आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Various Ideology Of Hyderabad Freedom Struggle, Divya Marathi

मराठवाडा मुक्तिलढ्यातील वैचारिक धारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुळात मराठवाडा मुक्तलिढा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हताच, त्यामुळे त्यात अनेक मुस्लिमही सहभागी होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर निझामाचे अत्याचार रझाकारांच्या रूपाने वाढत होते. भारत सरकारच्या पातळीवर प्रश्न सुटत नव्हता, या पेचात सर्वच जण होते. हा १५ ऑगस्ट १९४७ ते १७ सप्टेंबर १९४८ दरम्यानचा काळ. सशस्त्र लढा, पोलिस अॅक्शन आणि हा शेवटचा टप्पा होता.
तत्पूर्वी, स्वातंत्र्यलढ्यात सर्वच जाती-धर्मांसह विविध िवचारसरणींचे लोक होते. सगळ्यांचे उद्दिष्ट मात्र निझाम संस्थानातून स्वतंत्र होणे हेच होते. ढोबळमानाने प्रादेिशक-िजल्हा-तालुका व भाषावार गट तर होतेच; मात्र मराठवाडा मुक्तलिढ्यात भारतीय स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे मवाळ व जहाल असे गट होते. यािशवाय कम्युनिस्टांचे दोन गट, समाजवादी गट...
पोलिस अॅक्शनच्या काळात या सर्व गटांचे स्वतंत्र कॅम्प होते. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांच्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा व महात्मा गांधीजींचा प्रभाव होता. ते हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष होते. अत्यंत संयमित असे नेतृत्व होते.

मवाळ गटात रामाचारी, काशीनाथ वैद्य, हरिश्चंद्र हेडा, बी. रामकिशनराव (नंतर हे स्वतंत्र हैदराबाद राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी ते हैदराबाद संस्थानातील निझामाच्या मंित्रमंडळातही होते) अशी अनेक नावे घेता येतील. यांचे उिद्दष्ट शांततेच्या-सनदशीर मार्गाने सत्याग्रह, असहकार आंदोलन करून निझामाला नमवावे, स्वातंत्र्य िमळवावे, असे होते. महात्मा गांधीजींच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. सशस्त्र लढ्याला-रक्तपाताला त्यांचा िवरोध होता. या लढ्यातील लोकांना ते कम्युनिस्ट समजत असत. त्यांच्या िवरोधात भारत सरकारशी ते पत्रव्यवहार करत असत. म. गांधीजींशीही त्यांची सल्लामसलत चाले. जहाल गटात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, द‍िगंबरराव बिंदू (बी. रामकिशनराव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते), भाऊसाहेब वैशंपायन, सिराजउल हसन तिरमिजी स्वामीजींबरोबर होते), हबिबुद्दीन, इफ्तेकार हुसेन आदी अनेक नावे घेता येतील. यातही काही गट होते. त्यातील गोिवंदभाई श्रॉफ यांच्या गटात मग औरंगाबाद वा प्रामुख्याने मराठवाड्यातील कार्यकर्ते होते. उदा. अनंतराव भालेराव, पी. व्ही. नरसिंह राव (नंतर भारताचे पंतप्रधान झाले), ज. रा. बर्दापूरकर, मेढेकर आदी असंख्य नावे घेता येतील.
