सत्या नाडेला.
मायक्रोसॉफ्टची ओळख आतापर्यंत बिल गेट्स यांच्या नावाने होत असायची. कंपनीच्या यशात त्यांच्याशिवाय अनेक व्यक्तींचा सहभाग आहे. परंतु बिल गेट्स यांनाच सर्वाधिक श्रेय दिले जात होते. कंपनीत त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी सापडणे अशक्य वाटत होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर सत्या नाडेला यांचे नाव कंपनीसमोर आले. त्यांनी
आपल्या आयुष्याची दोन दशके मायक्रोसॉफ्टसाठी दिली आहेत. अॅपल आणि
गुगलशी असलेल्या स्पर्धेपुढे मायक्रोसॉफ्ट टिकाव धरू शकणार नाही, असेच सर्वांना वाटत होते. परंतु नाडेला यांनी या शंका निराधार ठरवल्या. त्यांनी आपले सर्व लक्ष तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनावर केंद्रित केले आहे. त्यांच्या विनम्र स्वभावामुळेच कंपनीच्या प्रत्येक कर्मचा-या त नाडेलांबद्दल आदराची भावना आहे.
कंपनीची प्रतिमा पुन्हा उजळ करण्याचे आणि तिला पूर्वीपेक्षाही अधिक सक्षम बनवण्याचे ४७ वर्षीय नाडेला यांचे ध्येय आहे. मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांच्या होलोलेन्स या नव्या प्रकल्पास त्यांनी मान्यता दिली आहे. तथापि, खुद्द संशोधकांनाच नाडेला हा प्रकल्प मंजूर करतील की नाही, याबद्दल शंका होती. काही दिवसांपूर्वी रेडमेंड (वॉशिंग्टन)
व्हिजिटर सेंटरच्या तळघरात नाडेलांसोबत कोणासोबत तरी एक गुप्त बैठक झाली. ते कंपनीचे हार्डवेअर गुरू समजले जाणारे टोड होल्मदेल होते. त्यांनी नाडेला यांना कंपनीचा सिक्रेट प्रोजेक्ट होलोलेन्सची माहिती दिली होती. १०० हून अधिक लोकांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन त्यावर काम केले. सुरुवातीला नाडेला यांनाही याची माहिती नव्हती. हे कंपनीचे नवे संशोधन होते. यात कोणतीही व्यक्ती आपल्या डाेळ्यासमोर व्हर्च्युअल लँडस्केप आणि नॅचरल वर्ल्डची दृश्ये पाहू शकते. पीसी तसेच स्मार्टफोनप्रमाणे कंझ्युमर टेक्नॉलॉजीच्या दिशेने हे एकमेव आणि आश्चर्यकारक उत्पादन असेल, असा ठाम विश्वास हे तयार करणा-या टीम लीडरना वाटतो.
होलोलेन्सच्या टीमला आपल्या यशाची खात्री होती. मात्र कॉस्ट कटिंगच्या मुद्द्यावर नाडेला हा प्रकल्प रद्द करण्याची भीती टीमला वाटत होती. परंतु असे काही घडलेच नाही. त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यास मंजुरी दिली. हार्डवेअर गुरू होल्मदेल यांनी ही माहिती त्यांच्या टीमला दिली तेव्हा त्यांच्या आनंदास पारावार उरला नाही. त्यांनी म्हटले, आम्ही प्रॉडक्टच्या नव्या कॅटेगरीकडे जात आहोत. या संशोधनामुळे कंपनीला नवी ओळख मिळेल. कारण युजर फ्रेंडली तंत्रज्ञानावर आधारित आहे. यावर कंपनीची जोमदार वाटचाल अवलंबून आहे. मायक्रोसॉफ्टला ओळखणाऱ्य तज्ज्ञांनाही वाटते की, या कंपनीने जगाला अनेक चांगली संशोधने दिली आहेत. अॅपलने अजून आयफोन लाँचही केले नव्हते, त्याआधीच मायक्रोसॉफ्टने स्मार्टफाेनचे सॉफ्टवेअर बनवले होते. अॅपल आयवॉच येण्याच्या दहा वर्षे आधी मायक्रोसॉफ्ट ने घड्याळात काॅम्प्युटर प्रोग्रॅमिंग तयार केले होते. होलोलेन्सवर प्रतिक्रिया देणा-या ंनी म्हटले की, ही नाडेला यांचीच कल्पना आहे. कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या परिषदेत याचा उल्लेख होणार आहे. या परिषदेत कंपनी आपल्या व स्वतंत्र सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससोबत संबंध अधिक दृढ करणार आहे. तेथे कोणत्याही अॅपला अॅपलचे आयओएस, गुगलच्या अँड्राइड तसेच मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्लॅटफाॅर्मसाठी कन्व्हर्ट करून देईल अशा सॉफ्टवेअरवर तेथे चर्चा होईल. मायक्रोसॉफ्टचे हे तंत्रज्ञान युजरला आणखी जवळ आणेल.
सत्या नाडेला यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, कंपनी मागील चुकांपासून बरेच काही शिकली आहे. शिस्तीच्या कार्यशैलीमुळे कोणतेही प्रॉडक्ट चांगलेच तयार होते. हार्डवेअर असो वा सॉफ्टवेअर किंवा ऑनलाइन ही कामे परस्पर सामजंस्यानेच होतात. त्यांनी सांगितले, अॅपलने आपल्या कुशल अनुभवापेक्षाही खूप चांगली कामगिरी केली हे आम्हाला शिकले पाहिजे. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. मायक्रोसॉफ्टकडे अंतर्गत सहा प्रणाली असून त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला मॅनेज करतात. नाडेला प्रत्येक व्यक्तीस त्याचा वापर करण्यास सांगतात. यात इंटर्नल टूल्स आहेत. त्यामुळे कंपनीची उत्पादने दर्जेदार होतात. कंपनीत अंतर्गत बदल करण्यासाठी प्रॉडक्ट इंजिनिअर्ससमवेत त्यांनी काम करावे, असे नाडेला यांनी रिसर्च ग्रुपला सांगितले आहे. हीच कंपनीची खरी ताकद आहे. अशा प्रकारे एक चांगले उत्पादन तयार होऊ शकते.
सत्या नाडेला खूप विनम्र आहेत. त्यांच्या आधीचे प्रमुख बाल्मर खूप रागीट स्वभावाचे होते. एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यंानी आयफोनची हेटाळणी केली होती. मायक्रोसॉफ्टची टीकाकार कंपनी सेल्सफोर्स डॉट कॉमचे प्रमुख मार्क बेनिओफ यांनी म्हटले, बाल्मरच्या अहंकारानेच त्यांना संपवले. तथापि, नाडेला यांच्या विनम्र स्वभावामुळे मी मायक्रोसॉफ्टसोबत साॅफ्टवेअर इंट्रिगेशनचा करार केला. नाडेला खुल्या विचारांचे असून लोकांसोबत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. कंपनीचे शेअर त्यांच्या येण्याने ४० टक्क्यांनी वधारले आहेत. गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत ही सर्वात जास्त वाढ आहे. होलोलेन्ससारख्या नवीन उत्पादनाच्या संशोधनामुळे कंपनी पुन्हा आपली ओळख कायम करेल.
© The New York Times