आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडंबन - अघोरी विद्या आणि बाबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी प्रमाणे आज बाबांचा दरबार . शिष्यगण जमलेले . जागा मिळेल तसे दाटीवाटीने बसलेत . मुखाने बाबांचा जयजयकार सुरु . काही शिष्य धुंद होवून नाचताहेत , काहींच्या अंगात आले आहे ,इतर काही गुंग होवून घुमताहेत . वातावरण शंभर टक्के बाबामय झाले आहे . साऱ्याचा नजरा बाबांचा आगमनाकडे लागले . प्रत्येकाचे डोळे आसुसलेले . इतक्यात जयजयकार चा आवाज वाढतो .' बाबा , बाबा 'अशी आर्त हाक दरबारात घुमु लागते . बाबांचा धीर गंभीर चेहरा पाहून साऱ्याचे चेहरे उजळन निघतात . बाबा मूकपणे सिंहासनकड़े वळतात .तसे ते नेहमीच मूक असतात .
मागुन त्यांचा काही चेल्या चपाटे यांची लगबग सुरु . तोंडावर उसने हसू आणि उत्साह आणून भक्तांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न सुरु . बाबा आसनावर बसतात .एक चेला खुणेनेच एक एक करून भक्ताना या असे खुणावतो . बाबा डोळे उघडतात ,समोर बसलेल्या शिष्यांकड़े प्रेमाने बघतात . शिष्य पुढे येण्यासाठी धडपडू लागतात . ' बाबा बाबा असे आरोळी ठोकत एक शिष्य बाबांचा पायावर येवून लोटांगण घालतो .

बाबा त्याला प्रेमाने उठवतात .बाबा बाबा , मुलाला नोकरी नाही , करू ? बाबाचा मुखकमलावर ठेवणीतले हास्य येते . चेल्याला इशारा करतात . बाबा हवेत हात फिरवातात , हातात एक तावीज येते. ते तावीज मूक पणे शिष्याला देतात . बाबा नोकरी लागेल ना . बाबा काहीच बोलत नाही . चेला लगबगीने पुढे येतो ' अवश्य , नक्की नोकरी लागणार , वर्ष , दोन वर्ष , पाच किंवा दहा वर्ष , आणि निवृत्ति वयाचा होण्याआधी तर नक्कीच हं . शिष्य अत्यानंदाने नाचू लागतात . पुन्हा बाबांचा जयघोष होतो . चेला नेक्स्ट म्हणून खुण करतो . तसे आणखी एक भक्त लगबगीने बाबांचा पायावर डोके ठेवतो . बाबा एवढा पगार मिळतो , पण पुरत नाही हो . मुलांची आबळ होते , शिक्षणा साठी
पैसा पुरत नाही . मुलाना नवे कपडे शिवणे दुरापास्त झाले आहे . उपाय सांगा बाब. बाबा डोळे उघडतात ,चेल्याला कागद व पेन मागतात ,चेला तत्परतेने कागद व पेन बाबाना देतो , बाबा त्यावर काहीतरी खरडतात , शिष्याला हात पुढे करायला सांगतात. बाबा चिटोरे शिष्याचा हातात देतात . शिष्य ते भक्तीभावाने वाचतो . त्यावर
लिहिलेले असते अन्न सुरक्षा बिल ' शिष्य अत्यानंदाने नाचू लागतो . पण केव्हा बाबा . बाबा बोट वर करतात , अभालाकड़े बघतात ' बेटा , धीर धर ,इश्वरावर विश्वास ठेव . गॉड इज ग्रेट ' तसा भक्त आनंदाने बेभान होवून पुन्हा नाचू लागतो . उर्वरित भक्त बाबांचा जयजयकार करतात . वातावरण पुन्हा एकदा बाबामय होते . नेक्स्ट असे पुन्हा एकदा बाबांचा चेला तारस्वरात ओरडतो . हातात सोन्याचा अंगठ्या , गळ्यात जाड जुड़ गोफ घातलेला भक्त बाबांचा पायावर लोळन घेतो व हमसून हमसून रडू लागतो . बाबा आश्चर्याने त्याकडे बघतात , प्रेमाने जवळ घेतात , डोक्यावरून हात फिरवतात , तसा भक्त हुंदका आवरत म्हणतो ' बाबा सोन्यात पैसे गुंतवले , शेयर मधे पैसा गुंतवला पण व्यर्थ .दुर्दैव माझे , शेयर बाजार कोसळला, सोन्याचे भाव ही पडले . बाबा , मी कफल्लक झालो . बाबा दया करा . बाबा क्षणभर थाबकतात , हसून चेल्याकड़े बघतात ' चिदानंद स्वामी , सद्ध्या काय हालत आहे बाजाराची ? अन हे काय चालले आहे ? लोक परेशान आहेत . माझा भक्ताना अशा यातना का देतोस चिदानंद . चिदानंद हिरमुसला होतो तसे बाबा त्याचा जवळ जातात .नर्व्हस होवू नकोस चिदानंद , पण ही तुझी जारण - मारण विद्या कधी अमलात आणणार ?
अरे काही जादू टोणा दाखावशील की नाही माझा या भक्तांना ? आँ ? तसे चिदानंद स्वामी गालातल्या गालात हसतात . आतल्या खोलीत लगबगीने जातात .बाहेर येतात ते हातात एक रूपया छे नाणे व दुसऱ्या हातात एक डॉलर घेवुनच . दोन्ही दोन टोकाला ठेवतात . मधोमध उदबत्ती पेटवतात .तीन वेला ओवाळतात . तोंडातल्या तोंडात काही मंत्र पुटपुटतात रुपयावर लिंबू ओवाळतात ,खाली ठेवतात , डॉलर मधे दोन टाचण्या खुपसतात , त्याला मिर्ची व काळी बाहुली बांधतात . जमिनीत एक खड्डा करून त्यात पुरतात . मातीने माखलेले हात झटकत हसतमुखाने बाबांजवळ येतात .