यामध्ये कम्युनिस्टांचा एक गट होता. सरंजामशाहीचा अंत करणे, वतनदारी-जमीनदारी नष्ट करणे हा त्यांचा प्रमुख अजंेडा होता. अर्थात, लढ्याला वैचारिक नेतृत्व पद्मभूषण गोिवंदभाई श्रॉफ यांचेच होते. ते मार्क्सवादी होते. मात्र, कम्युनिस्टांमधील दोन गटांच्या दुफळीने हैदराबाद लढ्याचे आंशिक नुकसान झालेच. दुसऱ्या कम्युनिस्ट गटात काॅ. व्ही. डी. देशपांडे, नारायण रेड्डी व सीमावर्ती मराठवाडा-आंध्र-हैदराबाद, कर्नाटकातील नेते-कार्यकर्ती मंडळी होती. या वादाचा फटका असा बसला की, तेलंगणातील भोंगीरमधून उभे रािहलेले गोविंदभाई श्रॉफ यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. तत्कालीन काहीसा वेगळा वा समाजवादी िवचारांचा गटही अिस्तत्वात होताच. त्यात महादेवसिंग आणि बिडप असे नेते होते. त्यांचा पोलिस अॅक्शनच्या वेळी निझाम व रझाकारांंविरुद्ध लढण्यासाठी वेगळा कॅम्प होताच (या सर्वच कॅम्पमधील सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक भारतीय लष्कराला पोलिस अॅक्शनच्या वेळी मदत करत होते.) मात्र एक गोष्ट होती. जसजसे निझामाचे रझाकारांच्या माध्यमातून संस्थानातील जनतेवर अत्याचार वाढू लागले, तसतसे सर्व गट गळून पडले. हैदराबाद संस्थानातून मुक्त होण्यासाठी स्वतंत्र होऊन स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी लढा देऊ लागले. हे अत्याचार इतके वाढले की त्यातच हैदराबाद स्टेट काँग्रेसला बंदी घातल्याने आणि कायदे मंडळातही आवाज उठवता येत नसे, तेव्हा निझाम व रझाकारी अत्याचारास प्राणांची पर्वा न करता िवरोध करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांना निझामाने गुलबर्ग्याच्या (तत्कालीन हैदराबाद कर्नाटक) जेलमध्ये टाकले. ितथे जेलर असलेल्या महंमद हुसेन यांनी स्वामीजींना चांगली वागणूक दलिी, खूप मदत केली. जनतेचा प्रक्षोभ वाढल्याने स्वामीजींना हैदराबादच्या चंचलगुडा जेलमध्ये आणण्यात आले. िब्रटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना संस्थानांनाही स्वतंत्रता िदली होती. त्यांना भारत वा पािकस्तानात सामील होणे वा स्वतंत्र राहणे हा पर्याय होता. एक वर्षापर्यंतची ही करारवजा मुदत होती. अर्थात, मोठ्या संस्थानिकांचा स्वतंत्र राहण्याकडे कल होता. यात काश्मीर, जुनागड आणि हैदराबादचा निझाम होते. निझामाला लोकशाही मान्यच नव्हती. पािकस्तानशी त्यांचे संधान होते. निझामाला राजेशाही हवी होती. त्याला खलिफाच व्हायचे होते. कालापव्यय करून आपली लष्करी तयारी निझाम करत होता. याचा सुगावा सरदार वल्लभभाई पटेलांनाही लागला होता. त्यांची त्या दृष्टीने पावले पडत होती. निझाम लवकर निर्णय घेईना आणि एक वर्षभर युनो व िब्रटिशांच्या करारामुळे भारताला काही अॅक्शन घेता येईना. चर्चेचे गुऱ्हाळ चालूच होते. दरम्यानच्या काळात जहाल गटाचे नेते िदगंबरराव िबंदू महात्मा गांधीजींना भेटले. ते म्हणाले, तुम्ही रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा िदला, भ्याडासारखे पळाला नाहीत हे चांगले केले. मात्र काँग्रेसचे अिहंसात्मक धोरण आहे. उघडपणे सरकार पाठिंबा देऊ शकत नाही. यासाठी माझ्याकडे तोडगा आहे. तुम्ही सरदार