या दरमहिन्याला घरी बिले पाठवतात. ते आपण का भरतो, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. कारण बिल भरल्यावरही तितकी दर्जेदार सेवा त्याला मिळत नाही.© The New York Times