आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युपत्र बनवण्याचे नियम कोणते?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यूपूर्वी कोणतीही व्यक्ती आपले मृत्युपत्र तयार करते किंवा तयारही करत नाही. एखाद्या व्यक्तीचे निधन होते, तर त्याने मृत्युपत्र बनवलेच असेल, असेही आवश्यक नाही. जर कोणी आपल्या मृत्युपत्रात लिहिले असेल, तर त्याच्या इच्छेनुसारच संपत्तीची वाटणी व्हावयास हवी. त्याच्या इच्छेनुसारच संपत्तीत हिस्सा मिळेल. एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र तयार केले नसेल अाणि तो जर ख्रिश्चन किंवा पारशी असेल, तर त्याची संपत्ती भारतीय उत्तराधिकाराच्या नियमानुसारच वाटली जाईल. अशा प्रकारे कोणी हिंदू महिला व पुरुषांच्या संपत्तीची बाब असेल आणि मृत्युपत्र लिहिले नसेल तर त्याला हिंदू उत्तराधिकाराच्या कायद्यानुसार वाटणी करण्यात येईल. मुस्लिम असेल तर त्याला मुस्लिम कायद्यानुसार संपत्ती मिळेल. तसे तर प्रत्येक व्यक्तीने आपले मृत्युपत्र तयार करणे कधीही योग्य ठरते. यामध्ये सर्व परिस्थिती स्पष्ट होते. त्याबरोबरच त्याच्या इच्छेनुसारच वाटणी होऊ शकते. कोणीही व्यक्ती आपले मृत्युपत्र आयुष्याच्या कोणत्याही काळात लिहू शकते. मृत्युपत्रात एकदा नव्हे, तर अनेक वेळा बदल करता येतात. तो कधीही रद्दसुद्धा करता येतो.

मृत्युपत्र तयार करण्याच्या पद्धती :
१. ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन योग्य असेल अाणि वयस्कर असेल, म्हणजे तिचे वय १८ पेक्षा जास्त असेल, तर ती स्वत: मृत्युपत्र बनवू शकते.
२. मृत्युपत्र कोणत्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरवर लिहिण्याची गरज नाही.
३. मृत्युपत्र कायदेशीर व तांत्रिक भाषेत लिहिलेले असण्याचीही आवश्यकता नाही. आपल्या संपत्तीचे वाटप कशा प्रकारे केले जावे, अशी इच्छा मृत्युपत्रात त्याने लिहून ठेवलेली असते. मृत्युपत्र लिहिणा-याची इच्छाच सुस्पष्ट असेल, तर त्यात तांत्रिक किंवा कायदेशीर शब्द किंवा व्याकरणाची गरज नाही.
४. कायदेशीर पूर्तता व्हावी म्हणून मृत्युपत्र नोंदणीकृतच असावे असेही नाही, तरीसुद्धा नोंदणीकृत करणे कधीही चांगले.
५. जो मृत्युपत्र लिहिणारा असतो, त्याची स्वाक्षरी त्यावर असणे आवश्यक आहे. यात दोन साक्षीदार हवेत. म्हणजे त्यांच्याही स्वाक्ष-या त्यावर असाव्यात. याचा अर्थ असा की, या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी त्याच व्यक्तीची आहे, त्यानेच हे मृत्युपत्र लिहिले अाहे, असा होतो.
६. एखाद्या संपत्तीच्या बाबतीत एकाहून जास्त वेळा मृत्युपत्र लिहिले गेले असेल आणि मृत्युपत्र लिहिणा-याचे निधन झाले असेल, तर शेवटचे मृत्युपत्र खरे ग्राह्य धरण्यात येते.
७. अशा प्रकारे जर कोणी मृत्युपत्रात एकाहून अधिक वेळा संपत्तीचे विवरण आणि ती दोघांत वाटली गेली असेल तर अंतिम नियम लागू होईल.
८. मृत्युपत्र लिहिणा-याचे शब्द महत्त्वाचे मानले जातात.
९. मृत्युपत्रातील एखादा भाग किंवा काही मजकुरात धोकेबाजी दिसून येत असेल, तर त्याला ते खोटे मृत्युपत्र मानले जाते.