पटेलांकडे जा. मग िबंदू सरदार पटेलांचे सचिव व्ही. पी. मेनन यांना भेटायला गेले, ितथे तनख्यांच्या सेटलमेंटसाठी (प्रिव्हिपर्स सेटलमेंट) संस्थानिकांची गर्दी होती. त्यात मेनन साहेबांनी प्रथम िबंदूंना बोलावले, तेव्हा बिंदू म्हणाले, एवढे मोठे संस्थानिक लोक असताना मला प्रथम बोलावलेत? त्यावर मेनन म्हणाले, अरे ते स्वत:च्या तनख्यांसाठी (पगार) आलेत, त्यांना स्वातंत्र्याशी काही देणे- घेणे नाही. तुमचे काम महत्त्वाचे आहे. तुम्ही लोकशाही व स्वातंत्र्यासाठी लढता आहात. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही मराठवाडा मुक्तलिढ्याला पािठंबा होता. पोलिस अॅक्शनचा मार्ग त्यांनी सुचवला होता. त्यांचे प्रतनििधी सुबय्या हेदेखील हैदराबाद सरकारच्या िवरोधात होते (बहुधा ते हैदराबाद स्टेट
काँग्रेसचे सदस्य, प्रतनििधी होते) तत्कालीन निझाम सरकारच्या मंित्रमंडळात काही दलित मंत्रीही होते. उदा. बी. एस. वेंकटराव आणि श्यामसुंदर (डिप्रेस्ड क्लास लीग). त्यांचा वापर निझामाने दलितांना आपल्या बाजून राहावे याकरिता चुचकारण्यासाठी केला होता. हा प्रश्न सामोपचाराने सुटावा, असे नेहरू व लाॅर्ड माउंटबॅटन यांना वाटत होते. िब्रटिश काहीसे पक्षपाती वा निझामाच्या बाजूने असल्यासारखे वागत. निझामाचा सल्लागार सर वाॅल्टर माउंटन हा होता. हा घटनात्मक तज्ज्ञ होता. त्यानुसार माउंटबॅटन योजना तयार झाली. त्यात िहंदू-मुिस्लमांचे मंित्रमंडळातील स्थान ५० - ५० टक्के असावे असे होते. िशवाय रझाकार सैन्य नष्ट करायला नको, नवे नियंत्रणही निझामाकडेच असायला हवे, असे निझामाचे म्हणणे होते. दरम्यान, पुढे नेमकेच १२ सप्टेंबरला बॅ. जनिांचे निधन झाले. इकडे निझाम आणि क्रांतिकारी भारत सरकार पोलिस अॅक्शनची तयारी करत होते. मग प्रश्न असा निर्माण झाला की, कारवाई पुढे ढकलावी का? कारण मु िस्लम समाज चिडेल का, नाराज होईल का? निझामाला हेच हवे होते; मात्र गुप्तपणे भारत सरकारच्या लष्कराची तयारी सुरू होती. लष्कराचे जनरल जयंत चौधरी यांना िवचारणा करण्यात आली की, पोलिस अॅक्शनला िकती िदवस लागतील? त्यांनी ८ िदवस लागतील, असे सांिगतले. नेहरू सामोपचाराने घ्या म्हणत असतानाच सरदार वल्लभभाई पटेलांनी आता सैन्य पुढे गेले आहे, त्यांना आता माघारी बोलवू शकत नाही, असे सांिगतले. वास्तविक तसे झालेले नव्हते. पण लगेच १४ सप्टेंबरला भारतीय लष्कर तीन ते चार बाजूंनी निझाम स्टेटमध्ये (हैदराबाद राज्यात) घुसले. १) मनमाड-वैजापूरमार्गे, २) सोलापूर-उस्मानाबादमार्गे, ३) जालना-बुलडाणा-िहंगोली भागातून. मग मात्र केवळ तीनच िदवसांत निझाम शरण आला. रझाकार आणि स्वातंत्र्यसेनानी-क्रांतिकारी जे गनिमी काव्याने लढले, तेच वाचले. युनोत प्रश्न जाऊ नये म्हणून लष्करी कारवाईला पोलिस अॅक्शन हे नाव देण्यात आले. हैदराबाद शहर व राजमहालांचा भाग ताब्यात घेण्याच्या कारवाईला आॅपरेशन पोलो ग्राउंड हे नाव दलिे, हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच. पुढे निझामाने सामीलनाम्यावर सही केली. सरदार पटेल हैदराबादला आले. या वेळी जयंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. लोकशाहीचा लढा यशस्वी झाला.