आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाच्या मार्मिक अध्यायाचा अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी रती पेटिट यांच्यासह महंमद अली जिना आणि मुलगी दीना. - Divya Marathi
पत्नी रती पेटिट यांच्यासह महंमद अली जिना आणि मुलगी दीना.

दीना जेव्हा आपल्या वडिलांच्या कबरीवर गेल्या तेव्हा त्यांनी म्हटले होते, मला एकटीला सोडा,  येथे मला एकांत हवा आहे. तेथे अभ्यागतांसाठी ठेवलेल्या अभिप्राय पुस्तकात दीनाने लिहिले, हा माझ्यासाठी दु:खद दिवस आहे -  त्यांचे स्वप्न पूर्ण करा. त्यांचे स्वप्न पूर्ण करा. कोणी काहीही न म्हणता मागील सत्य आणि ते दिवस सांगतात की देशाच्या फाळणीविषयी जिनांना कधी ना कधी अवश्य पश्चात्ताप झाला असेल. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करायचे असेल तर त्याचा केवळ एकमात्र मार्ग आहे - अखंड भारत.   


भारतीय उपखंड त्या वाईट दिवसाला विसरू शकत नाही, ज्या दिवशी या भूमीचे विभाजन होऊन पाकिस्तान नावाचे पाप सहन करावे लागले. आजही आम्ही भारतीय तिरंगा फडकवताना पाकिस्तान नावाच्या  काट्याचा सल विसरू शकत नाही. त्यास मोहंमद अली जिना आणि त्यांचा पक्ष मुस्लिम लीग पूर्णपणे जबाबदार होते. काँग्रेसनेही त्यांच्यासमोर गुडघे टेकले, त्यामुळे त्यांना या ऐतिहासिक चुकीसाठी क्षमा करता येणार नाही.  जिनांनी ठरवले असते तर पाकिस्तान निर्माण झाले नसते. परंतु ते कट्टरवाद्यांत असे अडकले होते, की पाकिस्तानची निर्मिती अंतिम शर्त बनली. जिना राष्ट्रवादी असूनही लीगच्या कोंडाळ्यात  असे फसले होते, की त्यांच्यापासून सुटका करून घेणे अवघड होते. बाहेर ते कट्टरतावाद्यांसमोर लाचार होते तर घरात त्यांचीच मुलगी दीनाच्या प्रेमामुळे दु:खी होते. तिने पारसी युवक वाडियाशी विवाह करावा, हे जिना यांना नको होते. दीनाने नवल वाडियाशी लग्न केले. तीच दीना वयाच्या ९८ व्या वर्षी लंडनमध्ये स्थायिक झाली. नुकतेच २ नोव्हेंबर रोजी तिच्या निधनानंतर पुन्हा ही कहाणी लोकांना पुन्हा आठवली. जिनांनी धर्माच्या आधारावर पाकिस्तानची मागणी केली होती.  


आता त्यांच्या मुलीने गैरमुस्लिमाशी लग्न केले तर त्यांच्या मुस्लिम होण्यावरच अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे त्यांनी आपल्या पाकिस्तान प्रेमासाठी मुलीच्या प्रेमाचा त्याग केला. वडिलांच्या प्रेमाची चिंता न करता मुलीने पारसी असलेल्या नवल वाडियाला आपला जीवनसाथी बनवले. कारण स्वत: जिना यांनी एका पारसी युवती रती पेटिट हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे ते आपल्या मुलीला नैतिकदृष्ट्या कशाच्या आधारावर नकार देऊ शकले असते. दीनाच्या लग्नावर कट्टरवादी मुस्लिम शंभर प्रश्न विचारू शकले असते, परंतु त्यांना भारताचे दोन तुकडे करण्याची संधी मिळत होती, त्यामुळे त्यांच्यासमोर हे सर्व गौण होते. हिंदुस्थानात पाकिस्तान बनवून हिंदुत्वाच्या ठिकऱ्या उडवणे हे एकच त्यांचे स्वप्न होते.   


