आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदानीसारखे हिरे आता सिलिकॉन व्हॅलीतील लॅबमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिलिकॉन व्हॅलीमध्ये शास्त्रज्ञांनी एक तंत्र विकसित केले असून यांच्या साहाय्याने सिंथेटिक हिऱ्यांचे उत्पादन अाधीपेक्षा अनेक पटीने वाढणार आहे. सिलिकाॅन व्हॅलीतील या संशोधनामुळे खूप मोठे बदल घडून येतील. हे कृत्रिम हिरे असून खदानीत सापडणाऱ्या नैसर्गिक हिऱ्यासारखेच चमकदार आणि सुंदर असतात. असे हिरे सध्या वापरात असून गेल्या दशकभरापासून ज्वेलरी डिझायनर याचा वापर करत अाहेत. नव्या तंत्रापासून तयार झालेल्या सिंथेटिक हिऱ्याच्या तुलनेत याची गुणवत्ता आणि चमक १५० पट अधिक आहे.

सिंथेटिक हिरे खूप अाधीपासूनच वापरात आले आहेत. ते महाग असूनही अस्सल हिऱ्यांप्रमाणे नसतात. आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्वस्त आणि नैसर्गिक हिरे तयार होत आहेत.
साधारणत: दशकभरापूर्वी सिलिकॉन व्हॅलीमध्ये आगामी काळ सोलर पॅनलचा असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तेथील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी सर्वाधिक सोलर पॅनल तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते.
परदेशात चालू असलेली स्पर्धा आणि किंमत, खास करून चीनमुळे त्यांचे स्वप्न भंगले. तरीसुद्धा काही कंपन्यांनी हार मानलेली नव्हती. नॅनोसोलर ही अशीच कंपनी असून आरंभीच्या ६ वर्षांच्या काळात ३३५० कोटी रुपये उभे करून हिरे उत्पादन करण्याचे नवे तंत्र शोधून काढले.
इंजिनिअर्स आणि शास्त्रज्ञांच्या समूहाचे नेतृत्व करणारे तसेच नॅनोसोलरचे संस्थापक आर. मार्टिन रोसेइचेन यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या फायद्यासंदर्भात माहिती दिली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आधीपेक्षा जास्त गतीने हिरे तयार केले जाऊ शकतील असे सांगितले. हे सिंथेटिक (कृत्रिम) हिरे असतात. ते तयार करण्यासाठी त्यांनी सिलिकॉन चिप आणि सोलर सेल्सचा वापर सुरू केला. यासाठी त्यांनी डायमंड फाउंडरी नावाची नवी कंपनी स्थापन केली अाहे. कृत्रिम हिरे १९५० च्या दशकात प्रथम तयार करण्यात आले होते. ते प्राकृतिक हिऱ्याप्रमाणेच असतात.
त्यांची चमक आणि सुंदरता तसेच विकण्याची अवघड प्रक्रिया यामुळे ती महागडी ठरतात. डायमंड फाउंड्री हिरे बनवण्याच्या तंत्रावर आपला मालकी हक्क सांगितला असून यामुळे उच्च गुणवत्ता असलेले हिरे लवकर, सहज आणि कमी खर्चात तयार होऊ शकतील. नव्या तंत्राच्या यशामुळे अस्सल दिसणारे हे हिरे कल्चर डायमंड कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतील. आता या कंपनीचे लक्ष्य डिस्ट्रिब्यूशन वेबसाइट करण्याचे असून जगातील प्रतिष्ठित ज्वेलरी स्टोअर्सशी यांची स्पर्धा असेल. ज्वेलरी डिझाइनरसुद्धा याकडे आकर्षित होतील. कारण अस्सल
हिरे उपलब्ध होणे आधीच्या तुलनेत कठीण झाले होते. कॅलिफोर्नियात सॅन कार्लोस स्थित डायमंड फाउंड्री कंपनीच्या समर्थकात प्रसिद्ध अभिनेते लिओनार्दो डिकेप्रियो यांचेही नाव येते. त्याने हिऱ्याच्या खाणीसंबंधी आणि उत्खननाशी असलेले योग्य मुद्दे आणि पर्यावरणाला यामुळे पाेहचणारी हानी यावर चिंता व्यक्त केली होती.
कंपनीचे संस्थापक रोसेइचेन यांनी सांगितले, त्यांनी आता सौरऊर्जा विकत घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन शून्य होईल. तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या हिऱ्यांचे उत्पादन करण्याचा त्यांचा दावा खरा ठरेल.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवलेले आर. मार्टिन रोसेइचेन हे गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज यांचे वर्गमित्र होते. नवे तंत्रज्ञान विकसित झाल्याने आता अाधीपेक्षा जास्त गतीने हिरे तयार करता येणार आहेत. याचे मटेरियल पांढरेशुभ्र असून नैसर्गिक हिऱ्याशी यांचा रंग मिळताजुळता आहे. अन्य कंपन्यासुद्धा अशा प्रकारचे तंत्र वापरात आणत आहे. परंतु डायमंड फाउंड्रीचेम्हणणे असे की, त्यांच्या टीमने सिलिकाॅन चिप आणि सोलर सेलचा वापर करून सिंथेटिक हिऱ्याच्या उत्पादनात वाढ केली आहे. डायमंड फाउंड्रीला प्लाजमा सोर्सवर
अाधारित तंत्रज्ञान नव्या पद्धतीने विकसित करण्यास अनेक वर्षे लागली. यामुळे ती सध्या वापरात असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा १० पट अधिक शक्तिशाली बनली. याचा वापर आधीपासूनच केला जात होता. प्लाजमाच्या तीव्रतेमुळे ही कंपीन सध्याच्या कंपनीत तयार होणाऱ्या सिंथेटिक हिऱ्यापेक्षा १५० पट जास्तीचा चांगला हिरा तयार करू शकते.
रोसेइचेन यांनी सांगितले, आता आम्ही खात्रीने सांगू शकतो की, पांढऱ्याशुभ्र रंगाचा १०० टक्के शुद्ध हिरा तयार करण्यात यश प्राप्त केले आहे. असा हिरा तयार करण्याची प्रक्रिया खूप पातळ चकत्याप्रमाणे असते. त्यानंतर खरे डायमंड मटेरियल आणि कार्बन आयटम थराची संख्या वाढवण्यात येते. हिरा तयार करण्याच्या अन्य पद्धती असून यात अत्याधिक दबाव आणि तापमानाचा वापर, नॅनोक्रिस्टल मिळवण्यासाठी विस्फोटकाचा वापर, मायक्रॉन
साइजचे डायमंड क्रिस्टल तयार करण्यासाठी अल्ट्रासाउंडचा वापर अशा अनेक पद्धती आहेत. ज्वेलरी निर्माता कंपन्या आधीपासूनच या तंत्राचा वापर करत आहेत.
हिऱ्यांना ग्रेड देणारी जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट आॅफ अमेरिका येथील वरिष्ठ संशोधक वूयी वांग यांनी सांगितले, सिंथेटिक हिरे बाजार खूप स्पर्धा निर्माण करतील. अनेक कंपन्यांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा घडवून नव्या प्रकारची रत्ने तयार करण्याची तयारी चालवली आहे. डायमंड फाउंड्रीतील हिरे अजून पाहिलेले नाहीत, परंतु त्यांच्यातील आणि खऱ्या हिऱ्यामधला फरक प्रयोगशाळेतच तपासता येईल.
लेखक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ
© The New York Times