आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य, भव्यतेच्या हट्टापायी पुतळ्यांवर व्यर्थ खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या गोष्टीचे विशेषण म्हणून आपण सुंदर हा शब्द वापरतो. कधी-कधी हा शब्द तुलना करण्यासाठीही वापरतो. उदा. मागील वर्षी मिर्झियाँ, बेफिक्रे, फितूर या सुंदर चित्रपटांमधील गाणी अत्यंत श्रवणीय होती. या चित्रपटांतील कंटेंट, स्क्रिप्ट आणि अॅक्टिंगला कमी महत्त्व दिले गेले. परंतु खेदजनक बाब म्हणजे, आपण भडक दृश्यांशी तडजोड करतो व डोळ्यांना भव्य वाटेल अशा चित्रपटांनाच प्राधान्य देतो. मात्र, यामुळे सौंदर्य आणि दृश्यात्मक अनुभव देणारी महागडी दृश्ये आपल्यासाठी का आवश्यक आहेत, यावर आपली निर्णयक्षमता ठरत असते.
  
सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्येतून बाहेर येण्यासाठी लोक आपल्या आजूबाजूच्या वैविध्याचा स्वीकार करतात. आपण मात्र सौंदर्याबाबतचा जुना दृष्टिकोन केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित ठेवत आहोत. जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुतळ्यासाठी ३६०० कोटी रुपयांचे बजेट देणे, ही काही आदर्श पद्धत नव्हे. एवढेच नाही तर गेल्या दोन वर्षांपासून ३००० कोटींहून अधिक बजेट असलेल्या एकतेच्या प्रतिमेचे बांधकाम सुरू आहे. गुंतवणूक, देशभक्ती आणि पर्यटनाची कारणे यासाठी देण्यात आली आहेत. भारताला देशभक्ती आणि वाढते पर्यटन दर्शवण्यासाठी महागडे पुतळे आणि भडक प्रकाश संगीताच्या प्रकल्पांची गरज नाही. एवढ्या निधीतून संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मदत किंवा उत्तम अॅथलिटला आगामी स्पर्धांसाठी योग्य प्रशिक्षणासाठी पैसा पुरवता आला असता. पर्यटन वाढवण्यासाठी आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या हजारो ऐतिहासिक स्मारक व ठिकाणांना संरक्षित करता येऊ शकते. त्यामुळे भव्य, आकर्षक गोष्टींमागे धावण्याऐवजी आपण सध्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींकडेच लक्ष दिले पाहिजे. आपले हे समृद्ध वैभव उजळल्यानंतरच सौंदर्याची व्याख्या अधिक व्यापक करण्यावर भर दिला पाहिजे.
- अनिमेष सिंह कुमावत, २२, टोरंटो युनिव्हर्सिटी 
 
 
बातम्या आणखी आहेत...