आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलधारी देशाची अजब कथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलफोनने कोट्यवधी भारतीयांचे जीवन बदलून टाकले आहे. या तंत्रज्ञानाने लोकशाहीचा खुलेपणाने विस्तार केला आहे. एकविसाव्या शतकात देशाच्या कानाकोपर्‍यात उपलब्ध असलेले 90 कोटी मोबाइल भारतासाठी एक अनपेक्षित वरदान आणि अदृश्य शाप, दोन्हीही ठरणार आहेत. अनपेक्षित अशा अर्थाने की, या तंत्रज्ञानाचा शोध आपण लावलेला नाही किंवा याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनही आपण करत नाही. तरीही दहा वर्षांच्या आत उत्पन्न गट, वयोगट आणि जात-धर्माच्या सर्व सीमा ओलांडून शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी मोबाइलसारखे स्वस्त टॉकटाइम असलेले दुसरे उपकरण नाही. शाप या अर्थाने की, गावागावांत जाऊन पोहोचलेल्या या उपकरणाने दहशतवाद्यांसाठी, जेलमधील माफिया डॉन किंवा शरीरांचा व्यापार करणार्‍यांसाठी, गुप्तहेर संस्थांसाठी (नेहमी खासगी जीवनात नको तितकी ढवळाढवळ) आणि प्रतिबंधित पोर्नोग्राफीला काही मिनिटांतच ‘व्हायरल’ बनवण्यासाठी अनेक धोकादायक मार्ग उपलब्ध केले आहेत. भारतात प्रत्येक शाप किंवा वरदानाला नशिबाचे देणे मानून कोणतीही शंका मनात न आणता स्वीकारण्याची परंपराच आहे. जबाबदार्‍या किंवा धोके ओळखून योग्य तºहेने पार पाडण्यात आपण फार वेळ घालवत नाही. त्यामुळेच विस्तीर्णपणे पसरलेल्या मोबाइलचे कोणाला, कधी आणि कोणत्या प्रकारचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय फायदे-तोटे होत आहेत याबाबतीत आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती नाही. ऑस्ट्रेलिया तसेच सिंगापूरस्थित रॉबिन जेफरे तसेच आस्सा दोरान (हॅचेट बुक पब्लिशिंग इंडिया, प्रा. लि.) या दोन प्रसिद्ध लेखकांची नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तके - सेलफोन नेशन, हाऊ मोबाइल फोन्स हॅव रेव्होल्युशनाइज्ड बिझनेस, पॉलिटिक्स अँड ऑर्डिनरी लाइफ इन इंडिया (मोबाइल फोनने भारतात व्यवसाय, राजकारण तसेच सामान्य जीवनात कोणत्या प्रकारचे क्रांतिकारक बदल केले आहेत?) ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची अत्यंत रोचक पद्धतीने विवेचन करतात.
मोबाइल टेलिफोन सिग्नल्सच्या साहाय्याने अनेक प्रकारच्या सूचना, मेसेजेस तसेच माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. सैन्यदल, आरोग्य तसेच आर्थिक क्षेत्रासारख्या काही खास भागांत संवाद साधण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या या वायूलहरीच्या उरलेल्या हिश्श्यांचा कशा प्रकारे उपयोग करता येईल यावर आपल्या वैज्ञानिकांनी 1990 मध्ये संशोधन केले. त्यानंतर या रेडिओ लहरींच्या (फ्रि क्वेन्सीज) उपलब्ध वलयांना अत्यंत सफाईदारपणे घडवून अत्यंत सीमित क्षेत्रात पकडून पुढे पाठवणार्‍या अनेक मोबाइल टॉवर्सची साखळी तयार करण्यात आली. या टॉवरच्या साहाय्यानेच आज देशभरात मोबाइलचा सर्रास वापर सुरू आहे. एक भौगोलिक क्षेत्र व्यापणार्‍या टॉवरला ‘सेल’ म्हटले जाते. यासाठी याच्यामार्फत चालणार्‍या फोनला ‘सेलफोन’ असे म्हणतात.
काही नवीन मिळाले तरी वस्तुस्थिती माहिती करून घेण्याऐवजी आपण त्याच्या स्वरूपावरच भांडतो, हीच तर मुख्य अडचण आहे. या तंत्राचे उत्पादन करणे, विजेचा अखंड पुरवठा आणि ग्राहकांना चांगली तसेच स्वस्त सेवा देण्याचा प्रयत्न क रण्याऐवजी मोबाइल कंपन्यांना विकण्यात आलेल्या ब्रॉडब्रँडचा भाव काय असायला हवा? जर त्यांना कमी भावात (अनधिकृत वृत्तानुसार) विकण्यात आले असतील तर आपल्या प्रिय देशाचे किती नुकसान झाले? यावरच संसदेपासून रस्त्यापर्यंत अकबर-बिरबलाप्रमाणे तात्त्विक चर्चेतच वेळ वाया घालवला. एकूण नुकसानीचा अंदाज लावण्यात विरोधी पक्ष आणि माध्यमांनी दिवस-रात्र तºहेतºहेचे तर्कवितर्क लावले. परिणाम शून्य!
