आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वकाही संगणकीकृत... पण सुरक्षेचे काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वकाही संगणकीकृत होण्याच्या बातम्यांपासून दूर दुसरेही एक जग आहे. तिथे संगणकाद्वारे जबरदस्तीने वसुली, किरायाने हॅकिंग, चोरलेल्या डिजिटल साहित्याची विक्री करण्याचा धंदा काळ्या बाजारात चांगलाच फोफावतोय. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. कारण आजकाल संगणक केवळ क्रेडिट कार्डचे विवरण किंवा ठोकताळे मांडण्यापर्यंत मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांचा संबंध दैनंदिन भौतिक सुविधा देण्यासह मानवी शरीरातील प्रवेशापर्यंत येत आहे. स्वयंचलित कार हे चाकांवर चालणारे आणि विमानसुद्धा पंखांद्वारे उडणारे संगणकच आहे.  

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (विविध उपकरणे अथवा वस्तू संगणक जाळ्याशी जोडण्याची संकल्पना) मुळे वाहतुकीच्या चिन्हांपासून, एमआरआय स्कॅनर, कृत्रिम अवयव व इन्सुलिन पंपातही संगणकाचा प्रवेश झाला आहे. डेस्कटॉपच्या तुलनेत ही उपकरणे कितपत विश्वासार्ह आहेत, याची काहीच हमी नाही. कनेक्टेड कार आणि पेसमेकर्सवर दूरूनच नियंत्रण ठेवता येते,  हे हॅकर्सनी अनेकदा सिद्ध केले आहे.   

अनेक कंपन्या अजूनही सायबर सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत, हेदेखील एक वास्तव आहे. ‘बग बाउंटी’सारखे संरक्षक प्रोग्राम्स प्रत्येक कंपन्यांनी घेतले पाहिजेत. या प्रक्रियेअंतर्गत उणिवा शोधण्यासाठी कंपन्या इथिकल हॅकर्सना प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून कंपन्यांना काही नुकसान होण्यापूर्वीच सुरक्षेसंदर्भातील त्रुटी दूर केल्या जातात. संगणकाला संपूर्ण सुरक्षा कवच देणारा कोणताही प्रोग्राम अद्याप अस्तित्वात नाही. सॉफ्टवेअर तर खूपच गुंतागुंतीचे असतात. गुगलला तर आपल्या सर्व उत्पादनांसाठी सोर्स कोडच्या दोन अब्ज ओळींवर लक्ष ठेवावे लागते. त्यात एखादी तरी चूक होणे स्वाभाविकच आहे.  
प्रोग्राम्समध्ये साधारणत: १४ उणिवा असतात. अवैध प्रवेशाची शक्यता ही त्या सर्वात समान असते.

 फसवेगिरी, अपघात, नैसर्गिक आपत्ती कधीही न संपणाऱ्या समस्या आहेत. मात्र, त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी नियम, कायदे, सुरक्षेची हमी देणारे विमा नियम विकसित करण्यात आले आहेत. नियमांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या समस्यांची स्थिती आणखी बिकट होऊ नये, याला सरकारचे प्राधान्य असते. सेंट पीटर्सबर्ग आणि लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वैयक्तिक स्तरावर काय हालचाली होत आहेत, हे तपासण्यासाठी सुरक्षा संस्थांना व्हॉट्सअॅप तसेच अन्य सेवांची एनक्रिप्शन (सांकेतिक भाषा) शिथिल करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, एनक्रिप्शनची जी सुविधा व्हॉट्सअपला आहे, तीच बँकिंग तसेच पैशांच्या ऑनलाइन व्यवहारांनाही आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी पुढील उपाय सुचवता येतील. 
 
- सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध देशांतील सरकारनी प्रयत्न केले पाहिजेत. 
- इंटरनेट उपकरणात त्रुटी आढळल्यास त्या अपडेट करण्यावर भर दिला पाहिजे. 
- वापरकर्त्याने डिफॉल्ट युजरनेम आणि पासवर्ड सतत बदलणे आवश्यक आहे. 
- काही अमेरिकन राज्यांप्रमाणे रिपोर्टिंग कायदा लागू केला पाहिजे. याअंतर्गत उपकरण हॅक झाल्यास ते जाहीर करणे कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. यामुळे उणिवा दडपून ठेवण्याऐवजी त्यावर उपाय शोधून काढण्यास प्रोत्साहन मिळेल.  

संगणक वापरताना संपूर्ण सुरक्षा नसणे ही नित्याची बाब आहे. यावर शोधण्यात आलेले उपायही खूप कमकुवत आहेत. अनेकदा हॅकर्समुळे उपकरणाच्या मालकाला नुकसान होतच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक दशकांपासून सॉफ्टवेअर कंपन्या आपले उत्पादन अपयशी ठरल्यास त्याची जबाबदारी घेण्यास तयार नसतात. या धोरणाचे कंपन्यांनाही अनेक फायदे होत असतात. सदोष असली तरी नवनवीन उत्पादने बाजारात आणण्याची कंपन्यांना परवानगी असते. कारण त्याशिवाय सिलिकॉन व्हॅलीत नित्यनूतन प्रयोगांसाठी आवश्यक असलेले  ‘गो फास्ट अँड ब्रेक थिंग्ज’ धोरण यशस्वीच होणार नाही. कायद्यानुसार कंपन्यांना उत्तर देणे बंधनकारक नसले तरी जनता उत्तर मागणारच. कार कंपन्यांनीही अनेक वर्षे सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. मात्र, १९६५ मध्ये ‘अनसेफ अॅट एनी स्पीड’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर िवविध सरकारनी तत्काळ सीट बेल्ट, हेडरेस्ट आणि अन्य गोष्टींबाबत कठोर नियम लागू केले. 
 
एकूणच, सायबर सुरक्षेचे वाढते क्षेत्र संगणक क्षेत्रातील नूतनाविष्कार क्षमतेला प्रोत्साहन व सुरक्षा देत ग्राहकांनाही संरक्षण देत आहे. पुढील काही दिवसांत ज्या कंपन्यांची उत्पादने योग्य काम करत नाहीत, वारंवार हॅक होतात, त्यांचे प्रीमियम वाढत जाईल. यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनातील त्रुटी दूर करणे क्रमप्राप्त होईल.  
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
बातम्या आणखी आहेत...