आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटसृष्टीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जगाचा निरोप घ्यावाच लागतो. तरीही आपण कशा प्रकारे जीवन जगतो, हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते, असे महान व्यक्ती सांगून गेल्या आहेत. आपण ज्या उद्देश अथवा तत्त्वांसाठी जगलो अथवा जी तत्त्वे नाकारली, त्यासाठी आपण लोकांच्या लक्षात राहत असतो. अभिनेता ओम पुरी यांचे आयुष्यही सदैव स्मरणात राहावे असे होते. 
 
भारतीय चित्रपटसृष्टीला एक परिपक्व सर्वोत्कृष्ट अभिनेता गमावल्याचे दु:ख आहे. ओम पुरी यांच्या अभिनय कारकीर्दीतून नेमक्या प्रमुख भूमिका शोधणे कठीण जाते. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी फार वेळा प्रमुख भूमिका बजावल्या नाहीत. तरीही संपूर्ण चित्रपटभर त्यांच्या आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप दिसून येत होती. त्यांचा अभिनय पाहिल्यानंतर मी दरवेळी या भूमिकेत  याऐवजी दुसरा कोणता अभिनेता ही भूमिका करू शकला असता, असा विचार केला असता, त्याचे उत्तर कधीही सापडू शकले नाही. त्यांच्या अभिनयाची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ओम पुरी यांनी मोठ्या संघर्षानंतर करिअरमध्ये स्थिरता मिळवली. रंगमंचाशी प्रामाणिकता आणि जिद्द हेच त्यांच्या यशाचे गमक होते. त्यांच्या अभिनयाचा प्रवास रंगमंच, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटापासून अमेरिकन तसेच ब्रिटिश चित्रपटांपर्यंत दिसून येतो. पुरी यांचे व्यावसायिक जीवन विविध क्षेत्रांत यशस्वी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

संपूर्ण चित्रपटात ते फार कमी वेळ पडद्यावर दिसून येत असत, मात्र तेवढ्या काळातील त्यांचा प्रभाव अतुलनीय होता.ओम सर, तुमच्या योगदानाच्या आधारेच भारतीय चित्रपट आणि अनेक तरुणांचे भविष्य आकार घेईल. तुमचे कार्य आमच्यासाठी तसेच संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी आहे. परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो...
-सिद्धार्थ सचदेव, २३, आयआयएम, रायपूर 
बातम्या आणखी आहेत...