मात्र याविरोधात धरणे-आंदोलने झाली, राजीनामे सादर झाले, मोठ्या हस्ती जेलमध्ये गेल्या, कितीतरी कंत्राटे रद्द झाली, अनेक कंपन्या गाशा गुंडाळून पळून गेल्या, अनेक टॉवर्स हटवण्यात आले. (कारण त्यापासून निघालेली किरणे आजूबाजूच्या लोकांना आजारी पाडू शकतात) तरीही या फोनची विक्री थोडीही कमी झालेली नाही किंवा वीज वितरणात सुधारणा झाली नाही. अर्थातच बिल वाढत गेले आणि काही भागात कनेक्टिव्हिटी बिघडली. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी डिझेलवर चालणार्‍या इन्व्हर्टरचा आधार घेतला आणि त्याच कंपन्या भारतीय रेल्वेनंतर डिझेलच्या सगळ्यात मोठ्या ग्राहक झाल्या.
देशातील स्वयंरोजगारनिर्मिती करणार्‍या लोकांमध्ये आणि महिलांच्या जीवनातील कायम अंधाराच्या गर्तेत बंद असलेल्या एका कप्प्याला उजेडाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोबाइलने तटस्थतेने केले. हेच कार्य ढोल-नगारे वाजवून संपूर्ण क्रांतीच्या घोषणा देणार्‍या सरकारी योजना आणि कार्यक्रमांनीही केलेले नव्हते. मोबाइल आता श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वस्तू नसून नवे विचार, आवश्यक माहिती-निरोप देण्याचे नवे तंत्र तसेच जगाशी सहज संपर्क साधण्याचे साधन आता गरीब आणि शोषित लोकांच्याही आटोक्यात आले आहे, असेच सर्वसामान्यांचे मत आहे. मोबाइलमुळे गृहोद्योग चालवणार्‍या असंख्य महिला आपल्या बाहेरगावी राहणार्‍या पतीबरोबरच आपला माल खरेदी करणार्‍या बाजारपेठेस, ग्राहकांसही थेट संपर्क साधत आहेत. यामुळे दलाली करणार्‍यांचे महत्त्व संपुष्टात आले. त्यामुळे उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झाली. सुतारकाम, वीज उपकरणांची दुरुस्ती, प्लंबिंगची कामे करणार्‍या लाखो लोकांना आज मोबाइल रोजगार आणि ग्राहक विनासायास उपलब्ध करून देत आहे. मोबाइलधारक महिलांचा वाढत्या आत्मविश्वासावर खाप पंचायती आणि धर्मगुरूंची अपेक्षेप्रमाणे वक्रदृष्टी पडली, पण नोकरदार स्त्रियांच्या बाजूने संपूर्ण कुटुुंबांचा पाठिंबा असल्याने त्यांच्या गुरगुरण्याचा परिणाम झालेला नाही. सगळीकडे वातावरण खुलेआम लोकशाहीवादी आहे.
आपला निहित स्वार्थ पाहता सर्व शक्यता अजमावून पाहत असलेले सामर्थ्यशाली मोबाइलधारक मतदार दिल्लीच्या सिंहासनाचा फैसला करणार आहेत, या दृष्टीने 2014 ची निवडणूक क्रांतिकारी ठरणार आहे. हे प्रथमच घडत आहे. ते जातपात-धर्म पाहूनच निवड करण्याचीही शक्यता आहे. परंतु आपल्या मतदानात सत्ता उलथवण्याची ताकद आहे हे सर्वसामान्य मतदाराच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा जीवनाच्या प्रवाहात हातपाय न हलवता धर्म आणि जातीच्या कुबड्या घेण्याचा फोलपणा आणि धोक्याची जाणीव त्यालाही होते. सत्तेसाठी लढणार्‍या प्रत्येक उमेदवाराच्या डोळ्याला डोळा भिडवून भविष्य अजमावण्याचे आम आदमीचे हे साहसच लोकशाहीचा खर्‍या अर्थाने प्रारंभबिंदू ठरणार आहे.

(mrinal.pande@gmail.com)