आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरिया हल्ला: पश्चिम आशियातील राजकारण चिघळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी पहाटे सिरियावर हल्ला करण्याच्या मुद्द्यावरून हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प प्रशासनाला आव्हान देण्याचे वृत्त ऐकले तेव्हा माझी झोपच उडाली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमध्य सागरातून ५९ टॉमहाॅक क्षेपणास्त्राद्वारे सिरियाच्या शरयत विमानतळावर हल्ला करण्याचे ठरवले होते. याच ठिकाणाहून काही महिन्यांपूर्वी असद यांच्या लष्कराने बंडखोरांवर भयंकर रासायनिक हल्ला केला होता.
 
अमेरिकेच्या पूर्वीच्या धोरणापेक्षा ट्रम्प यांचे  हे पाऊल परस्परविरुद्ध होते. कारण बराक ओबामा यांनी २०१३ मध्ये सिरियाच्या यादवीत हस्तक्षेप न करण्याचे ठरवले होते व त्यांनी असाद यांना रासायनिक शस्त्रे वापरण्याची  विनंती केली होती. तसेच याप्रकरणी सामोपचाराने मार्ग काढण्याचे  सुचवले होते. ओबामांच्या या धोरणाला ट्रम्प यांचा पाठिंबा होता. पण आपण असद किंवा सिरियाच्या विरोधात नाही, असे ट्रम्प यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. 

काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनीही सिरियातून असाद यांची राजवट उद्ध्वस्त करणे हा ट्रम्प प्रशासनाचा उद्देश नाही, असे म्हटले होते. पण परवाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे ट्रम्प यांच्या भूमिकेतील विरोधाभास दिसला. याबाबत ट्रम्प म्हणाले की असाद यांनी अनेक मर्यादांचे उल्लंघन केले आहे. मला वाटते की, ट्रम्प यांनी वापरलेला हा मार्ग कमी जोखमीचा आहे. कारण ही क्षेपणास्त्रे मानवरहित असतात.  

रशिया आणि सिरिया या हल्ल्याला प्रत्युत्तर देतील, तेव्हा सिरियातील यादवीचे परिणाम समोर दिसतील. पुतीन यांनी अमेरिकेच्या हल्ला करण्याच्या कृतीवर टीका केली आहे.  तसेच सिरियाला सर्व  हवाई सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. इराणनेही अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यामुळे पश्चिम आशियात आणखी तणाव वाढू शकतो. अमेरिकेविरोधात इराण, सिरिया, रशिया अशी युती होऊ शकते.
 
- अभिषेक रखेजा, २०, एडिनबरा विद्यापीठ, ब्रिटन 
बातम्या आणखी आहेत...