आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष नको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ नुसार एखादी व्यक्ती सभागृहात दोन जागांवर निवडून आल्यास तिला एका पदाचा त्याग करावा लागतो. अन्यथा दोन्ही पदे रिक्त होतात. एका व्यक्तीला एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता येत असल्यास मग दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचा अधिकार का? निवडणूक आयोगाने सरकारला यासंबंधीची शिफारस नुकतीच केली आहे. एका व्यक्तीला केवळ एकाच जागेवरुन निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यात केली आहे. २००४ मध्येदेखील दोन वेळा अशी शिफारस करण्यात आली होती मात्र कायदा तयार करणारे खासदार आपले हित दुर्लक्षित कसे करु शकतील? 

एखादी व्यक्ती दोन जागांवर जिंकली तर फेरनिवडणूक होणार हे निश्चित. यामुळे सरकारी तिजोरीसह मानवी क्षमतेवरही ताण पडतो. तसेच दोन जागांवर एकच उमेदवार उभा राहिल्यास पक्षातील अन्य सदस्यांच्या बाबतीत अन्याय होतो. लोकांच्या भावना दुखावतात, ते वेगळच. दोन जागांवर निवडणूक लढवण्याचा उद्देश आपली लोकप्रियता दाखवण्याचा असो वा कोणत्याही एका जागेवर विजय मिळवण्याचा असो. सामान्य नागरिकांवर ताण तर पडतोच. निवडणूक आयोगाच्या शिफारशीचा गांभीर्याने विचार केल्यास यामुळे पक्षातील अनेक सदस्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल. यामुळे लोकशाही मजबूत होईल. 

भारतातीत लोकशाही ही जगातील सर्वात मोठी व्यवस्था आहे. त्यामुळे लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवडणूक आयोगाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींनी आपला फायदा बाजूला ठेवून जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाची ही शिफारस मान्य करावी. एवढेच नाही, तर यावर  लवकरात लवकर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

- कुलदीप यादव, २२, एमबीए, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, रोहतक
बातम्या आणखी आहेत...