आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय लांबवल्याने याहूवर स्वत:ला विकण्याची वेळ आली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीतील अनेक कंपन्यांच्या रोचक अशा कथा आहेत. त्यातील एक कथा याहूची आहे. पण ही कथा म्हणजे अनेक कंपन्यांना इशाराही आहे. १९९४ मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका वसतिगृहात याहूची मुहूर्तमेढ रोवली गेली. डेव्हिड फिलो व जेरी यंग या दोन युवकांनी “जेरी अँड डेव्हिड्स गाइड टू वर्ल्ड वाइड’ या वेबपेजवर एक लिंक प्रसिद्ध केली. पुढे याचे नामकरण ‘याहू’ असे केले गेले. त्यानंतर काही दिवसांतच याहू जगभरातल्या लाखो लोकांचे सर्च इंजिन झाले. २००० मध्ये याहूची लोकप्रियता इतक्या उंचीवर होती की या कंपनीची बाजारातील किंमत १२८ अब्ज डॉलर (आजच्या डॉलरच्या किमतीत ८५७२ अब्ज रुपये) इतकी झाली होती.
गेल्या महिन्यात २५ जुलैला अमेरिकेतील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉनने याहूला ३२१ अब्ज रुपयांमध्ये विकत घेतले. या खरेदीत याहूचा इंटरनेटवरील व्यापार गृहीत धरण्यात आला होता, पण आशियातील या कंपनीकडे असणारे व्यावसायिक पेटंट व त्यांच्या मूल्याचा समावेश नव्हता. ही खरेदी करताना याहूला त्याचे जुने वैभव परत मिळेल, असा दावा व्हेरिझॉनने केलेला नाही हे विशेष. पण याहूच्या खरेदीमुळे व्हेरिझॉनच्या मोबाइल ग्राहकांमध्ये वाढ होऊ शकते. २०१२ मध्ये याहूच्या सीईओपदी मेरिसा मायर यांची नियुक्ती झाली होती. पण त्यांच्या नियुक्तीअगोदर तीन वर्षे याहूने चार सीईओ बदलले होते. म्हणजे एका अर्थी याहूच्या विक्रीची ही बीजे म्हणावयास हरकत नाही.

याहू का विकावी लागली याची तीन प्रमुख कारणे आहेत. एक – या कंपनीला आपले उद्दिष्ट नीट ठेवता आले नाही. स्थापनेपासून या कंपनीला मीडिया किंवा टेक्नॉलॉजी या क्षेत्रावर आपले लक्ष्य केंद्रित करता आले नाही. सर्च कमोडिटी बिझनेसच्या माध्यमात पैसे गुंतवण्याबाबतही या कंपनीचे धोरण स्पष्ट नव्हते. ही संदिग्धता नेमकी गुगलने हेरली व गुगलला त्यांचा मार्ग मिळाला. याहूला सोशल मीडिया व मोबाइल इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराचाही अंदाज आला नाही. मायर व कंपनीच्या बोर्डनेदेखील याहूच्या व्यवसायात सुधारणा घडून याव्यात म्हणून काही पावले उचलली नाहीत.

पहिल्यांदा निश्चित असे उद्दिष्ट नसूनही याहूचा प्रसार वाढत होता. पण २००१ पर्यंत या कंपनीकडे ४०० विविध सेवा व उत्पादने होती. गुगलचे सर्च इंजिन व ई-कॉमर्समधील ईबे या कंपनीच्या आव्हानापुढे याहू फिकी पडत गेली. एक काळ असा होता की, याहूकडे चार वेगवेगळ्या जाहिरातींचा मोठा व्यवसाय होता. सिलिकॉन व्हॅलीतून जग बदलेल असे महत्त्वाकांक्षी सूर येथून निघत होते. पण एका वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे कंपनी मॅनेजरचे जसे मूळ उद्दिष्टांवरून लक्ष कमी होऊ शकते तसे याहूचे झाले.
© 2016 The Economist Newspaper Limited.
All rights reserved.
From The Economist, translated by DB Corp, published under licence. The original article, in English, can be found on www.economist.com
बातम्या आणखी आहेत...