आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायीः चीनमध्ये ध्यानयोगाद्वारे तणावमुक्त होताहेत गुंतवणूकदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचा मानसिक तणाव वाढला आहे. यात लोकांना दिलासा देण्यासाठी शांघायमध्ये खास योग शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिरात जाणारे बहुतांश लोक गुंतवणूकदार आहेत.
त्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शिबिरात दोन दिवसांचे सत्र घेण्यात येत आहे. कुणासही इलेक्ट्रॉनिक उपकरण आपल्यासोबत ठेवण्याची परवानगी नाही. इतकेच नव्हे तर तेथे उपस्थित लोकांना आपसात एकमेकांशी बोलण्यासही निर्बंध आहेत. शांघाय चीनचे दुसरे प्रमुख महानगर असून तेथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उलाढाल होते. तेथील एका बुद्धविहारात या शिबिराचे आयोजन करण्यात येते. बुद्धविहाराच्या व्यवस्थापनाने सोशल साइट वीइबोच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत. चार दिवसांतच ५०० हून अधिक लोकांनी अर्ज केले. तथापि, एका सत्रासाठी फक्त ६० लोकांची निवड केली जाते. या ध्यान शिबिरात तणावमुक्त होण्यासाठी आलेल्या लोकांना प्रार्थना करण्यासाठी, भोजन, बसण्याची व्यवस्था आणि झोपण्याच्या पद्धती शिकवल्या जात आहेत. या सत्रात भाग घेणाऱ्यांनी गळ्यात नो टॉकिंग कार्ड घातले आहे. जर कुणी बोलताना दिसले तर त्याला कार्ड दाखवून आठवण दिली जाते. महिला सल्लागार सू यांनी सांगितले, या शिबिराच्या आयोजनात माझा सहभाग असल्याने मी खूप समाधानी आहे. सेलफोनच्या वापराशिवाय आणि कोणाशीही न बोलता दोन दिवस या शिबिरात भाग घेताना मला आनंद होतो आहे.
thepaper.cn
बातम्या आणखी आहेत...