आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • As Soon Words To Express The Power Of Knowledge Lose His Wallet

शब्दांत व्यक्त होताच हरवते ज्ञानाची शक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञान लिपी आणि अक्षरबद्ध होते तेव्हा ते आपली प्रेरणा, आपली शक्ती हरवून बसते. देव धारणावस्थेत आहे तोपर्यंत त्यांचे अस्तित्व वेगळे आहे. प्रतिमा आणि प्रतीकांतून व्यक्त होताच त्यांचा अमर्याद प्रभाव मर्यादित होत जातो.
मनुष्यमात्रात उपलब्ध असलेले महानतम ज्ञान लिहिण्यात आले नाही. भारतीय परंपरेतील सर्वश्रेष्ठ ज्ञान लिखित नव्हे, तर मौखिक आहे. आतील ज्ञानप्रकाशात ऋषी जे बोलले तेच ज्ञान. युगानुयुगे गुरुकुलात त्यांची वचने मुखोद््गत केली गेली. कानामात्रेचीही चूक नसलेल्या मूळ पाठाला पिढ्यान््पिढ्या लक्षात ठेवले गेले. लेखी संहिता नंतर आल्या. कुराण, बायबल व दहा आज्ञाही अशाच पद्धतीने आमच्यापर्यंत आले.

ज्ञान लिपी आणि अक्षरबद्ध होते तेव्हा ते आपली प्रेरणा, आपली शक्ती हरवून बसते. देव धारणावस्थेत आहे तोपर्यंत त्यांचे अस्तित्व वेगळे आहे. प्रतिमा आणि प्रतीकांतून व्यक्त होताच त्यांचा अमर्याद प्रभाव मर्यादित होत जातो. मूर्ती म्हणजे एका अर्थी देवांना देण्यात आलेली लिपी आहे. लेखनात म्हणणे पूर्णपणे मांडलेच जाऊ शकत नाही; परंतु लिहिण्याने ते जास्त सुरक्षित राहील.

ऋग्वेदाची रचना पाच हजार वर्षे जुनी आहे. ऋग्वेदाचा पाठ तयार झाला हा तो कालखंड आहे. मौखिक परंपरेत हा पाठ केव्हापासून भारतीयांच्या स्मृतीत प्रवाहित होत आला, कोणालाच माहीत नाही. लिखित पोथ्या कुठे गेल्या कोणाला माहीत, परंतु वेद स्मृतीत कायम राहिले. त्रावणकोरचे महान चित्रकार राजा रवी वर्मा यांनी सर्वप्रथम भारतीय देवी-देवतांची चित्रे काढली. देवी-देवतांसंदर्भात असलेल्या आमच्या मान्यता आणि समजुतीला त्यांनी रंग-रेषांमधून चित्रित केले. यामुळे भारतीय धार्मिक परंपरेचे भले होण्याऐवजी नुकसान झाले, असे माझे मत आहे. सर्वस्वरूप आणि सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला आम्ही एका रूपात कसे मांडू शकतो? मौखिकता भारतीय परंपरेचा मौलिक भाग आहे. ज्ञानातील महत्त्वाचा भाग सांगितला गेला आहे. शेतीचे कोणते शास्त्र आहे? शिल्पकलेचे कोणते ग्रंथ आहेत? विणकरांचे कोणते धडे आहेत? शिल्पकला तर शतकानुशतके सुरू आहे. याचे कोणतेही व्याकरण नाही. नेहमी ते अचूक मोजमाप करत आले आहेत. स्मृतीत सुरक्षित आहे हे ज्ञान. म्हणून माझे म्हणणे आहे की, कबीराला पुस्तकातून शिकवण्याऐवजी मुलांना कुमार गंधर्वांनी गायलेली त्यांची पदे ऐकवायला हवीत; परंतु आम्ही त्यांनी लिहिलेले शिकवतो. कबीर असते आणि आम्ही त्यांना कवी म्हटले असते, तर ते लाजले असते. मीरेचेही असेच आहे. मीरा अकॅडमिक नाही. तीही तिला कवी म्हटलेले ऐकून लाजली असती. त्यांनी अनुभवलेले काहीसे तसेच आहे. शब्दबद्ध केलेले शक्ती हरवून बसते. शब्द अर्थहीन होतात. मीरेची गाणीच ऐकली पाहिजेत.

आजच्या धार्मिक प्रवचनकारांनाच घ्या. ते काहीही बोलत आहेत. मौखिक परंपरा असताना ते ग्रंथातून पाठ केलेले ज्ञान उगाळत अाहे. ते ज्ञानाऐवजी ग्रंथाचा प्रचार करत आहेत. ज्ञानाची पहिली अट असलेली, समोरच्याला मंत्रमुग्ध करणारी ऊर्जा त्यांच्या म्हणण्यात नाही. थेट आत्म्यात उतरावे असे त्यांच्या म्हणण्यात काही नाही. त्यांचे बोलणे सत्याचा साक्षात्कार नसलेले आहे. म्हणून ऊर्जाहीन आहे. ग्रंथ निर्जीव आहेत म्हणून पुरेसे नाहीत. तेव्हा एका सजीव गुरूचे महत्त्व आहे. तुम्ही त्याच्या जवळ, त्याच्या प्रभावक्षेत्रात येता. त्यांचे हावभाव, त्यांचे शब्द त्यांच्या अनुभवातून आलेले असतात. ते तुमच्या आत्म्याला स्पर्श करतात.
हजारोंच्या गर्दीसमोर संबोधित करणारे धार्मिक प्रवचनकार या अर्थाने धाेकादायक आहेत. ते राजकारण्यांसारखे आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत आहेत. अध्यात्मात स्वानुभवाशिवाय काहीही सांगणे धोकादायक आहे. कारण निष्पाप श्रोते त्यांच्यावर विश्वास ठेवतात. काय होत आहे, रामकथा आणि श्रीमद््भागवताची भव्य आयाेजने होत आहेत. शानदार संगीत वाजत आहे. अनुभव, ऊर्जा आणि प्रभावाच्या सच्च्या ऋषी परंपरेच्या अंगाने मागील शंभर वर्षांत भारतात आध्यात्मिक कथन फक्त ओशोंनी केले आहे. दुर्दैवाने त्यांना समजून घेतले गेले नाही.
डाॅ. कपिल तिवारी
म.प्र. आदिवासी व लोककला अकादमीचे माजी अध्यक्ष