आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्थेत तेजी नाही, मात्र स्थैर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉब रिपोर्टवरून अमेरिकन मतदारांना देशासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी बरीच मदत होते. २००८ मध्ये निवडणुकीच्या वेळी अमेरिकेसह जगभरात मंदी आली होती. मात्र यंदाच्या जॉब रिपोर्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचा दर घसरून फेब्रुवारी २००८ एवढा झाल्याचे आढळून आले आहे.
अर्थव्यवस्थेत अनेक टप्प्यांवर सुधारणा आहे. ताशी मिळणाऱ्या वेतनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २.८ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या सात वर्षातील ही वाढ सर्वाधिक आहे. यावरून अर्थव्यवस्थेत तेजी नसली तरी एवढी भीषण अवस्था नाही, असे कळते. इनडीड या ऑनलाइन जॉब साइटचे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ झेड कोल्को म्हणतात, ऑक्टोबरमध्ये अर्थव्यवस्थेने तीन विक्रम प्रस्थापित केले. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, बेरोजगारी दरात घसरण आणि जुन्या कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामावर परतणे यांचा त्यात समावेश आहे. म्हणजेच कामगार क्षेत्रात निरोगी वातावरण आहे. मंदीनंतर प्रथमच एवढी सुधारणा झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...