आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केलेनिक यांच्या राजीनाम्यानंतर उबेर स्टार्टअपसमोरील आव्हाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) ट्रेविस केलेनिक यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या मागील आठवड्यात झळकल्या. सर्वात मौल्यवान स्टार्टअपचे सीईओ गेल्यानंतर आता ही कंपनी चालू शकेल की नाही, अशी शंका घेतली जात होती. आता नव्या सीईओंकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उबर २.० म्हटली जाईल. 
 
उबेरमधून जबरदस्तीने केलेनिक यांना हटवल्यानंतर कंपनीने तत्काळ एक धोरण बदलले. त्यानुसार प्रवासी उबेरचालकांना टिप देऊ शकतील. विशेष म्हणजे कंपनी टिप देण्याच्या परस्परविरोधी मताची होती. चालकांना टिप देण्यासाठी उबर अॅपमध्ये पर्याय दिला जाईल. अमेरिकेत पुढील महिन्यापासून यावर अंमलबजावणी सुरू होईल. केलेनिक यांच्या नेतृत्वातील कंपनीचे वक्तव्य होते की, टिप देण्यामुळे हेवेदावे निर्माण होऊ शकतात. कंपनीने कॉर्नेल विद्यापीठातील एका संशोधनावरही प्रकाश टाकला होता. त्यानुसार प्रवासी श्वेतवर्णीयांपेक्षा कृष्णवर्णीयांना जास्त टिप देतात. अॅपमध्ये टिपचा पर्याय दिल्यामुळे वंशभेद वाढीस लागेल, असे कंपनीचे त्यावेळचे मत होते.  

कदाचित यामुळेच केलेनिक आणि उबरच्या २० लाखांहून अधिक चालकांदरम्यान तणावपूर्ण संबंध होते. अधिकृतरीत्या हे चालक उबेरचे कर्मचारी नाहीत, मात्र त्यांचे वेतन उबेरच्या धोरणांवर अवलंबून असते. लॉस एंजलिस येथील ‘द राइड शेअर गाय’ (चालक उपलब्ध करून देणारी संस्था) चे संस्थापक हॅरी कॅम्पबेल म्हणतात, उबरमधील नियम केलेनिकच बनवत होते, मात्र चालकांना दोषी ठरवले जात होते. टिपचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण यामुळे ज्यादा उत्पन्नापासून आम्हाला वंचित ठेवले जाते, 

असे चालकांचे मत आहे. प्रवासी टिपची रक्कम रोखीतही देऊ शकतात. पण बहुतांश जण असे करत नाहीत. न्यूयॉर्कमध्ये उबरच्या चालकांच्या ‘इंडिपेंडंट ड्रायव्हर्स गिल्ड’ या समूहाने टिपची सुविधा देण्याच्या मागणीसाठी ११ हजार चालकांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या आहेत.  

अमेरिकेत ‘लिफ्ट’ ही उबरची स्पर्धक कंपनी चालकांच्या पसंतीची असल्याचे म्हटले जाते. उबर आणि कंपनीच्या चालकांमधील तणावाचा फायदा लिफ्ट घेत असते. यापासून धडा घेत उबेरने आता चालकांसोबतचे संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या जुन्या मागण्याही ऐकून घेतल्या जात आहेत. ‘इंडिपेंडंट ड्रायव्हर्स गिल्ड’चे संस्थापक जिम कॉनिग्लिएरो हे उबरमधील प्रस्तावित बदलांमुळे समाधानी आहेत.  

- उबेरच्या नव्या सीईओंसमोर सुधारणेसाठी अनेक आव्हाने असतील. तत्पूर्वी त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक आहे. नव्या सीईओंना कंपनी आणि चालकांमधील संबंध सुधारावे लागतील, अन्यथा उबेर २.० ची स्थिती पुन्हा १.० अशीच होईल. © The New York Times
बातम्या आणखी आहेत...