आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या भारताचे बदलते क्लासरूम्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली मुले कशी तासन्तास टीव्हीसमोर आपला वेळ घालवत असतात आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर कसा परिणाम होत आहे, याबद्दल तक्रार करण्याचे दिवस संपले आहेत. ही अतिशयोक्ती वाटेल, परंतु वस्तुस्थिती आहे.
आपली मुले कशी तासन्तास टीव्हीसमोर आपला वेळ घालवत असतात आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर कसा पारिणाम होत आहे, याबद्दल तक्रार करण्याचे दिवस संपले आहेत, असे म्हणण्याचे दिवस आले आहेत. ही अतिशयोक्ती वाटेल, परंतु वस्तुस्थिती आहे.
टीव्हीद्वारे शिक्षण ही संकल्पना भारतात नवी असून सध्या ही संकल्पना सर्व वयोगटातील मुले व गृहिणी यांसह कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भुरळ घालत आहे. आपल्याकडे ही संकल्पना झपाट्याने रुजू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्यासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात ही पद्धत फार उपयोगी ठरेल यात काहीच शंका नाही.
मनोरंजनापासून शिक्षणापर्यंत विस्तार पावलेल्या डीटीएच सेवा पुरवणाºया आघाडीच्या टाटा स्कायने या टीव्हीमधून शिक्षणाच्या संकल्पनेला नवीन परिमाण दिले आहे आणि या अभिनव संकल्पनेला सक्रिय ब्रँडच्या नावाखाली उचलून धरले आहे. टाटा स्कायपाठोपाठ आता इतरही डीटीएच कंपन्या ही सेवा सुरू करतील. इडियट बॉक्सचे रूपांतर आता कुटुंबातील प्रत्येक सदस्याकरिता उच्च दर्जाचा आशय आणि सेवा पुरवणाºया इंटरॅक्टिव्ह शिक्षण देणाºया उपकरणात होत चालले आहे. यामध्ये संपूर्ण लक्ष पूर्ण सादरीकरण, आशय पुरवणे आणि त्यांचे भागीदार यांवर केंद्रित केले गेलेले आहे.
भारतातील विविध वयोगटांतील मुलांसाठी अभ्यासक्रमावर आधारलेला आशय विकसित करण्यासाठी आघाडीच्या शिक्षणतज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. तसेच लहान मुलांकरिता असलेल्या या शैक्षणिक सेवांची रचना करण्यात आली आहे. उदा. लहान मुले गणित, इतिहास, विज्ञान आणि भूगोलापासून ते अन्नपदार्थ, कार्टून्स, पुस्तके आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्नमंजूषांची उत्तरे देऊ शकतात. एवढेच नव्हे, तर घरच्या घरी करता येणाºया प्रयोगांच्या सचित्र स्पष्टीकरणांनी मुलांना विज्ञानातील प्राथमिक धडे शिकण्यास प्रोत्साहन मिळते. याच व्यासपीठावर समाविष्ट असलेल्या गोष्टींमध्ये डॉ. अब्दुल कलाम, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि यांच्यासारख्याच अनेक थोर भारतीय नेत्यांच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी आहेत. खरोखरच, महाभारत आणि रामायण यांतील कहाण्यांद्वारे पुराणांतील धडे गिरवण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे.
यात लहान मुलांसाठी आणला गेलेला सुपर स्पेलर, एक गतीवर आधारलेला स्पेलिंग गेम आहे. यामुळे मुलांना आपल्या स्पेलिंग कौशल्यांना देशभरातील मुलांबरोबर जोखण्याची आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळते! या सेवेमुळे लहान मुलांनाही लाभ मिळतो. ही लहान मुले बा बा ब्लॅक शिप, मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब आणि यांसारखी कितीतरी लोकप्रिय बालगीते गुणगुणू शकतात. तसेच लायब्ररीत भारतातील अग्रणी प्री-स्कूलची साखळी असणाºया जंबो किड्सच्या बालगीतांची भर टाकली आहे. मुळाक्षरे, अंक आणि शब्द यासारख्या प्राथमिक गोष्टी शिकणे हे आता मजेदार झालेले आहे. मुले आता या संकल्पना इंटरॅक्टिव्ह गेम्स आणि शाळेमध्ये वापरली जातात तशी फ्लॅशकार्ड्स वापरून शिकू शकतात.
गृहिणींना लक्ष्य करून घरच्या घरी त्यांचे संवाद कौशल्य, उच्चार, शब्दसंग्रह सुधारण्यासाठी त्यांची मदत करण्याकरिता कंपनीने ब्रिटिश कौन्सिलच्या साहाय्याने अ‍ॅक्टिव्ह इंग्लिश सुरू केले होते. ही सेवा विकसित होऊन आता तिच्यामध्ये प्राथमिक आणि मध्यम अशा दोन स्तरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला व्याकरणातील साध्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील किंवा प्रत्यक्ष आयुष्यातील घटनांमधील संवादाचा सराव करायचा असेल तर या सेवेवर हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
व्याकरणाचे धडे आणि संवाद यानंतर शिकण्यास मदत करणाºया इंटरॅक्टिव्ह प्रश्नावलीचा समावेश आहे. या सेवेमध्ये नुकताच स्पेलिंग गेम आणि आॅडिओ काँप्रिहेन्शन एक्सरसाइझ अशा दोन इंटरॅक्टिव्ह सुविधांची भर पडली आहे. यामुळे भविष्यात एकूणच शिक्षणाची सर्व सेवा झपाट्याने बदलत जाणार आहे. शिक्षणावर जास्त भर देणाºया या सर्व सेवा आपापल्या प्रकारे खास असून कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याकरिता बनवण्यात आल्या आहेत. या सेवा 24 तास उपलब्ध असून ग्राहक त्यांच्या सोयीच्या वेळी त्यांचा लाभ घेऊ शकतात. मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश, कँपिअन, सेंट झेव्हियर्स, केंद्रीय विद्यालय, स्मॉल वंडर यांसारख्या बºयाच अग्रगण्य शाळा शालेय शिक्षणात या माध्यमाचा वापर करू लागल्या आहेत. या प्रकारे शिकवण्याच्या पद्धती इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की देशातील 1000 हूनही जास्त शाळांमध्ये त्या वापरल्या जात आहेत आणि त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवल्या गेलेल्या आहेत. सध्या ही सेवा फक्त मुंबई-पुण्यासारख्या महानगरात मुलांसाठी वापरली जात असली तरी भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात यातून एक नवी क्रांती येऊ घातली आहे. हे माध्यम मुलांसाठी जास्त संवाद साधणारे असल्याने लोकप्रिय होईलच. तसेच विद्यार्थी शहरातील असो वा ग्रामीण भागातील, त्याला एकाच दर्जाचे शिक्षण टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल.