आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Vehicle Accident And Laws By Nandita Jha

वाहन दुर्घटना : काय आहे कायदा, भरपाई कशी ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वात प्रथम रस्ते दुर्घटनेशी संबंधित लोक व दुर्घटनेतील मृत व त्यांच्या आश्रितांद्वारे चालक, वाहनमालक तथा विमा कंपनीसंबंधीच्या अधिकारांना समजून घेणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती वा संपत्तीला नुकसान पोहोचवल्यावर जी रक्कम देणे असते, ती भरपाई रक्कम म्हणून म्हटली जाते. नुकसान भरपाईचा दावा तेच करू शकतात. ज्यांना जखम झाली आहे अथवा संपत्ती वा वाहनाचा तो मालक आहे अथवा मग मृताचा नातेवाईक आहे वा त्याचा कायदेशीर प्रतिनिधी आहे. मोटार वाहन अधिनियमाच्या अंतर्गत मोटार दुर्घटना लवादाची (ट्रिब्युनल) व्यवस्था आहे. अधिकांशत: हा लवाद जिल्हा न्यायालयाच्या परिसरातच असतो. यात जिल्हा न्यायाधीश बसतात. नुकसान भरपाईचे अर्ज त्या त्या क्षेत्राधिकारात येणाऱ्या लवादाला संबोधित केले गेले पाहिजे.

रस्ते दुर्घटनेच्या स्थितीत प्रत्येक राज्यात दाव्यासाठी निर्धारित अर्ज (फॉर्म) असतात. हे अर्ज कोर्ट अधिकारी वा स्टॅम्प विकणाऱ्यांकडून नाममात्र शुल्क देऊन तुम्ही प्राप्त करू शकता. अशा अर्जाचे दावेदाराचे नाव-पत्ता, विमा करणाऱ्या कंपनीचे नाव, पत्ता, मृताची माहिती (नाव-पत्ता, वय, व्यवसाय, उत्पन्न) आदींचा उल्लेख असला पाहिजे. दुर्घटना झालेल्या स्थितीतील स्थान, वेळ तथा दुर्घटनेची तारीख, त्या वाहनाचे विवरण, ज्यात पीडित व्यक्ती प्रवास करत होती. या सर्वांची माहिती असली पाहिजे. याचबरोबर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, विमा कंपनीच्या संबंधित कव्हर, दाव्याची रक्कम, दाव्याचे औचित्य तथा मदतीचे विवरणदेखील असायला हवे. लवादाद्वारे निर्धारित भरपाईच्या रकमेचे वाटप आदींची माहितीही द्यायला हवी. वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी रिस्क विमा असणेही आवश्यक असते. लवादाच्या अवॉर्डमधून विमा कंपनीत जेवढ्या रकमेचा विमा केला गेलेला आहे तेवढीच रक्कम देण्यापुरती विमा कंपनी जबाबदार असते.

दुर्घटनेनंतर भरपाईचा अर्ज प्राप्त होण्यावर लवाद दोन्ही पक्षांना आपापली बाजू सांगण्याची संधी देते. त्यानंतर दाव्यासंबंधीची तपासणी कंपनी करते. त्यानंतर हे स्पष्ट करते की भरपाईची रक्कम किती असावी आणि कुणाला किती रकमेचे वाटप होईल. जर कोणी व्यक्ती लवादाद्वारा निर्धारित भरपाई रकमेसंबंधी संतुष्ट नसेल तर निर्णयानंतर ९० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील केले जाऊ शकते.

मोटार वाहन दुर्घटना अधिनियमांतर्गत काही प्रकरणांत नो फॉल्ट (विनाचूक) सिद्धांतावर भरपाई रक्कम निर्धारित केली जाते. कलम १४० च्या तरतुदीनुसार वाहन दुर्घटनेत मृत्यूच्या प्रकरणात ५०,००० रु. तथा नेहमीसाठीचे अपंगत्व आल्याच्या परिस्थितीत २५ हजार रु. देण्यासाठी जबाबदार असेल. जर नो फॉल्टच्या सिद्धांतावर अर्ज केला गेला असेल तर तो यात दावेदाराला मोटारचालकाचा बेजबाबदारपणा वा चूक सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. चुकीच्या नियमावर(सिद्धांतावर) भरपाईच्या दाव्यात भरपाईची रक्कम नो फॉल्टवाल्याच्या रकमेपेक्षा अधिक असेल. हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झाल्यास त्याच्या आश्रितांना २५ हजार रु. तथा गंभीर जखमी झाल्यास १२,५०० रु. इतकी भरपाई मिळते. इथे भरपाई रक्कम सरकारच्या सोलेसियम फंडातून दिली जाते. दिल्लीत एसडीएम हिट अँड रन प्रकरणात दाव्याची कठोर तपासणी करतात.

लवादाद्वारे निर्धारित रक्कम घेण्यासाठी एक प्रमाणपत्र घ्यावे लागते, ज्यात जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित केलेले असते तसेच त्यावर भरपाईची रक्कमही टाकलेली असते.
दुर्घटनेच्या एक महिन्याच्या आत निर्धारित अर्जावर दावेदाराचे आवेदन आले पाहिजे. जर स्थानिक पोलिस प्रथम सूचना अहवालाच्या आधारावर दुर्घटनेची तपासणी करत नसतील, तर आवश्यक कारवाईसाठी डीएसपींना हे अर्ज दिले जाऊ शकतात. ज्यात ज्या भागात दुर्घटना झाली आहे, तेथील न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करू शकता.