आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्मसीमध्ये मूलभूत बदल आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जागतिक आर्थिक मंदीमुळे काही महाकाय बँका, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बहुराष्ट्रीय कंपन्या आपले अस्तित्वच गमावून बसल्या, चक्क बुडाल्या व रसातळास गेल्या. कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच या ‘इकॉनॉमिक स्लोडाऊन’चे चटके बसले, पण बहुराष्ट्रीय कंपन्या मात्र या मंदीमुळे बंद तर पडल्या नाहीत; उलट त्यांचे व्यवहार तसेच चालू राहिले. अगदी पहिल्या जोमाने ही पार्श्वभूमी तसेच या औषध कंपन्यांतून तरुणाईला दिली जाणारी पॅकेज सुविधा हे आकर्षण मोठे असल्याने अनेक तरुण-तरुणी फार्मसीकडे एक करिअर म्हणून पाहू लागले आहेत. किंबहुना त्यांचा मोठा ओढा फार्मसीकडे दिसून येतो. प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रमाला सामोरे गेल्यानंतर त्यांना जाणवते, हे केवळ शैक्षणिक व पुस्तकी ज्ञान आहे.

डिप्लोमा काय किंवा पदवी परीक्षा काय, सारे काही अकॅडमिकच. सर्व भर थिअरीवर. वास्तविक गरज ही प्रॅक्टिकलवर जादा भर देण्याची आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे पीसीआयने बनवलेला अभ्यासक्रम बदलणे आवश्यक आहे. त्यांनी कम्युनिकेशन स्किल्स, कॉम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिक्स, फार्मा पत्रकारितासारखे विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केले आहेत. विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने हे ठीक आहे, पण प्रॅक्टिकल अभ्यासक्रम कालबाह्य आहे. औषधाचे प्रत्यक्ष उत्पादन, आर अँड डी इ. बाबींना विशेष प्राधान्य द्यायला पाहिजे. शिवाय औषधांचे डोस, गोळ्या, लेबलिंग इ.विषयी कल्पना देताना वापरण्यात येणारी मॉडेल्स जुनी-पुराणी कालबाह्य झालेली आहेत.

वास्तविक विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधन करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. तसे होत नाही. अमेरिका, यूके, जर्मनी किंवा जपान या देशांप्रमाणे आपण कोणत्याही विषयात मूलभूत संशोधन करत नाही. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इ.मध्ये असलेली नोबेल पारितोषिके या देशातील शास्त्रज्ञांनाच आतापर्यंत मिळत आलेली आहेत. या देशातील विद्यार्थ्यांचा भर नेहमी संशोधनावर असतो. अभ्यासक्रमाची रचना तशीच असते. आम्ही अजूनही प्रयोग करण्याकरिता उंदीर, बेडूक हेच प्राणी वापरतो. तिकडे मात्र त्यांनी केव्हाच सेल कल्चरसारखे मॉडेल्स वापरण्यास सुरुवात केली आहे. तिथेही ते तंत्रज्ञानाचाच वापर करतात. आपल्याकडे विद्यार्थ्यांना केवळ क्लासिक ड्रग्जचे विषय शिकवले जातात. अद्यापही त्यांच्या ट्रायल व टेस्ट चालू आहेत. अशा कंपाउंडचा आम्ही विचारच करत नाही. थोडक्यात, आम्हाला आमचे सिलॅबस आमूलाग्र बदलले पाहिजेत. त्यात वरील गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे. अभ्यासक्रम बनवताना अकॅडमिशियनबरोबरच औषध उद्योगात प्रत्यक्ष काम करणा-या तज्ज्ञांचा समावेश केला पाहिजे; तरच बदल घडू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपल्याकडेही औषध निर्मिती करणा-या आकाराने मोठ्या व लहान लहान कंपन्या आहेत. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी इ.करिता औषधे बनवली जातात. उलाढालीचा विचार केला तर प्रमाण फार मोठे आहे. अर्थात लोकसंख्या प्रचंड आहे; पण आम्ही मोठ्या प्रमाणावर औषधे निर्यात करतो. आमच्याकडे स्टेट ऑ फ आर्ट्स टाइप पंचतारांकित व अत्यंत वेलइक्विप्ड हॉस्पिटल्स आहेत. डॉक्टर्सही निष्णात व तरबेज आहेत. ज्याला आपण मेडिकल टुरिझम म्हणतो, त्यासाठी मोठा स्कोप आहे. काही प्रमाणात तसे घडतही आहे. आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीच्या वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे अनेक देशांतून रुग्ण उपचारासाठी येतात. मिळणा-या एकूण सुविधा व ‘एक्स्पर्टाइझ’ लक्षात घेता इतर देशांशी तुलना करता इथे खर्चही कमी येतो. प्रगत देशांतून होणारी किचकट व धोकादायक सर्जिकल ऑपरेशन्स आमच्याकडील निष्णात डॉक्टर सहजपणे करतात व त्यात असणारा धोका अत्यल्प असतो.

औषध कंपन्या व मोठी हॉस्पिटल्स यांनी या सिच्युएशनचा फायदा घेतला पाहिजे. तसे घडले तर परकीय चलन, देशांतर्गत रोजगार व साधनसंपत्ती निर्माण होण्यासाठी भौतिक मदत होईल. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा काही भाग संशोधनावर खर्च केला पाहिजे व फार्मसीचे शिक्षण देणा-या शिक्षण संस्था, विद्यापीठे यांच्याशी त्यांचा संपर्क असायला पाहिजे. येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आपल्या विषयात जगात काय काय घडत आहे याची ओळख आपल्या उपक्रमातून करून द्यायला हवी. यासाठी अभ्यासक्रमात योग्य ते बदल करण्यास विद्यापीठांना भाग पाडले पाहिजे. त्यांच्या खर्चाचा काही भाग औषध कंपन्या व सधन हॉस्पिटल्सनी उचलायला हवा. मूलभूत संशोधनाकरिता सोई-सुविधा, मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ व साधनसंपत्ती उपलब्ध करून दिली पाहिजे.
आपलं काय होतंय - आपल्याकडे खूप काही आहे, ज्ञान, एक्स्पर्टाइज, नॉलेज, सुविधा, लेबर पण त्याचे ‘एक्सप्लॉयटेशन’ देशाचे हित लक्षात घेऊन केले पाहिजे.

viccolabs@satyam.net.in