आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर खड्डे पडणारच नाहीत असे ब्रिटिश तंत्रज्ञान विकसित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अनेक देशांत रस्ते तयार करण्यासाठी काँक्रीट किंवा डांबराचा वापर केला जातो. नेहमी पावसाच्या पाण्यात किंवा पूर आला की हे रस्ते खराब होतात. आता यावर उपाय सापडला आहे. लाफार्ज टर्मेक या ब्रिटिश कंपनीने रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे जे खड्डे पडतात त्यावर एक तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डेच पडणार नाहीत.

हे एक टॉपमिक्स पर्मीबल असून एक नवे सुपर अॅर्ब्जामेंट काँक्रीट आहे. यावर कितीही पाणी ओतले तर काही मिनिटांतच ते शाेषून घेते. पूर आला तरी हे सिमेंट पाणी शोषून घेते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतच नाहीत. एका मिनिटात ९०० गॅलन पाणी शोषून घेण्याची याची क्षमता अाहे. कंपनीने असे सिमेंट तयार करण्यासाठी मोठाले खडे वापरले. याचा एक थर काँक्रीटच्या लेव्हलवर चढवला जातो. एकदा ते पेस्ट झाले की रस्त्यास कसलेही नुकसान पोहोचत नाही. काँक्रीटच्या पाणी शोषून घेण्याने जे पाणी रस्त्याखाली साचते ते या रस्त्याखालीच बांधण्यात आलेल्या पाइपलाइनमधून वाहून जाते. यामुळे काँक्रीटची पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते. यामुळे शहरी भागातच नव्हे तर पुरापासूनही आता निश्चित बचाव करता येतो. शिवाय उन्हाळ्यातही हे रस्ते तापत नाहीत.

कंपनीचा दावा आहे की, हे तंत्र डांबर आणि काँक्रीट दोन्ही प्रकारच्या रस्त्यावर उपयुक्त ठरेल. खूप पाऊस पडला तरी हे तंत्र पाणी साचवून ठेवते. यामुळे रस्ता थंड राहतो आणि रस्त्यासाठी उपयुक्त ठरतो. खेळाची मैदाने आणि मोठ्या परिसरासाठी हे तंत्र महत्त्वाचे ठरेल.