आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयॉर्क टाइम्समधून:पाण्याचा पुनर्वापर कसा करावा, हे अमेरिकेकडून शिकावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी ज्या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लँट लावण्यात आलेले आहेत, त्या भागास वॉटर ड्रिस्ट्रिक्ट म्हटले जाते. आॅरेंज काउंटीमध्ये वॉटर डिस्ट्रिक्टचे जनरल मॅनेजर माइक मार्क्स यांनी सांगितले, त्यांच्याकडे जितके गढूळ किंवा खराब पाणी जमा होते, ते शुद्ध होऊनच बाहेर पडते. जर १०० गॅलन पाणी येत असेल, तर ४५ मिनिटांनंतर त्या पाण्याची कपमध्ये घेऊन तपासणी होते. फिल्टरिंगच्या वेगवेगळ्या चाचणीतून गेल्यानंतर ते पाणी पिण्यायोग्य बनवले जाते.

कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळ पडल्यानंतर गव्हर्नर जॅरी ब्राऊन यांनी पाण्याच्या वापरांसाठी कडक नियम लागू केले. पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी काही प्रस्ताव दिले आहेत. ते एकतर वादग्रस्त आहेत किंवा खूप खर्चिक आहेत. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. हा खूप खर्चिक आहे. तरी तेथे पाण्याचा पुनर्वापर होतोच आहे. तेथील शहरात सिंचनासाठी वांग्याच्या रंगाच्या पाइपलाइन्स आहेत. या पाण्याचा वापर गोल्फ कोर्स, प्राणिसंग्रहालय आणि शेतासाठी केला जातो. वेस्ट बेसिन म्युनिसिपल वॉटर डिस्ट्रिक्ट प्लँटमधून लॉस एंजलिससह १७ शहरांत ५ प्रकारचा डिझायनर पाणीपुरवठा होते. अनेक वर्षांपासून त्यांचा विविध श्रेणींत वापर केला जातो.

पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणा-या संघटनांनी बाथरूम, शॉवर, टब आणि वॉशिंग मशीनमधून निघालेले गढूळ पाणी वाचवावे, असे अावाहन केले आहे. या राज्यात पुनर्वापराचे पाणी पिणा-यांची संख्याही काही कमी नाही! पाण्याचे संवर्धन करणा-या तज्ज्ञांनी १९९० मध्ये सॅन दिएगो आणि लॉस एंजलिस येथे केलेले प्रयत्न यशस्वी ठरले, असे सांगितले. तेव्हा या ठिकाणी ३४० कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला.

ऑरेंज काउंटीमध्ये २००८ मध्ये खास जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्यात आला. आज अनेक घरांत पुनर्वापरासाठीचे पाणी भूमिगत असलेल्या प्लँटमध्ये पाठवून तेथून नैसर्गिक पाणीपुरवठा केला जातो. प्लँटचे जनरल मॅनेजर माइक मार्क्स यांनी सांगितले, त्यांचा प्लँट २९८० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला आहे. आता तेथे दररोज १० कोटी गॅलन पाणी शुद्ध केले जाते. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे.
टेक्साससह देशातील अनेक शहरांत शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या लाइन्स घराच्या मुख्य लाइनशी जोडल्या आहेत. सॅन दिएगोच्या सिटी कौन्सिलने १८ हजार कोटी रुपये खर्चून शुद्ध पाण्याचा प्रकल्प निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २०२५ पर्यंत शहराच्या मोठ्या परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. लॉस एंजलिसमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रकल्पाबरोबरच पाऊस आणि पुराचे पाणी नैसर्गिकरीत्या भूमिगत प्रकल्पात पोहोचवले जाते. शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख मार्टी अॅडम्स यांनी सांगितले, २००० साल आणि आताच्या परिस्थितीत फरक इतकाच आहे की, आज प्रत्येक जण वॉटर ट्रीटमेंट प्रकल्प लावण्याच्या तयारीत आहे. कारण वाया जाणा-या पाण्याचा पुनर्वापर करणे आमच्यासाठी गरजेचे बनले आहे. युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये पाण्याचा पुनर्वापर विषयातील प्राध्यापक जॉर्ज चोबानोग्लोस यांनी सांगितले, सुरुवातीला आम्ही खराब पाण्याकडे फारसे लक्ष देत नव्हतो, परंतु ती आज आमची गरज बनली आहे. जर त्यावर प्रक्रिया केली, तर ते पाणी पुन्हा शुद्ध होईल. आज नदीच्या किनारी राहणारा प्रत्येक माणूस नैसर्गिकरीत्या पुनर्वापर केलेले पाणी पितो आहे. जर्नल जजमेंट अँड डिसिजन मेकिंगच्या अहवालानुसार १३ टक्के वयस्क व्यक्तींना पुनर्वापराचे पाणी घेणे आवडत नाही. युनिव्हर्सिटी आॅफ पेन्सिल्व्हानियाचे प्राध्यापक पॉल रोजिन यांनी सांगितले, हे प्रमाण खूप कमी आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणा-यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून जास्त आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑरेगनचे प्राध्यापक पॉल स्लोविक यांच्या मते, प्रक्रिया केलेले पाण्याचा वापर न करणारे सक्षम आहेत; परंतु पुनर्वापर केलेल्या पाण्याचे मार्केटिंग करणे हीसुद्धा एक समस्या अाहे, तरी पॅकबंद बाटलीतील पाण्यापेक्षा अधिक शुद्ध पाणी ऑरेंज काउंटीमध्ये तयार होते. त्यांनी यावर केलेल्या संशोधनात म्हटले आहे की, लोकांना पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे फायदे सांगणे गरजेचे आहे. यामुळे लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. संकट काळात माणूस आवडत नसलेल्या गोष्टीशी तडजोड करत असतो. इतकेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर केला जातो. येथे अंतराळयात्रींना श्वास घेताना, घाम आणि टॉयलेटमध्ये असलेल्या थंड वातावरणही उपकरण शोषून घेते आणि त्यापासून शुद्ध पाणी तयार केले जाते. २०१० मध्ये येथे कार्यरत असलेले कमांडर जनरल डग्लस व्हिलॉक यांनी सांगितले, मी सहा महिने असे पाणी प्यालो आहे. ते खरोखरच चांगले होते.
© The New York Times