आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॉल ब्लायडर स्टोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॉल ब्लायडर (पित्ताशय) यकृताच्या अगदी खालच्या बाजूस असलेली पिअरसारखी पचनग्रंथी आहे. यात यकृतात तयार झालेले पित्त एकत्र येते. चरबीयुक्त भोजन पचवण्यासाठी गॉल ब्लायडर या पित्ताला आतड्यात पाठवते. पित्ताशयामध्ये खडे होतात. याला पित्तखड्याचा आजार असे म्हटले जाते.
एकूण लोकसंख्येत ९ ते १७ टक्के लोकांच्या पित्ताशयात खड्याची लक्षणे दिसून येतात. पित्ताशयात खडे होण्याचे प्रकार जगभरात वाढत आहेत. साधारणत: हा रोग ३० ते ५० वर्षांच्या महिलांमध्ये आढळून येतो. महिलांमध्ये हा आजार तिप्पट असतो. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर आणि मध्य भारतातील लोकांमध्ये सातपट अधिक आढळून येतो.

कारण - पित्ताचे खडे होण्याचे कारण आजही स्पष्ट झालेले नाही. परंतु कमी कॅलरी, झपाट्याने वजन कमी करणारा आहार तसेच खूप वेळ उपाशी राहिल्याने पित्ताशय आकुंचन पावणे बंद होते. या कारणामुळे यात खडे तयार होऊ लागतात. पित्तखडे आणि स्थूलपणा, मधुमेह, हायपरटेन्शन तसेच हायपर कोलेस्टेरोलॅमियासारख्या जीवनशैलीचा आजाराशी निकटचा संबंध असतो.

लक्षणे - सामान्यत: पित्ताशयातील खड्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. जर पित्ताच्या पिशवीत संसर्ग झाला किंवा स्टोन नलिकेत अडकला तर पोटाच्या वरच्या उजव्या भागात दुखणे, छातीच्या फासळ्याच्या खाली, पोटात मध्यभागी अचानक खूप दुखू लागणे, कमरेचे दुखणे आणि उजव्या खांद्यात दुखण्यासारखी लक्षणे दिसून येतात. पित्तखड्याचे दुखणे काही मिनिटांपासून खूप दिवसांपर्यंत असू शकते.
पित्ताशयात खडे होण्याचे परिणाम खूप गंभीर असतात. कधी-कधी प्राणघातकही ठरू शकतात.
१. पित्ताच्या नलिकेत खडा झाल्याने कावीळ आणि खूप गंभीर सर्जिकल अवस्था होऊ शकते.
२. यामुळे संसर्ग, पू होणे आणि पित्ताशयात छिद्र पडल्याने पेरिटनायटिस (पोटाच्या पडद्याचा आजार) होऊ शकतो.
३. पॅनक्रियाटिससारखी प्राणघातक स्थिती उत्पन्न होऊ शकते.
४. पित्ताशयात कॅन्सरही होऊ शकतो. या स्टोनमुळे पीडित रुग्णाच्या ६ ते १८ टक्के प्रकरणात आजीवन कॅन्सर होण्याचा धोका असतो. विशेषत: उत्तर भारतात अशा केसेस खूप आढळून आल्या आहेत.

मोठ्या खड्यामुळे पीडित रुग्णांमध्ये कॅन्सर वाढण्याची शक्यता जास्त असते, तर लहान खड्यामुळे पीडितामध्ये कावीळ किंवा पॅनक्रियाटायटिस होण्याच्या केसेस जास्त असतात.
पित्ताशयातील खड्यांची प्राणघातक लक्षणे पाहता आणखी काही वेळ वाट न पाहता आजाराचे निदान होताच यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून तुमच्या पोटात अशी स्फोटके बाळगू नका.

जर तुम्हाला पित्ताशयातील खड्याबाबत खालील लक्षणे वाटल्यास विलंब न करता डॉक्टरांना दाखवा.
पोटात इतके दुखणे की साधे बसू शकत नाही.
कातडी आणि डोळे पिवळे वाटणे.
पोटाच्या दुखण्याबरोबरच थंडी वाजून खूप ताप येणे किंवा उलटी होणे.
या आजाराची तपासणी अल्ट्रासोनिकमुळे सहज करता येते. आजाराचे निदान झाल्यानंतर यावर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपचार आहे. शस्त्रक्रियेद्वारे खड्याबरोबरच पित्ताशय काढून टाकले जाते. ते जर काढले नाही तर पुन्हा खडे होऊ शकतात.

पित्ताशय काढण्यासाठी केली जाणारी लॅप्रोस्कोपी सर्जरीला कोलेसिस्टेक्टॉमी असे म्हणतात. याद्वारे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला एक किंवा दोन दिवस रुग्णालयात राहावे लागते. पित्ताशय काढल्याने आपल्या पचनक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. कारण पित्ताशयात पित्त एकत्र न होताही आतड्यापर्यंत पोहोचू शकते. किडनी स्टोनच्या बाबतीत खडे विरघळण्याची औषधे घेऊन ती जाऊ शकतात. परंतु पित्ताशयातील खडे सहज निघत नाहीत. त्यामुळे पित्ताशयातील खडे म्हणजे किडनी स्टोन नव्हे.

आळा घालण्यासाठी घेण्याची सावधगिरी : धान्य, प्रोटीन आणि चरबीयुक्त पदार्थांचा संतुलित आहार घ्यावा. मांस, तूप, वनस्पती तूप, लोण्याचे कमीत कमी सेवन करावे. आंबट आणि कडू खाद्यपदार्थ खावेत. पचनास उपयुक्त असतात.
वस्तुस्थिती : ४० वर्षांच्या वयाहून जास्त लोकांमध्ये पित्ताशयात खडे असण्याची शक्यता जास्त असते. येथील खडे विरघळण्यासाठी औषध नाही.
लेखक कन्सल्टंट सर्जन जनरल सर्जरी, यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नोएडा येथे कार्यरत आहेत.