आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांशिक हल्ल्यास ट्रम्प प्रशासन दाेषी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा लाेकांसमाेर संकट उभे ठाकते तेव्हा  दुर्दैवाने ते मानवीय प्रवृत्तीच्या अाहारी जातात. अर्थातच स्वत:चा बचाव करू लागतात अाणि इतरांना त्या संकट किंवा समस्येला जबाबदार ठरवून माेकळे हाेतात. कन्सासमध्येे झालेल्या गाेळीबारानंतर अाणखी एका भारतीयाची हत्या झाली तसेच अन्य एका भारतीय शीख तरुणास जखमी करण्यात अाले. या घटना गंभीर स्वरूपाच्याच अाहेत, मात्र नव्या नाहीत. यापूर्वीदेखील दक्षिण अाशियाई लाेकांवर असे हिंसक हल्ले झालेले अाहेत. काेणत्याही माेठ्या समाजात धर्म किंवा वंशाच्या अाधारावर पूर्वग्रह बाळगणारे लाेक असतात. डाेनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनाला पूर्णत: या घटनांसाठी दाेषी ठरवणे अाणि त्याच्या मूळ कारणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजेे अपरिपक्वता ठरेल. 

बंदूक बाळगण्याविषयीचा चुकीचा कायदा वांशिक तेढ वाढीस लावणाऱ्यांकडून हाेणाऱ्या अशा दुस्साहसी हल्ल्यांचे मूळ कारण अाहे. तथापि, हल्ल्यांचे केंद्र ठरणाऱ्या विविध देशांतून अालेल्या समूहांनीदेखील काळजी घेतली पाहिजे. विशेषत: तिथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी काळजी घेतली पाहिजे. जर काेणी उचकवत असेल तर संघर्ष टाळून तिथून निघून गेले पाहिजे. अापणास मातृभाषेत बाेलायला अावडते, मात्र तेदेखील चुकीचे ठरू शकते, म्हणूनच इंग्रजीत संभाषण केलेले अधिक चांगले. 

अर्थात अमेरिकेसारख्या स्वतंत्र लाेकशाहीत बहुसंख्य लाेकांना वंशवाद अाणि कट्टरतेशी संघर्ष करावा लागत अाहे, हे खेदजनक अाहे. कारण बहुतेक लाेक त्याचे समर्थन करीत नाहीत. विमानतळांवरील बाॅम्बवरून अाम्ही काेणी खिल्ली उडवत नाही, उलट त्याविषयीची सूचना गांभीर्याने घेताे. अमेरिकेतदेखील स्थिती अशीच अाहे. कारण सावधगिरी बाळगण्यातच खरी हुशारी अाहे. खरी गरज तणाव कमी करण्याची अाहे. चिथावणी देणे किंवा संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न टाळून तणाव कमी करता येऊ शकताे.
- अपूूर्व गाैर, २२, अायअायटी, रुरकी
बातम्या आणखी आहेत...