दीनाची आई रती (पेटिट) हिच्यावर जिनांचे असीम प्रेम होते. दीना नऊ वर्षांची असताना रतीचे निधन झाले. संबंधित घटना आणि त्याबरोबरच आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूमुळे ते खूपच दु:खी होते. त्यामुळे ते सर्वकाही सोडून लंडनमध्ये स्थायिक झाले. त्या दिवसांत दीना त्यांच्याजवळच होती. त्यांचे तिच्यावर असीम प्रेम होते. १९४८ मध्ये जिनांच्या मृत्यूनंतर त्या कराचीला आल्या. त्यानंतर त्या न्यूयार्कमध्ये स्थायिक झाल्या.  एकदा दीनाने म्हटले होते की, ‘नोव्हेंबर १९३३ मध्ये माझ्या वडिलांनी एच. सी. आर्मस्ट्राँग यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘कमाल अतातुर्क’ वाचले होते. त्यानंतर त्यांनी मलाही ते वाचण्याचा आग्रह केला’. ते प्रेमाने तिला ग्रेवुल्फ म्हणत असत. दीनालाही आपल्या आईप्रमाणे भटकंती आवडायची. जिना वेळेच्या अपव्ययाच्या कट्टर विरोधात होते. मात्र, त्यांनी आपल्या लाडक्या मुलीला कोठेही जाण्या-येण्यास रोखले नाही. त्या म्हणायच्या, माझे वडील नसते तर पाकिस्तानही नसते. पाकिस्तान बनण्यापूर्वीपर्यंत बाप - लेकीत संपर्क होता.  त्यांची अनेक पत्रे आजही सुरक्षित आहेत, जे वेळोवेळी जिना यांनी लिहिले होते. एका पत्रात तिने लिहिले आहे, आपण ज्याचे स्वप्न पाहिले ते सर्व आपण मिळवले, परंतु पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आपली खरी परीक्षा सुरू होईल. १९३४ मध्ये डाॅ. मोहंमद इक्बाल यांनी बोलावल्याने जिना पुन्हा भारतात परतले. त्या वेळी त्यांनी मुलीला तिच्या  आजी - आजोबांजवळ सोडले. १९३६ मध्ये त्यांनी तिला लंडनला बोलावले. जर असे झाले नसते तर दीना आणखी काही वेगळीच बनली असती.   


जेव्हा दीनाने पारसी धर्म स्वीकारला तेव्हा त्यांच्या जवळचे लोक नाराज झाले. भविष्यात दीनाने जे काही केले त्यासाठी वडिलांना जबाबदार धरता येणार नाही. त्यांची पत्नी रतनबाई हिने इस्लाम धर्म स्वीकारला, परंतु आपल्या मुलीच्या पतीने इस्लाम स्वीकारला नाही, याचे दु:ख जिना यांना होते. मुलीने इस्लामचे अध्ययन करावे आणि त्याचे अनुयायी बनावे, असे त्यांना वाटत होते.  यासाठी त्यांनी फातिमा जिना यांनाही आग्रह केला होता. आता एकीकडे मुलगी होती तर दुसरीकडे पाकिस्तान आंदोलन होते. हेक्टर बोलिथो यांनी आपल्या जगप्रसिद्ध पुस्तक ‘स्टोर आॅफ जिना’मध्ये मोठ्या विस्ताराने या स्थितीचे वर्णन केले आहे. फातिमा जिनाही देशाच्या स्वातंत्र्य आणि आपल्या भावाच्या कामात मदत करण्यात तल्लीन होत्या. त्यामुळे दीनाला तिच्या आजोळी पाठवावे लागले. जेथे तिला संपूर्णपणे पारसी वातावरण लाभले.  दीनावर पारसी वातावरणाचा प्रभाव पडला याला जिना यांची व्यग्रता कारणीभूत आहे.   


