आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात लवकरच प्रिंटेड अवयवांचे प्रत्याराेपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी साधारणपणे १ लाख २० हजार अवयवांचे प्रत्याराेपण केले जाते; ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाण किडनीचे असते. बहुतेक वेळा अवयव दाता हा जिवंत असताे, परंतु उपयुक्त दाता मिळाला नाही तर अवयव उपलब्ध हाेण्यास मर्यादा येते. त्यामुळे प्रत्याराेपणाच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण दगावतात. यासंदर्भात संशाेधक अभ्यास करत असून मानवी अवयवांचे प्रत्याराेपण कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करत अाहेत.

संशाेधकांच्या मते यासंदर्भात मानवी अवयवांचे थ्रीडी प्रिटिंग हा उपयुक्त अाणि चांगला मार्ग ठरू शकताे. थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने अनेक वस्तूंची निर्मिती करण्यात यश अाले अाहे. त्यामुळे शरीराच्या अवयवांचे थ्रीडी प्रिंटिंग करता येऊ शकणार नाही, असे शक्यच नाही. खरे तर अशा स्वरूपाच्या बायाे प्रिंटिंगचे प्रयाेग हाेत अाहेत. अाैषधींच्या परीक्षणासाठी बायाे प्रिंटेड पेशींचा वापर केला जात अाहे. प्रत्याराेपित केल्या जाणाऱ्या पेशी काही वर्षातच तयार हाेतील.

सन २००० मध्ये बायाे प्रिंटिंगची सुरूवात झाली तेव्हा लक्षात अाले की, जिवंत काेशिकांना धक्का न लावता इंजेक्ट प्रिंटरशिवाय ते पाठवता येऊ शकतात. अाज अनेक प्रिंटर्सचा वापर करून काेशिकांपासून जिवंत अाणि सक्रिय पेशी बनवल्या जात अाहेत. काही संशाेधक किडनी, यकृत, यकृताच्या पेशी, त्वचा, हाडे अाणि शारीरिक अवयवांना जिवंत ठेवण्यासाठी अावश्यक नस, रक्तवाहिन्यांच्या जाळ्यावर प्रयाेग करत अाहेत. त्यांनी जनावरांमध्ये प्रिंटेड कान, हाडे, अाणि मांसपेशींचे राेपण केले अाहे.

 मागच्या वर्षी नाॅर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, शिकागाेने उंदरामध्ये प्रिंटेड अंडाशयाचे राेपण केले हाेते. या कृत्रिम अवयवाच्या मदतीने उंदरांनी गर्भधारणा केली, पिल्ले जन्माला घातली.

चीनमधील चेंगडू येथील सिचुअान रेबाेटेक या बायाेटेक्नाॅलाॅजी कंपनीने माकडामध्ये प्रिंटेड धमनी राेपित केली. मानवी शरीरात वापर करण्याच्या दृष्टिकाेनातून सुरू असलेल्या चाचणीचे हे पहिले पाऊल ठरावे. सॅन दिएगाेमधील अार्गनाेव्हाे या फर्मने उंदरामध्ये मानवी यकृताच्या प्रिंटेड पेशींचे प्रत्याराेपण केले. अमेरिकेतील जाॅन्सन अंॅड जाॅन्सन या कंपनीने बायाेप्रिंटिंगवर काही विशेषज्ञ अाणि बायाे टेक्नाॅलाॅजी फर्मसाेबत करार केले अाहेत.

फ्रान्समधील काॅस्मेटिक फर्म लाॅरियल, अमेरिकी कंझ्युमर गुड्स कंपनी प्राॅक्टर अंॅड गॅम्बल अाणि केमिकल कंपनी बीएएसएफ मानवी त्वचेच्या प्रिंटिंगवर काम करत अाहेत. लाॅरियल  जुन्या तंत्राचा वापर करून दरवर्षी पाच चौरस मीटर त्वचेची निर्मिती करते. प्रिंटेड त्वचेचा उपयाेग भाजलेल्या अाणि अल्सरने खराब झालेल्या त्वचेला बदलण्यासाठी हाेऊ शकताे.
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
बातम्या आणखी आहेत...