काय केलस हे , चिदानंद स्वामी ? बाबा , आता बघा माझी जारण मारण विद्येची कमाल , क्षणार्धात रूपया मोठा होइल
आणि डॉलर लहान . आणि लगोलग शेयर बाजार आणि सोने दोन्ही उसलेल . बाबा कौतुकाने चिदानंद स्वामी कड़े बघतात व भक्ताला आपल्या जागेवर जावून बस असे खुणावतात . पाच मिनिटात रिजल्ट कलेल , इतकी स्ट्रोंग विद्या आहे जारण मारण ची अशी पुस्तीही जोडतात . तसा भक्त हरखून जातो . अत्यानंदाने उभा राहतो आणि नाचायला
सुरुवात करतो . बाबांचे वाचनामृत कानावर पडल्या पडल्या इतर भक्त ही फेर धरून नाचु लागतात . काही क्षण आनंदात गेल्यावर ' बाबा , बाबा ' अशी आर्त हाक बाबांचा कानावर पड़ते . चिदानंद स्वामी धावत येतात . का रे काय झाले ? बाबा ही घाबरे घुबरे होत विचारतात . बाबा , बाबा . जारण मारण आपल्यावर उलटली बाबा . काय ?


होय बाबा . जमिनीत गाड्लेला डॉलर मोठा होत आहे आणि रूपया दिसेनासा झाला आहे बाबा . ऐकुन बाबांचे ब्लड प्रेशर वाढते , कपालावर धर्मबिंदु चमकू लागतात . घात केला या अघोरी विदयेने बाबा . फार वाइट झाले . आता काय करायचे ? काय करायचे म्हणजे ? अरे लोकानां फसवले असा आरोप होइल आता आपल्यावर . लोक नाही नाही ते बोलतील . आधीच आपले दूकान म्हणजेच धंधा बंद करायची वेळ येवून ठेपली आहे चिदानंद . त्यात तू आणखीनच घोळ वाढवला रे . एव्हाना भक्तगणा मधे चुलबुल वाढलेली असते . काही तरी अभद्र घडले आणि आपली घोर
फसवणुक झाली अशी कुजबुज सुरु होते . हलू हलू गोंधळ वाढत जातो . भक्त अस्वस्थ होतात . सगले आपापली जागा सोडून सैरावैरा पलायला लागतात . स्वामी आणि बाबा स्तब्ध होतात . एकमेकांकडे अच्म्भ्याने बघू लागतात . एवढ्यात एक चेला धावत पळत आत येतो . बाबा बाबा . आपले दूकान गुंडाला . महाराष्ट्रात दाभोकरांचा खून झाला
आहे आणि लगोलग शासनाने जादू टोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश आणला आहे . तेव्हाआता भानामती , गंडे दोरे , जारण मारण , चेटूक करणाऱ्या ची काही खैर नाही बाबा . चला , उठा आणि पला . लोकाना खोटी आश्वासने , खोटी स्वप्ने विकणे बंद करा बाबा . चला लवकर आता दूसरा व्यवसाय शोधावा लागणार आपल्याला . चेल्याचे हे वचन
ऐकुन बाबा व चिदानंद स्वामी गर्भगलित होतात ,हाताला लागेल ते किडुक मिडुक उचलतात आणि वाट फुटेल त्या दिशेला धावत सुटतात .