आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन : अज्ञातवासातील चिनी प्रगतीच्या वाटेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅलन मॅक यांचे आईवडील ७० च्या दशकात हाँगकाँगमधून ब्रिटनमधील यॉर्कशायर येथे आले होते. त्यांनी एकाच खोलीत अनेक दिवस काढले. मॅक यांनी प्रचंड मेहनत घेऊन केंब्रिज विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले. वकील झाले तसेच छोटा व्यवसायही करू लागले. गेल्या वर्षी ते दक्षिण इंग्लंडच्या हेवंत येथून चिनी वंशाचे पहिले संसद सदस्य बनले. ब्रिटनमध्ये डझनभर कृष्णवर्णीय आणि त्यापेक्षा दुप्पट दक्षिण आशियाई वंशीय खासदार आहेत. येथील चिनी लोक राजकारण आणि सामाजिक जीवनात आजवर कधीही सक्रीय नव्हते. मात्र आता ही स्थिती बदलत आहे.
२०११ मधील जनगणनेनुसार ब्रिटनमधील चिनी लोकांची लोकसंख्या ३ लाख ९० हजार होती. खासदारपदाची निवडणूक लढलेले चिनी बॅरिस्टर जॅक्सन नग सांगतात, हा आकडा खरं तर सहा लाखांहून अधिक असला पाहिजे. चिनी हा एक आदर्श अल्पसंख्यांक आहे. ब्रिटनमधील ख्रिस्ती संस्कृतीला त्यांनी कधीही विरोध केला नाही. सरकारकडून जेवढ्या सुविधा मिळतात, तेवढ्याही ते घेत नाहीत. चिनी कल्याण ट्रस्टचे मेई सिम लाई म्हणतात, चिनी लोक स्वयंपूर्णतेवर अधिक भर देतात. या सुविधा घेतल्याने स्वाभिमान दुखावण्याची अनेकांना भीती असते. १६ वर्षांपेक्षा कमी वयातील ७ टक्के विद्यार्थी शाळेतील मोफत जेवणाचा लाभ घेतात. १२ टक्के ब्रिटिश विद्यार्थी तर २४ टक्के पाकिस्तानी विद्यार्थी हा लाभ घेतात. चिनी विद्यार्थी ब्रिटनमध्ये अग्रभागी दिसतात. १६ व्या वर्षी होणाऱ्या जीसीएससी परीक्षेत ७७ टक्के विद्यार्थ्यांना पाच चांगले ग्रेड मिळाले. भारतीयांपेक्षा (७२%) हे प्रमाण थोडे जास्त, तर राष्ट्रीय सरासरी (५७%) पेक्षा बरेच जास्त प्रमाण आहे. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यातही चिनी विद्यार्थी (५८%) अन्य वंशीय विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहेत. मात्र आजवर हे यश प्रत्यक्ष रोजगारात दिसून येत नव्हते. दुसऱ्या पिढीतील चिनी अकाउंट, औषधीसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून त्यांच्या रोजगाराचा दर (५७ %) अाहे. हा अन्य कमी शिक्षित समूहांपेक्षा खूप कमी आहे. स्कूल गव्हर्नरसारख्या महत्त्वाच्या स्थानिक पदांवर फार कमी चिनी नागरिक पोहोचले आहेत. ब्रिटनमध्ये १८ हजार स्थानिक प्रतिनिधी आहेत. यापैकी डझनभर चिनी प्रतिनिधी आहेत. मॅक सांगतात, ब्रिटनमध्ये जन्मलेले चिनी आता पुढे येत आहेत. चीनमधील तरुणांची मोठी फळी पदव्युत्तर अभ्यासासाठी ब्रिटनमध्ये येत आहे. ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये सुमारे ९० हजार चिनी विद्यार्थी प्रवेश घेतात. खासगी बोर्डिंग स्कूलमध्ये एक चतुर्थांश विद्यार्थी चिनी आहेत. यापैकी अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. संडे टाइम्सने जारी केलेल्या श्रीमंतांच्या यादीत आजवर दक्षिण आशियाई नावांचाच भरणा होता. मात्र आता त्यात चिनींचाही समावेश होत आहे. २००० ते २००४ दरम्यान ब्रिटनमध्ये अवैध मार्गाने चिनी नागरिकांच्या प्रवेशाची प्रकरणे समोर आली होती. मात्र गेल्या दशकात चीनमध्ये संधी वाढल्याने तसेच ब्रिटननेही जाचक नियमावली अवलंबल्यामुळे हे स्थलांतर कमी झाले आहे. असे असले तरी जॅक्सन वग यांच्या मते, ब्रिटनमध्ये अजूनही लाखाहून अधिक चिनी अवैधरीत्या राहत आहेत.
बातम्या आणखी आहेत...