आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये महिला व पुरुषांचे वेतन जाहीर करणे बंधनकारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाच्या ठिकाणी महिलाही पुरुषांप्रमाणे काम करत असतील तर त्यांचे वेतन समान हवे. मात्र साधारणत: असे चित्र दिसत नाही. ब्रिटनमध्ये यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नव्या नियमानुसार नोकरी देणाऱ्या कंपन्यांवर अशी बंधने घालण्यात आली आहेत. तेथील सर्व मोठ्या कंपन्यांना पुरुषांना मिळणारे एकूण वेतन आणि महिलांना मिळणारे वेतन याची सविस्तर माहिती जाहीर करावी लागेल. २५० हून अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कंपन्यांना हा नियम लागू असेल. विशेष म्हणजे ही माहिती कंपन्यांना आपापल्या वेबसाइटवर जाहीर करावी लागेल व त्याची एक प्रत सरकारला पाठवायची आहे. 
 
महिला व समानता खात्याच्या मंत्री जस्टिन ग्रीनिंग म्हणाल्या की, महिलांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी मदत करण्यासोबतच अधिक क्षमताधिष्ठित बनवणे आवश्यक आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल. तसेच ब्रिटिश बिझनेस कम्युनिटीसाठी लाभ होईल.  ब्रिटिश कायद्यातही नोकरदार महिला व पुरुषांना समान वेतन देण्याची तरतूद आहे. मात्र लिंगगुणोत्तराचा परिणाम वेतनावरही दिसून येतो. ब्रिटिश राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयानुसार, १९९७ मध्ये पे गॅप (महिला व पुरुषांच्या वेतनातील फरक) २७.५ टक्के होते, तर २०१६ मध्ये ते १८.१ एवढे होते. म्हणजेच हा फरक कमी होण्याची गती अत्यंत कमी आहे.  
© The New York Times
- एमी सेंग, कंपनी व्यवहारांचे तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...