आपली मुलगी एका पारसी तरुणाच्या प्रेमात पडली आहे, हे कळल्यावर  जिना यांच्यावर आभाळ कोसळले.  त्यांना माहिती होते की, इस्लामच्या नावावर भारत तोडणारे आपल्या मुलीला  गैरमुस्लिमाच्या हाती जाण्यापासून रोखू शकले नाहीत, हा आरोप ठेवला जाईल.  अशा व्यक्तीला आता इस्लामच्या हिताविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे? जिना यांनी दीनाला समजावण्याचे काम मौलाना शौकत अली यांच्यावर सोपवले. परंतु तेही अपयशी ठरले. जेव्हा जिना यांनी आपल्या मुलीला म्हटले, की भारतात हजारो शिक्षित चांगले मुसलमान मुले आहेत, तू त्यांच्याशी का लग्न करत नाहीस ? तेव्हा मुलीने बापाला उत्तर दिले, भारतात लाखो सुंदर आणि सुशिक्षित मुली होत्या तर आपण जीवनसाथी म्हणून एका पारसी मुलीला का निवडले? त्यांचे उत्तर होते, तिने लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु मुलगी विचलित झाली नाही. शेवटी बाप - लेकीत अंतर पडले. त्यांनी मुलीशी सर्व प्रकारचे व्यवहार आणि नातेसंबंध तोडले. जर मुलीचे जिनांना त्यांच्या वाढदिवसाला पत्र आले तर ते उत्तरात लिहायचे ‘श्रीमती वाडिया आपला खूप खूप आभारी आहे.’  त्या वेळी काही मुसलमानांनी हा प्रश्नही उचलला की ज्यांच्या मुलीने इस्लाम सोडले आहे त्यांना इस्लामच्या नावावर देश बनवण्याचा काय अधिकार आहे? त्यानंतरही भारतीय उपखंडातील मुसलमानांचे जिना यांच्यावरील प्रेम कायम राहिले. एका मोठ्या संख्येने मुस्लिम फाळणीच्या बाजूने राहिल्याने शेवटी जिना यांच्या नेतृत्वाखाली मागणी करणाऱ्यांना पाकिस्तान मिळाले आणि दुर्दैवाने भारताची फाळणी झाली.  


जिनांच्या निधनावेळी १९४८ मध्ये दीना पाकिस्तानात आल्या होत्या. त्यानंतर त्या न्यूयार्कला परतल्या. दीना यांच्यानुसार त्यांची आपल्या वडिलांशी १९४६ मध्ये मुंबईत शेवटची भेट झाली होती. वडिलांनी त्यांना चहासाठी आमंत्रित केले होते. त्या वेळी त्यांची मुलगी पाच वर्षांची, तर मुलगा नसली दोन वर्षांचा होता. मृत्यूच्या काही वर्षांआधी दीना यांनी जीना हाऊससाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या वेळी दीनाने म्हटले होते, की ज्या घरात माझा जन्म झाला, तेथे काही काळ व्यतीत करू इच्छिते. पाकिस्तान सरकारने ठरवले असते तर दीनाला खूप काही देऊ शकले असते, परंतु ना सरकारने दिले, ना दीनाने काही मागितले. २००४ मध्ये दीनाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी म्हटले, मी आपल्या वडिलांचा पाकिस्तान पाहण्यासाठी माझ्या परिवारासह पाकिस्तानात आले आहे. दीना जेव्हा आपल्या वडिलांच्या कबरीवर गेल्या तेव्हा म्हटले होते, मला एकटीला सोडा,  येथे मला एकांत हवा आहे. तेथे अभ्यागतांसाठी ठेवलेल्या अभिप्राय पुस्तकात दीनाने लिहले, हा माझ्यासाठी दु:खद दिवस आहे -  त्यांचे स्वप्न पूर्ण करा. त्यांचे स्वप्न पूर्ण करा. कोणी काहीही न म्हणता मागील सत्य आणि ते दिवस सांगतात की देशाच्या फाळणीविषयी जिनांना कधी ना कधी अवश्य पश्चात्ताप झाला असेल. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करायचे असेल तर त्याचा केवळ एकमात्र मार्ग आहे - अखंड भारत.

- मुजफ्फर हुसैन, ज्येष्ठ पत्रकार

बातम्या आणखी आहेत...