आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयॉर्क टाइम्समधून: महिन्यात २.३ लाख नोक-या; पण बेरोजगारीची समस्या कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी नोक-यांत सुधारणा दिसून येते आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असल्याने ही महत्त्वपूर्ण घटना आहे. तेथे एप्रिल महिन्यात २ लाख २३ हजार नव्या जागा भरण्यात आल्या आहेत. हा चांगला संकेत आहे. ही सुधारणा होऊनही बेरोजगारीच्या दरात लोकांना आणि विशेषत: बराक ओबामा यांना याची चिंता सतावते आहे. तो ५.४ इतका असून आर्थिक अंदाज वर्तवणा-यांनी तो आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली होती. आता असे मानले जात आहे की, जून महिन्यात बेरोजगारीच्या दरात घसरण होईल. परंतु याची कारणे अनेक आहेत त्या आधारे सप्टेंबर महिन्यात परिस्थिती सुधारेल असे म्हटले जात आहे.
एका महिन्यात नोकरीची इतकी मोठी आकडेवारी कामगार विभागाने दिली आहे. तथापि असेही म्हटले आहे की, पगाराच्या परिस्थितीत मोठी वाढ दिसून येत नाही. आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे कंपन्या या प्रश्नाकडे लक्ष देईनाशा झाल्या आहेत, तरीही त्यांच्या नफ्यात वाढ होते आहे, अशी टीकाही केली जात आहे.
रॉयल बँक आॅफ स्कॉटलंडचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ गॉय बर्जर यांनी म्हटले आहे की, आम्हाला पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्च महिन्यात सुधारणा होण्याची अपेक्षा होती, परंतु ते आता शक्य होते आहे. असे असूनही वेतन प्रणालीत सुधारणा दिसून येत नाही. नोक-या वाढल्या म्हणजे तरुणांना साधारण प्रमोशन मिळते आहे. पगारात चांगली वाढ होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. बेरोजगारीचे प्रमाणही कमी झाल्याने अर्थतज्ज्ञ चांगली सुधारणा होत असल्याचे सांगतात. जर यात आणखी काही काळ लागला तर लोकांमध्ये निराशा पसरेल. याचा परिणाम राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होईल. यासंदर्भात कोणाकडेही लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी निवडणूक प्रचाराचा मुद्दा असणार नाही. डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकाळात नोकरीच्या संधी वाढण्याची आणि परदेशातून सैन्य माघारी बोलावण्याचे ठळक यश म्हटले जाते. तसेच रिपब्लिकन पक्षसुद्धा ओबामा यांचा जनाधार कमी होत चालला असल्याचा मुद्दा बनवत आहेत. अमेरिकी राजकारणात कंझर्व्हेटिव्ह टीकाकार बराक ओबामाच्या अार्थिक धोरणांना टीकेचे लक्ष बनवत आहेत. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी ओबामा यांनी कोणतीही योजना आखली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ओबामा यांच्या निर्णयामुळे केवळ काॅर्पोरेट क्षेत्राला फायदा होतो आहे. कंपनीला मिळणा-या फायद्यात कामगारांचे मोठे योगदान असते. प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. रिसर्च फर्म कॅपिटल इकॉनाॅमिक्सचे प्रमुख अर्थतज्ज्ञ पॉल अॅशवार्थ यांनी सांगितले, जून महिन्यात परिस्थितीत सुधारणा होईल तेव्हाच सप्टेंबरपासून निश्चितपणे याचा परिणाम दिसून येईल. अर्थतज्ज्ञ बर्जर यांनीसुद्धा यास सहमती दर्शवली. ते म्हणाले, अशा प्रकारे नोक-यांत वाढ होत गेली तर बँकिंग स्तरावर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल याच आशेवर अनेक देश डोळे लावून बसले आहेत. जर सुधारणांचा वेग असाच कायम राहिला तर अार्थिक वातावरण बदलण्याची शक्यता आहे.
अर्थतज्ज्ञ बर्जर यांनी ठामपणे सांगितले की, वेतनप्रणालीत सुधारणा होईल. असा दावा कोणी करू शकत नाही. तरीही वेतनप्रणाली बदलेल असे मला वाटते. कारण स्पर्धेच्या युगात कंपन्यांची मनमानी चालणार नाही. खालच्या स्तरावर मजुरीत वाढ झाली तर त्याचा परिणाम महागाईवर होईल. यामुळे कंपन्यांवर वेतनप्रणालीत सुधारणाा करण्यासाठी दबाव वाढतो आहे. कारण अमेरिकेत मतदार आणि नेते या दोघांमध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे.
© The New York Times