आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वेच्या तडाख्यात का कोसळली अमेरिकी व्यवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्वे वादळासंदर्भात तेथील वैज्ञानिकांनी पूर्वीच तेथील सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता. तथापि, वादळाचा सामना करण्यासाठी उभी करण्यात आलेली व्यवस्था, तंत्रज्ञान पाण्यात वाहून गेले. या वादळाच्या तडाख्यात सापडून ३८ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. अमेरिकेसारख्या देशासाठी ही असामान्य बाब होती. कित्तेक ट्रिलियन डॉलर संपत्तीचे नुकसान झाले. विनाशकारी वादळाची कल्पना होती तर परिस्थिती हाताळण्याचे गंभीर प्रयत्न का झाले नाहीत? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. टेक्सास सारखे संपूर्ण राज्यच पाण्यात बुडाले. अमेरिकी व्यवस्था वादळाचा तडाखा सहन करण्याच्या स्थितीत नाही? 
 
टेक्सासमधीलरहिवाश्यांना आता वेगवेगळ्या पद्धतीने धीर दिला जातोय. एक दिवस असे वादळ येणार की चोहोबाजुला केवळ पाणी आणि पाणीच राहणार, असा दाखला बायबलमध्ये दिला जातो. तथापि, हार्वे वादळाची तीव्रता बरीच कमी होती. तरीही ३८ पेक्षा अधिक लोक मृत्यूच्या दाढेत सापडलेत. अमेरिकेसारख्या तंत्रज्ञान संपन्न महाशक्तीसाठी ही असामान्य बाब आहे. अमेरिकी प्रशासन आणि वैज्ञानिक या वादळाच्या आकलनात अयशस्वी का ठरलेत? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. येणाऱ्या काळात काय घडणार, याचे आकलन होण्यासाठी कुठलेही तंत्रज्ञान नव्हते काय? अमेरिकडेकडे असे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे दावे केले जायचे. 

जगाच्या पाठिवर वेगवेगळ्या भागात वादळांची आपापली भीषणता असते. १९९८ च्या मिच वादळाची आकडेवारी पाहिल्यास या वादळाने मध्य अमेरिकेत हाहाकार माजविला होता. त्यावेळी ११ ते १९ हजारांच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले होते. हॉन्डूरस आणि निकारागुआ चे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होते. त्यानंतर दशकभराच्या कालावधीनंतर नरगीस चक्रीवादळाने म्यानमारनं विनाश अनुभवला. त्यात सुमारे लाख ३८ हजार लोक मारले गेले होते. वादळ,भूकंप, भस्खलन, दुष्काळ, महामारीसारख्या नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी करता येत नाही. त्यांचा प्रभावही वेगवेगळा असतो. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये हार्वे वादळासारख्या आपत्तीने होणारे नुकसान प्रत्यक्ष किमतीच्या तुलनेत अधिक मोजले जाते. 

अमेरिकी सरकारचे आकडे पाहिल्यास १९४० ते २०१६ दरम्यान आलेल्या भयावह वादळांमध्ये हजार ३४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वर्षात सरासरी ४२ लोक मारले गेलेत. बांगलादेशात १९९१ मध्ये आलेल्या वादळात लाख ४० हजार लोक मृत्यूमुखी पडलेत. नैसर्गिक आपत्तींचा सामना विकसित राष्ट्र आर्थिकदृष्टीने कमकुवत देशांच्या तुलनेत कशा पद्धतीने करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. केवळ चांगल्या नियमांमुळेच असे होत नाही, हे मी सांगू शकतो. माझा जन्म मेक्सीको शहरातला. १९५७ मध्ये तेथे आलेल्या भयावह भूकंपाच्या आपत्तीनंतर इमारतींच्या कोडींग चा नियम सक्तीने लागू करण्यात आला. त्यानंतरही १९८५ मध्ये आलेल्या भूकंपातून शहर वाचविता आले नव्हते. त्यानंतर लक्षात आले की कोडींगच्या त्या नियमाकडे भ्रष्ट अधिकारी, इमारत निरीक्षकांनी कित्तेक वर्षे चक्क दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून हजारो लोक इमारतीच्या मलब्याखाली सापडून मृत्यूमुखी पडलेत. त्यामुळे नियमांचे पालन होत असेल तरच ते चांगले किंवा वाईट ठरतात. 

हार्वे वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या टेक्सासमध्ये देखील असेच बघायला मिळाले. तेथे शासकीय जबाबदारी आणि मदतकार्य करण्यात लोकांच्या उत्साहाचे वेगवेगळे रंग दिसते. लाकूड आणि बांबूच्या तुलनेत विटा आणि काँक्रीटने बांधलेली घरे जास्त सुरक्षित असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. यात घर बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विषय पुढे येतो. हार्वे वादळात हजारो घरे उध्वस्त झाल्याचा निष्कर्ष पुढे येऊ शकतो. मात्र, परिसरातील सारीच घरे वादळात वाहून जातील, असेही होत नाही. संशोधनाच्या क्षेत्रातील मुडी या फर्मच्या अंदाजानुसार हार्वे वादळामुळे ह्युस्टन शहराचे ५०३ ट्रीलियन डॉलरच्या नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती किमान दोन महिने मंदावणार असल्याचे अंदाज आहेत. कोलोरॅडो विद्यापीठाचे रॉजर पिल्क यांच्या मते या वादळामुळे झालेल्या नुकसानाची तुलना जागतिक आधारावर केल्यास ते जवळपास ०.३ टक्के आहे. आर्थिक उन्नतीत पर्यावरणाचे भान राखले जात नसल्याने अशा नैसर्गिक आपत्ती येतात, असे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना वाटते. हेना रिची आणि मॅक्स रॉजर यांच्या अभ्यास अहवालानुसार पृथ्वीचे तापमान वाढत असतानाही वादळात मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. नव्वदच्या दशकात जो दर प्रति लाख ०.११ एवढा होता, तो २०१० च्या दशकात ०.४ एवढा झाला आहे. आर्थिक प्रगतीपायी केवळ पार्कींग ची जागाच वाढलेली नाही तर सुरक्षेची मानके आणि वैज्ञानिक शोधकार्यातही सुधारणा झाल्या. पाण्याचा निचरा होण्याच्या जागा आणि सांडपाणी संयंत्रांच्या निर्माणाला चालना मिळाल्या. आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीला कितीही हातभार लावला तरी नैसर्गिक अनियमिततांतून बचाव शक्य होत नाही, हा आमच्या काळातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे हार्वे वादळही आश्चर्यजनक वाटून गेले. 

- ब्रेट स्टीफन्स, पुलित्झर पुरस्कार विजेते 
बातम्या आणखी आहेत...