१०. मृत्युपत्रात काही अटी असू शकतात. त्या घटना होवाेत अथवा ना होवोत, त्यावर बरेच काही अवलंबून असते. तरीही एखादी परिस्थिती अवैध किंवा अनैतिक असेल तर ते निष्प्रभावी मानले जाते. एखाद्या परिस्थितीत ते कायद्याच्या किंवा नीतीच्या विरोधात असेल, तर हे मृत्युपत्र अवैध मानले जाते.
११. ज्या व्यक्तीच्या नावे हे मृत्युपत्र लिहिले असेल आणि तिचे लिहिण्यापूर्वीच निधन होत असेल, तर असे मृत्युपत्र निष्प्रभावी मानले जाते. एकाऐवजी दोन नावे लिहावीत, असेही सुचवण्यात येते. उदा. माझ्या मृत्यूनंतर संपत्ती रमेशच्या नावे करावी आणि जर रमेशचे निधन झाले, तर ती संपत्ती दिनेशच्या नावे करण्यात यावी.
१२. मृत्युपत्रात लिहिण्यात आलेल्या गोष्टी बदलल्या गेल्या. उदा. जर मृत्युपत्र लिहिणा-याने कागदपत्रात सोन्याची अंगठी लिहिली असेल आणि त्या अंगठीची चेन केली गेली असेल, तर ते मृत्युपत्र खरे मानले जाणार नाही.
१३. मृत्युपत्रात काही बदल करायचे असतील, म्हणजे काही माहिती जोडायची असल्यास किंवा बदल करायचे असतील तर कोडसील म्हणजे मृत्युपत्र बदलता येते. कोडसीलद्वारे यात कोणाचे नाव जोडू शकतो किंवा काढून घेऊ शकतो. कोडसीलमध्ये त्याच अटी असतात, ज्या मृत्युपत्रात असतात. कोडसीलला ख-या मृत्युपत्राप्रमाणेच मानले जाते.
१४. मृत्युपत्र प्राधिकृत आणि अप्राधिकृत असू शकते. अप्राधिकृत मृत्युपत्र सामान्य माणसाकडून लिहिले जाते, तर प्राधिकृत मृत्युपत्र सैनिक, वायुसेवा किंवा नौसेनेतील अधिकारी युद्धजन्य परिस्थितीत लिहू शकतात.
१५. दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती संयुक्त मृत्युपत्र लिहू शकतात. मृत्युपत्र संयुक्त असेल आणि जर दोघांच्या मृत्यूनंतर ते लागू करायचे असेल तर हे प्रमाणपत्र कोणताही एक सदस्य हयात असेपर्यंत सुपूर्द करता येत नाही. इतकेच नव्हे, तर दोघांपैकी एक सदस्य हे मृत्युपत्र निरस्त करू शकतो.
१६. दोन किंवा त्याहून अधिक लोकांनी परस्पर सहमतीने मृत्युपत्र लिहिले असेल, जसे कोणाकडून उधारी वसूल करायची आहे किंवा कर्जफेड करायची आहे किंवा मालमत्तेची देखभाल करणे आहे, तेव्हा ही कामे एक्झिक्युटर /अॅडमिनिस्ट्रेटर करेल. मृत्युपत्रात एक्झिक्युटरचे नाव नसेल, तर अॅडमिनिस्ट्रेटर कोर्ट नेमू शकते.
१८. प्रोबेट (मृत्युपत्राची प्रमाणित प्रत) हेच मृत्युपत्राचे महत्त्वाचे साक्षीदार असते. प्रोबेटचा अर्ज न्यायालयात करता येतो. एखाद्या नातेवाइकास आक्षेप असेल, तर त्याला आव्हान देता येते. प्रोबेटसंदर्भात स्थानिक वृतपत्रात माहिती देणे आवश्यक असते.
१९. मृत्युपत्र लिहिणा-याचा मृत्यूनंतर मृत्युपत्र एक्झिक्युटर किंवा एखादा वारसदार प्रोबेटची मागणी करू शकतो. न्यायालय अशा प्रकारच्या प्रकरणात वारसदारांना विचारते की, त्यांना या मृत्युपत्राबद्दल काही आक्षेप आहे का? जर कोणाचा आक्षेप नसेल, तर न्यायालय उक्त प्रोबेट त्यांच्या ताब्यात देते. प्रोबेट न्यायालयाकडून प्रमाणित केले जाते. प्रोबेटचा मृत्युपत्रातील खरेपणा सिद्ध करते. यानंतरच मृत्युपत्राची अंमलबजावणी होऊ शकते.