आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-व्यापारात चीनची अलिबाबा, टेनसेंट अग्रस्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील मोठ्या इंटरनेट कंपन्या पाश्चिमात्य उत्पादनांची नक्कल करत असल्याचा आरोप करत सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास नकार देत असत. अगदी काही वर्षांपूर्वी ही स्थिती होती. पण आज चीनच्या कंपन्या झपाट्याने फोफावत आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षाही विस्तारत आहेत. अलिबाबा ही चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आता ई-बे आणि अॅमेझॉनच्या एकूण देवाण-घेवाणीपेक्षा अधिक देवाण-घेवाण करत आहे. कंपनीचे अध्यक्ष जॅक मा यांनी २० वर्षांत जगातील २ अब्ज नागरिकांना सेवा देण्याचा संकल्प केला आहे.  
 
टेनसेंट ही चीनमधील ऑनलाइन गेम आणि सोशल मीडिया कंपनीदेखील २७५ अब्ज डॉलर्सच्या उलाढालीसह जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. भविष्यात जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व चीननेच करावे, अशी या कंपनीचे अध्यक्ष पोनी मा (जॅक मा यांच्याशी संबंध नाही) यांची महत्त्वाकांक्षा आहे. सेन्सॉरशिपच्या बंधनांमुळे गुगल यापूर्वीच चीनमधून बाहेर पडली आहे तर चीनची बायदूदेखील आता पिछाडीवर आहे. त्यामुळेच या दोन कंपन्या आता जागतिक शक्ती बनू पाहत आहेत.  या तिन्ही कंपन्या आपल्या स्पर्धेतील पाश्चिमात्य कंपन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. पाश्चिमात्य कंपन्या साधारणपणे काही महत्त्वांच्या प्रक्रियांवरच लक्ष केंद्रित करतात. मात्र चिनी कंपन्या क्लाऊड कॉम्प्युटिंगपासून डिजिटल पेमेंटपर्यंत सर्व काही करण्याचा प्रयत्न करतात. असे प्रयत्न झाल्यास टेनसेंटच्या वीचॅट अॅपसारखे मोठे यश हाती येते. राजकीय सेन्सॉरशिप वगळता चीनमध्ये इंटरनेटवर फार बंधने नाहीत. याउलट फेसबुक, अॅपल आणि गुगलला दिवसेंदिवस अधिक तपास आणि चौकश्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत चिनी कंपन्या आता अन्य क्षेत्रांचेही लक्ष आपल्याकडे वेधून आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. चीनमध्ये सरकारच्या वर्चस्वाखालील अर्थव्यवस्था कमकुवत असल्यामुळे या कंपन्यांना आपला विस्तार करण्यास खूप मोठा वाव आहे. तिसऱ्या दर्जातील शहरांमध्ये विस्तारण्यासाठी पायाभूत आराखडादेखील नाही. उदा. रिटेल सेंटर. चीनमध्ये तर १२ लाख लोकांमागे एक मॉल आहे.  
 
देशांतर्गत मोठी बाजारपेठ असली तरी चीनमधील अलिबाबा, टेनसेंट आणि बायदू या तीन कंपन्या आपापसातील स्पर्धेत अडकल्या आहेत. परिणामी दोन कंपन्या वेगाने विस्तारत आहेत, तर बायदू पिछाडीवर आहे. २०१६ मध्ये बाजारात तिचा एकूण वाटा फक्त ६.३ टक्के एवढा झाला. आता ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑनलाइन व्हिडिओ, व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड टेक्नोलॉजी, ऑनलाइन व ऑफलाइन सेवेत टिकून राहण्यासाठी पैसा खर्च करत आहे. मात्र पाच वर्षांनंतर कंपनीकडून फार काही अपेक्षा केल्या जाऊ शकत नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.  
उर्वरित दोन कंपन्यांमध्ये टेनसेंट आघाडीवर आहे. या कंपनीचे उत्पन्न आणि केवळ नफा अलिबाबापेक्षा जास्त आहे. जेडी डॉट कॉममधील सहभाग हे या कंपनीचे सर्वात मोठे बलस्थान आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ई-कॉमर्स फर्म आहे. अमेरिकेतील कंपन्यांप्रमाणे ही कंपनी वेअरहाऊस, कुरिअर, लॉजिस्टिकवर मोठा खर्च करते. मागील वर्षी या कंपनीची उलाढाल २८ अब्ज डॉलर्सवरून ३७.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. बिझनेसपासून ग्राहकांपर्यंत या कंपनीची भागीदारी १८ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढली. देशातील पायाभूत सेवांमध्ये कंपनीची गुंतवणूक चांगले परिणाम देऊ लागली तर देशांतर्गत बाजारात अलिबाबाच्या प्रगतीला खीळ बसू शकते.  
 
दुसरीकडे अँट फायनान्शियल हे अलिबाबाचे मुख्य अस्त्र आहे. अलिबाबानेच २०१४ मध्ये २५ अब्ज डॉलर खर्च करून न्यूयॉर्कमध्ये या कंपनीची स्थापना केली. या कंपनीद्वारे ऑनलाइनपासून गुंतवणुकीची उत्पादनेही पुरवली जातात. चीनमधील सीसेम क्रेडिट ही चीनमधील सर्वात पहिली क्रेडिट स्कोअरिंग एजन्सीदेखील याच कंपनीची आहे. चीनमध्ये या कंपनीचे ४५ कोटी ग्राहक आहेत. थायलंड, फिलिपाइन्स, सिंगापूर आणि दक्षिण कोरियात या कंपनीच्या ऑनलाइन पेमेंट फर्म्स आहेत. दोन्ही कंपन्या जागतिक स्तरावर मोठमोठी आश्वासने देत आहेत. त्यानुसार काही पावलेदेखील उचलली जात आहेत. मात्र देशांतर्गत बाजाराकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. २०२० पर्यंत चीनमधील देशांतर्गत बाजार दुपटीने वाढून १.७० खर्व डॉलरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे सध्या तरी चीनच्या इंटरनेट कंपन्यांची उपेक्षा करणे परवडणारे नाही.
 
विस्तारासाठी भारतीय बाजारपेठ
अलिबाबा आणि टेनसेंटची स्पर्धा शेजारी राष्ट्रांच्या बाजारातही दिसून येते. या महिन्यात ई-बे आणि मायक्रोसॉफ्टसोबत टेनसेंटने फ्लिपकार्टमध्ये १.४० अब्ज डॉलर गुंतवले. फ्लिपकार्ट हा भारतातील सर्वात मोठा ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म आहे. अलिबाबा आणि अँटने पेटीएम या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीत ९० कोटींची गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारीत पेटीएमने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियाचा सामना करण्यासाठी अलिबाबाच्या टीमॉलसारखे ई कॉमर्स पोर्टल लाँच केले. यासोबतच टेनसेंटने वीचॅटच्या माध्यमातून युरोपमध्ये कंपन्यांना उत्पादने विक्री करण्याचे माध्यम उपलब्ध करून दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...