आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर मिळो अथवा न मिळो, योग्य ठिकाणी प्रश्न पडलेच पाहिजेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूच्या राजकारणाने आता नवे वळण घेतले आहे. अण्णा द्रमुकचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांच्याप्रमाणेच जयललितांचेही मुख्यमंत्रिपदी असतानाच निधन झाले. भारतीय राजकारणात मायावती, ममतांनी आपला जम बसवण्याच्या अनेक वर्षे आधीपासूनच जयललिता राजकारणात मुरल्या होत्या. राजकारणातील त्यांच्या धोरणांवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत असली तरी अडचणींवर मात करण्याची क्षमता अतुल्य होती. जयललितांच्या उदाहरणावरून असे म्हणता येईल की, वैवाहिक स्थितीमुळे किंवा केवळ स्त्री असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत, ग्रामीण भागातील महिलांवर आजही बंधने आहेत, असे अनेक जण म्हणतात. मात्र शहरी मुलींना शिक्षणासाठी अनेकदा आपले शहर सोडून अन्य शहरात जाता येत नाही. अनेक मुलींना करिअर करण्याऐवजी लग्न करून शिक्षण, नोकरी बंद करण्यास भाग पाडले जाते. देवी-देवतांची पूजा करणारे भारतीय नागरिका राजकारणात महिला नेत्याला निवडून देऊ शकतील, पण कुटुंबातील महिलांबाबतीत त्यांची वर्तणूक जैसे थेच आहे.

महिलांना समान संधी देण्याबाबत मी फार सांगणार नाही, मात्र त्यावर अंमलबजावणी कशी करायची याविषयी काही सांगेन. आपले विचार याबाबतीत किती बदलले आहेत याचे सोपे सूत्र म्हणजे ‘प्रश्न विचारणे.’ तुमच्याकडे जितके अधिक प्रश्न तितके चांगले. आपण रूढी-परंपरा, वर्तणुकीवर प्रश्न विचारले पाहिजेत. या प्रश्नांना पुरातन काळापासून चालत आले आहे, पुस्तकांमध्ये लिहिले आहे याऐवजी काही पटणारे, ठोस कारण असले तर सर्वकाही योग्य सुरू आहे, असे समजावे. उदा. लग्नानंतर महिला आपले घर सोडून पुरुष जोडीदाराच्या घरी का जाते? लग्नानंतर त्या आपले आडनाव का बदलतात? या प्रथांमध्ये काही तथ्य आहे का हे मला माहीत नाही. असले तरी खूप कमी लोकांना याची कारणे माहिती असतील. अशा समस्यांवर एक अमेरिकन म्हण खूप प्रसिद्ध आहे. तिचा अर्थ असा की, ‘योग्य उत्तर मिळो अथवा न मिळो, पण आपल्याकडे कमीत कमी योग्य प्रश्न तरी हवाच!’

- दिवाकर झुरानी, २७, द फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी टफ्ट युनिव्हर्सिटी, अमेरिका
बातम्या आणखी आहेत...