आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग जगत; विविध देशांसाठी आदर्श आर्थिक विकासाचे ऑस्ट्रेलिया मॉडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेट वेब ब्राऊझरचा शोध ज्या वर्षी लागला व पॉपसिंगर ब्रायन अॅडम्स लोकप्रियतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता तेव्हा ऑस्ट्रेलियाला मंदीने घेरले होते. त्यानंतर गेल्या २६ वर्षांत ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था सलगपणे आर्थिक आघाडीवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. या यशाचे कारण उत्तम आर्थिक धोरणांच्या कार्यवाहीत दिसत आहे. याअगोदर नेदरलँडने अशी कामगिरी करून दाखवली होती. पण हा देश आता आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकला आहे. गेल्या दोन तिमाही कालावधीत या देशाच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी खराब होताना दिसली. या २६ वर्षांत ऑस्ट्रेलियाने आशियावर डॉट कॉमच्या रूपाने आलेले आर्थिक अरिष्ट पाहिले. पण या आर्थिक अरिष्टाचा ऑस्ट्रेलियावर त्या वेळी फारसा परिणाम झाला नव्हता. तेथे खाण उद्योगाने वेगवान प्रगती साधली होती. हे ‘मायनिंग बूम’ २०१४ मध्ये संपुष्टात आले. त्यानंतरही या देशाची आर्थिक आघाडीवरील कामगिरी चांगली कशी राहिली हे जाणणे महत्त्वाचे ठरते.  
 
ऑस्ट्रेलियाने आपला आर्थिक सुधारणा कार्यक्रम १९८० ते १९९० या दशकात हाती घेतला होता. त्या वेळी व्यापारातील सर्व अडथळे व परकीय चलनाच्या आदान-प्रदानामधील निर्बंध हटवण्यात आले होते. त्यामुळे या देशाच्या डॉलरला बाहेरच्या जगाचे धक्के बसले नाहीत व तो वेगाने घोडदौड करत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की, महागाईचा दर २ ते ३ टक्के इतकाच नियंत्रणात राहिला व सरकारच्या वित्तीय सुधारणांना गती मिळाली. जेव्हा जग एक दशकाहून अधिक काळ आर्थिक मंदीचा सामना करत होते त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा अर्थसंकल्प शिलकीचा असायचा व कर्जविहीन अर्थव्यवस्था असा त्याचा लौकिक होता. तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण झाल्या होत्या व वेतनामध्ये सुधारणा झाल्या होत्या. व्यवसायवृद्धीचा एक फायदा असाही झाला की, लोह व कोळसा खाणींच्या उत्खननामध्ये गती आली होती.  
 
अर्थव्यवस्थेत ‘रश’ विना ‘बस्ट’ होत नसतो, असे इतिहास सांगतो. त्याप्रमाणे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने संपन्न अशा क्वीन्सलँड व प. ऑस्ट्रेलिया राज्यात आता कर्ज व बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय बँकेने कृषी कर्जाचा फायदा व्हिक्टोरिया व न्यू साऊथवेल्स या राज्यांनी उठवला. परिणामी शेती उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली. विदेशातून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील वाढीबरोबर पर्यटकांची संख्याही वाढू लागली. गृह कर्जावरचे कमी व्याजदर व लोकसंख्येतील वाढीमुळे घरांच्या मागणीत तेजी आली. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर १.६ टक्के होता, जो विकसित देशांच्या तुलनेत दुप्पट आहे. या देशाला वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे दर पाच वर्षांनी ब्रिटनमधील बर्मिंगहॅमसारखे नवे शहर वसवण्याची गरज आहे. © 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
बातम्या आणखी आहेत...