आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिपूजेला महत्त्व देणाऱ्यांना वेळीच ओळखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या केंद्रीय तसेच प्रादेशिक राजकारणात व्यक्तिवाद शीर्षस्थानी असल्याचे दिसते. याची दोन मोठी उदाहरणे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल. एकीकडे भारतीय राजकारणाच्या इतिहासात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मनमोहनसिंगांसारख्या नेत्यांनी स्वत:चा उदोउदो न करता देशहितासाठी कामे केली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केजरीवाल सतत ब्रेकिंग न्यूजमध्ये आहेत. आपला प्रभाव वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणाऱ्या या दोघांमध्ये एक धागा समान आहे. पक्षावर अधिपत्य कायम राखण्यासाठी ते प्रत्येक क्षणी सजग आहेत. यासाठीच मोदींनी अमित शहांना पक्षाध्यक्ष बनवले, तर केजरीवाल यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना आम आदमी पार्टीतून काढून टाकले. इतर नेत्यांवर वैयक्तिक टिप्पणी करण्याचा दोघांचा स्वभाव आहे.

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या घोषणेवरच केजरीवालांना जनतेचे समर्थन मिळाले होते. मात्र नोटाबंदीचा निर्णय होताच केजरीवालांचा मुख्य आधारच डळमळला. त्यामुळे सामान्यांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींचे कारण देत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय वापस घेण्याची मागणी केली. आश्वासनांना न जागण्यात केजरीवाल पटाईत आहे. भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण मंत्री बनण्यासाठी राजकारणात आलो नाही तर जनतेला सत्ता देण्यासाठी आलो आहोत, असे वक्तव्य केले होते. मात्र आज केजरीवाल स्वत: तर मंत्रिपदी आहेतच, शिवाय त्यांच्या नातेवाइकांनाही मोठमोठी पदे मिळत आहेत. पंतप्रधान बनण्याच्या ईर्षेने जाती, धर्माचाही वापर ते करत आहेत.
एकूणच यापुढे देशातील जनतेला अशा प्रकारे व्यक्तिपूजा किंवा वारशाचे राजकारण करणाऱ्या नेत्याला निवडून देणे महागात पडू शकते. अनुभवी नेते आणि विचारवंतांच्या योगदानातूनच भारताची प्रगती होणे शक्य आहे.

अंकुर चौहान, २८
रिसर्च स्कॉलर, आयआयएम, रोहतक
बातम्या आणखी आहेत...