आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅडमिशन कुणासाठी फायदेशीर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात यंदा 2 कोटी 50 लाख विद्यार्थी, विद्यार्थिनी हे 10 वी-12 वीच्या परीक्षांना बसले व महाराष्ट्रात ही संख्या 25 लाख इतकी होती, पण महाराष्ट्रात सीएसटीला फक्त 1 व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आहे. हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात किमान प्रत्येक 10 लाख लोकसंख्येला 1 याप्रमाणे 130 व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे हवीत. त्यामुळे मेडिकल अभियांत्रिकी व इतर अ‍ॅडमिशन मिळवताना पालकांना अत्यंत उपयुक्त माहितीच मिळत नाही. अनेक शाळा-महाविद्यालयेही अगदी सोपी माहिती पालकांना उपलब्ध करून देऊ शकतात.


दुर्दैवाने मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादपासून राज्यात सर्वत्र मिशन अ‍ॅडमिशन म्हणजे सायन्स 11 वी प्रवेशासाठी 70 ते 80 हजार रुपये महाविद्यालयाच्या संचालकांना द्यावे लागतात, नाही तर आपल्याला हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे शक्य होत नाही. हाच स्तर ग्रामीण भागात 40 ते 50 हजार इतका आहे. ही दु:खद गोष्ट आहे, पण जर विद्यार्थी-विद्यार्थिनी अत्यंत गरीब स्थितीतील असतील तर काय करणार? मराठवाडा, विदर्भ या भागात हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी हे पैशांअभावी महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहतात. हे दुर्दैवाचे आहे. गेल्या 10 वर्षांत 20 लाखांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा रीतीने प्रवेशापासून (सायन्सला) वंचित राहिले आहेत. सरकारने अनेक वेबसाइट दिल्यामुळे ज्यांच्याकडे संगणक आहे अशा (उच्च मध्यमवर्गीय) विद्यार्थी-विद्यार्थिनींना 11 वीला प्रवेश घेणे सोपे आहे, पण 12 कोटींच्या महाराष्ट्रात 4 कोटी लोकांकडे संगणक नाही. ग्रामीण भागात अत्यंत हलाखीत जीवन जगणा-या गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीच त्रास होत आहे.


यंदा अनेक मुलांना सीईटी (अभियांत्रिकी)ला चांगले गुण मिळाले, पण त्या अभ्यासाच्या वादात 12 वीला किमान गुण न मिळाल्याने त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. तसेच गेल्या वर्षीपेक्षा 12 वीनंतर उच्च शिक्षणासाठी 366 संस्थांत 1 लाख, 55 हजार 464 जागा उपलब्ध झाल्या आहेत. इंजिनिअरिंगच्या 7 हजार जागा वाढल्या आहेत. मी अशी शेकडो मुले बघतो की, ज्यांना सीईटीला 100 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत, पण त्यांना अभियांत्रिकीची मागणी कमी झाल्याने सहज महाराष्ट्रात प्रवेश मिळेल.


www.dte.org.in या वेबसाइटवर तंत्रशिक्षण मंडळाने इंजिनिअरिंग प्रवेशासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश तीन भागांत (राऊंड) होणार आहेत. सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 50 हजार इतकी फी आहे, तर खासगी महाविद्यालयात 1 लाख 50 हजार इतकी फी आकारली जाते. गेल्या 2 वर्षांत विदर्भात अनेक महाविद्यालयांत इंजिनिअरिंगच्या जागा भरल्याच गेलेल्या नाहीत. राजकारणी व/वा इतर नेत्यांच्या महाविद्यालयात अनेक जागा रिकाम्या आहेत. या सर्व जागा गरजेपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मंजूर झाल्यामुळे रिकाम्या आहेत.


यंदा 10 वीच्या निकालाचा विचार केला तर 83.48 टक्के निकाल लावला आहे. कोकण 93.79 टक्के ते लातूर 73.75 टक्के वगैरे प्रमाण आहे, पण 10 वी पास झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना 504 वा त्याहून कमी गुण आहेत. त्यांनी खालील सर्टिफिकेट कोर्सेसला प्रवेश घेण्याचाही विचार करावा.


(1) आयटीआय कोर्सेस, सर्व तालुक्यांच्या ठिकाणी उपलब्ध- टर्नर, फिटर, ड्राफ्टस्मन, मोबाइल रिपेअरिंग. (2) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, गंगापूर रोड, नाशिक (ycmou) यांचे कोर्सेस- गच्चीवरील शेती, बंगल्यातील शेती, Horticulture सेरी कल्चर, अ‍ॅग्रिकल्चर, ब्रेड-बिस्कीट तयार करणे वगैरे. या सर्व व/वा या व्यतिरिक्तही 8वी पास 10वी पास/नापास कोर्सेसना त्या- त्या जिल्हा परिषदेकडून नांदेड, अमरावती, जालना, चंद्रपूर वगैरे माहिती घेऊन त्या त्या जिल्ह्यात प्रवेश घेता येईल. हे सर्व कोर्सेस आयटीआय, जि. परिषदा,ycmou, कृषी विद्यापीठे, खासगी संस्था इत्यादींच्या मार्फत चालवण्यात येतात. प्रत्येक मुला/मुलींनी (10 वीनंतर) कॉलेजात प्रवेश घेतलाच पाहिजे, असे नाही. सर्व जिल्ह्यांत केटरिंग, मेंदी लावणे. फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी वगैरे शेकडो सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. याची माहिती त्या-त्या जिल्ह्याच्या जि. परिषद कार्यालयात Just dial वर मिळेल. या कोर्सेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. झाडे व/वा शेतीसंदर्भात कोर्स करून जर एखाद्या बेरोजगार युवकाने 2000 झाडे लावली तर त्याला आयुष्यभर पुरेल एवढे उत्पन्न त्या झाडाद्वारे मिळू शकेल. त्यांनी याचा विचार जरूर केला पाहिजे.