आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Column About Five Stages In Life For The Investment

जीवनाच्या ५ टप्प्यांत गुंतवणूक कशी असावी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर कोणी आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल तर आयुष्यात अडचणी कमी येतात; परंतु नोकरी पेशातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील कशा? आयुष्याकडे पर्सनल फायनान्सच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पाच टप्पे महत्त्वाचे आहेत. यात गुंतवणूक योग्य प्रकारे केल्यास अडचण होणार नाही.

आयुष्य जर पाच टप्प्यांत विभागले तर तुम्हाला कोणत्या वेळी किती रकमेची गरज पडेल याची कल्पना येईल. या रकमेची तरतूद अाधीपासूनच करता येऊ शकते.
पहिला टप्पा नोकरी लागण्याचा असतो. हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. करिअरची सुरुवात असते. व्यक्ती स्वावलंबी झालेली असते. या वेळी एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत निधीचे कोणी नियोजन करत असेल तर त्याला आईवडिलांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. उलट वेळ पडल्यास आईवडिलांना तो मदत करू शकतो. यासाठी सहा ते आठ महिन्यांचा आकस्मिक निधी तयार करता येतो. एक आरोग्य विमा काढल्याने आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्यास त्या खर्चाचा बोजा तुमच्यावर येत नाही. बचतीवर परिणाम होईल, अशी विम्याची रक्कम असू नये. आपल्या कामानुसारही विम्याचे स्वरूप ठरवता येते. तरुण वयात प्रीमियमही कमी येतो.
दुसरा टप्पा करिअर बदलाचा. काही व्यक्ती नोकऱ्या बदलत असतात. एक तर सध्याच्या नोकरीत ते संतुष्ट नसतात किंवा पगार वाढवून मिळाल्यास नोकरी बदलतात. ज्यांच्यावर आईवडिलांची जबाबदारी असते ते आणीबाणीच्या परिस्थितीत उपयोगी पडण्याइतक्या रकमेची तरतूद झाल्यानंतर ४- ६ महिन्यांनी नोकरी बदलू शकतात. नवीन नोकरी मिळण्यास विलंब लागत असेल तर निदान ८ महिन्यांपर्यंत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. या निधीमुळे तुमचा महिन्याचा खर्च भागवला जाऊ शकतो. नवी नोकरी मिळाल्यानंतर पगारवाढ झाली असेल तर पुन्हा असा निधी उभा करू शकता. वाढीव रकमेतून आरोग्य आणि मुदती विमा योजनेमुळे अचानक समोर येणारा खर्च भागवता येतो.
तिसरा महत्त्वाचा टप्पा लग्नाचा असताे. तुमच्या घरात आणखी एक सदस्य येतो. जीवनशैली बदलते. आतापर्यंत एकट्याची सुरक्षा असते. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यांचा प्रश्न असल्याने बहुतांश व्यक्ती विमा काढतात. मुलांच्या जन्माआधी त्यानुसार नियोजन केले जाते. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी पैसे बचत करावे लागतात. लग्नानंतर हळूहळू बचत वाढवावी लागते.
आयुष्यात सर्वात महत्त्वाचा चौथा टप्पा बाळाचा जन्म असतो. या आनंदाबराेबरच त्याची जबाबदारी वाढते. त्याचाही आरोग्य विमा काढावा लागतो. याशिवाय मुलाच्या नावाने किंवा त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्या लहानपणापासूनच बचत करणे सुरू करावे. अनेक जण मुलांसाठीच्या बचत योजनेत पैसे गुंतवतात. काही पैसे यात गुंतवले जातात. मूल येण्यापूर्वीच पती-पत्नी दोघांचाही विमा काढलेला असावा. यामुळे परिवाराची सुरक्षा होते. मूल होण्याआधीच अशा प्रकारचे नियोजन केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.
अंतिम टप्पा निवृत्तीचा असतो. वरच्या चार टप्प्यांपेक्षा हा महत्त्वाचा टप्पा आहे. पन्नाशी गाठेपर्यंत निवृत्तीच्या गरजांवर लक्ष केंद्रित करावे. निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला खर्चासाठी किती पैसे लागतील याचा अंदाज येतो. त्याचबरोबर इतर खर्चाचे नियोजन करून निवृत्तीसाठी तरतूद करण्याची योजना आखावी. नातवांसाठी काही भेटवस्तू देण्यासाठी तरतूद असावी. या गरजांसाठी मुलांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.

वस्तुस्थिती: भविष्याच्या दृष्टीने केलेल्या गुंतवणुकीला पर्सनल फायनान्सच्या भाषेत फायनान्शियल प्लॅनिंग फॉर स्टेजेस ऑफ लाइफसायकल म्हणतात