आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेश म्हणजे आरंभाचा पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवलोकापासून मानवी जगापर्यंत श्रीगणेशास "प्रथम स्मरण' आणि अग्रपूजेचा मान मिळाला. एका अर्थाने तो आरंभाचा पर्याय ठरला. कोणत्याही शुभकार्याची, धार्मिक कार्याची सुरुवात त्याच्या स्मरणानेच होते. गणेश चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत उत्सव असतो. यादरम्यान स्थापनेपासून विसर्जनाच्या प्रवासाचे रूपक रचले जाते.
प्रवास कितीही कठीण आणि आव्हानात्मक असला तरी त्याने उचलेले "पहिले पाऊल' चरितार्थ आणि भवितव्याची "दिशा' आणि "उद्दिष्ट'सुद्धा ठरवते.
"ज्ञान परंपरा'पासून "पौराणिक कथाजगता'पर्यंत आणि पुराणापासून एक चांगल्या सांस्कृतिक परंपरेपर्यंत श्रीमंगलमूर्तीच्या या शुभयात्रेस त्याच्या "ज्ञानात्मक सार', "पौराणिक देव' आणि "सांस्कृतिक रचनेचे विशाल भारतीय प्रागंणा'पर्यंत समजण्याची आवश्यकता आहे. गेल्या शतकात त्याच्या "रूप' किंवा स्वरूपाशिवाय एखाद्या भारतीय देवतेने कलावंतांना-मूर्तिकारांना इतके आकर्षित केलेले नाही. हजारो- लाखो प्रकारे श्रीगणेशाच्या रूपाची रचना कलावंतांनी केली आहे. या रचना इतक्या मोठ्या स्वरूपात करण्यात आल्या की, देशात काही जणांनी विविध गणेशरूपांची कलासंग्रहालये बनवली आहेत.
या रूपात असे काय आहे, ज्यामुळे कलावंतांना इतकी प्रेरणा मिळते? त्याच्या रूपाची रचना जितकी सोपी, तितकीच अवघडसुद्धा आहे. माणूस आणि प्राणी यांच्या संमिश्र रूपात एक "दिव्यत्व' आहे. त्याच्या स्वरूपाच्या रचनेत दिव्यत्वाची प्रभा रचल्याशिवाय ते शिल्प कोरे राहून जाते. या अर्थाने सर्वांना प्रिय आणि सर्वात आव्हानात्मक असा तो मनुष्य, प्राणी आणि देवतेची एक विलक्षण "समग्रता' आहे. त्याच्या रूपाच्या नव्या रचनेसाठी तो चित्रकार आणि शिल्पकारासाठी जीवनव्यापी कधीही न संपणारे असे आमंत्रण ठरताे. महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशाचा अाधार घेऊन गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा आरंभ केली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीत चेतनेचा विस्तार आणि एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मंच त्यांना तयार करावयाचा होता. श्रीगणेश "भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा' एक सखोल सांस्कृतिक प्रेरणा झाला. महाराष्ट्रापासून प्रारंभ झालेली ही प्रेरणा हळूहळू एक परंपरा बनून संपूर्ण भारतात पसरली. मंगलमूर्ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा "श्रीगणेशा' झाला. श्रीगणेश चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत गणेशपूजनाची परंपरा एका उत्सवाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आली आहे. भारतीय परंपरेत प्रत्येक ठरावीक काळासाठी एक नाव आणि एक संधी आहे. एक अनुष्ठान आहे, तर काही प्रसंग हे एक पर्व आहेत. एखाद्या विशेष दिवसाला आपण सण असे म्हणतो, तर काही आयोजन केले तर उत्सव. यांची एक सुविचारी अशी शंृखला वर्षभर चालते. देवी-देवतांच्या पूजाअर्चेबरोबरच यात एक सांस्कृतिक रचना अाणि धार्मिक विधींचा विकास झालेला आहे. येथे धार्मिक-आध्यात्मिक ज्ञान आयुष्याच्या जवळ येऊन त्या प्रेरणेपैकीच एक आनंददायी संस्कृती बनते. लाखो लोकांची श्रद्धा आणि त्यांच्या "रचनेच्या विलक्षण क्षमते'शी मिळून जीवनाची एक संस्कृती रचली जाते.
महाशिवरात्र, श्रीरामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन आणि नागपंचमी इत्यादी आपल्या धार्मिक- आध्यात्मिक परंपरांचे पर्व आहे. दसरा, दीपावली आणि होळी अशा सणांची परंपरा आहे. श्राद्ध पक्षात पितरांच्या पूजेची परंपरा अानुष्ठानिक आहे. गणेश चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत श्रीगणेश "उत्सव' आहे. काही प्रसंग हे एक पर्व आणि काही सण, काही अनुष्ठाने, तर काही उत्सव मग यात वैशिष्ट्ये कोणती?
यात एक आश्चर्यकारक संगतीही आहे. कारण ते विविध ऋतूंशी जोडलेले आहेत. नाग आणि पितर, देव आणि मातृशक्तींच्या पूजेचे हे विविध प्रसंग आणि रूपे आहेत. येथे धार्मिक श्रद्धा आणि जगण्याचे सहज अध्यात्म असते. अंतत: संस्कृतीमध्ये वसलेली असते. एका देशातील लोकांची ती जीवनप्रणाली असते. श्रीगणेशोत्सवात स्थापनेपासून विसर्जनापर्यंत जीवन प्रवासाचे एक रूपक रचले जात असते. या रूपाला विसर्जित करताना देव आपल्या अंतरात्म्यात आणि श्रद्धेमध्ये सदैव स्थापित असावा, अशी कामना आपण करतो.
वस्तुस्थितीः गणेशपुराण पाच खंडांत आहे. अंतिम खंड महादेव पुण्यकथा खंड आहेत. या खंडात सतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
लेखक हे मध्य प्रदेश आदिवासी आणि लोककला अकादमीचे माजी संचालक आहेत.