आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द. कोरियातील अमेरिकी क्षेपणास्त्रांची चीनला भीती, बहिष्काराचा मार्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ली शिन बीजिंगस्थित ‘लूट मार्ट’ या स्टाेअरचे मालक. ती दक्षिण काेरियातील सुपर मार्केट चेन अाहे. मात्र त्यांच्या बीजिंगच्या दुकानाबाहेर ‘गेट अाउट अाॅफ चायना’ असा फलक लावण्यात अालेला अाहे. ६६ वर्षीय ली यांनाही हे स्टाेअर अाता नकाेसे वाटते. तेच नव्हे, तर अनेक चीनी नागरिक दक्षिण काेरियाचा द्वेष करतात. काही दिवसांपासून ही भावना वाढीस लागली अाहे. दक्षिण कोरियाने अमेरिकेला क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याची परवानगी दिली. ती प्रक्रियाही सुरू झाली अाहे. त्यामुळे चीनमध्ये त्याबाबत भीती व्यक्त केली जात अाहे. 

चीनचे म्हणणे आहे की, दक्षिण कोरियाच्या माध्यमातून अमेरिका चीनवर बारकाईने लक्ष ठेवून अाहे. त्यामुळे दक्षिण कोरियाने ती हटवावी. परंतु, कोरियाकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने आणि तेथील राजकीय अस्थिरतेची संधी साधत चीनने कोरियाशी सर्वच व्यावसायिक संबंध तोडत त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी चिनी नागरिकांना दक्षिण कोरियाबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. पण आता त्यांचा तिरस्कार केला जात आहे. व्यवसायांचीही त्यात आहुती दिली जात आहे. हा विरोध प्रसारमाध्यमांतूनही हाेत असून, चिनी सरकारपुरस्कृत माध्यमांतून रोज रकाने भरून लेख लिहून कोरियाई वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यात हाेत आहे. तसेच विद्यार्थी, निवृत्त अधिकारी आणि टॅक्सीचालकांनीही दक्षिण कोरियातील संस्था प्रतिष्ठानांना विरोध करणे सुरू केले आहे. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दक्षिण कोरियाच्या सर्वच सहली, दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. रेस्टॉरंटमध्येही कोरियन पदार्थ न खाण्याचा प्रचार-प्रसार सुरू आहे. दक्षिण कोरियाच्या एका बँडचे चीनमध्ये होणारे प्रमोशनही राेखून चीनने त्यांचा व्हिसा रद्द केला. 

चिनी  टीव्ही चॅनलवरूनही  कोरियाचे कलाकार आणि त्यांचे कार्यक्रम पूर्णत: वगळण्यात अाले अाहेत. या विरोधाची मुख्य दोन कारणे  चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीच स्पष्ट केली अाहेत. पहिले म्हणजे चीनच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका असलेली अमेरिकी क्षेपणास्त्र प्रणाली हटविण्यासाठी चीन दक्षिण कोरियावर दबाव अाणत आहे. तर दुसरे म्हणजे, दक्षिण कोरियात सध्या राजकीय अस्थिरता आहे. शुक्रवारीच राष्ट्रपती पार्क गुन यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे चीनच्या नेत्यांनी ही संधी साधत जोपर्यंत अमेरिकन क्षेपणास्त्र कोरिया हटवित नाही, तोपर्यंत त्यांच्याशी संबंध ठेवले जाणार नसल्याचा दबाव निर्माण केला. काेरियात अमेरिकन क्षेपणास्त्र हटविणारे नवे राष्ट्रपती असावेत, यावर चीनने लक्ष केंद्रित केले आहे. 

- झेवियर हर्नांडिझ, ओवेन  ग्यू, रेयन मॅक्कारो
बातम्या आणखी आहेत...