आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयॉर्क टाइम्समधून: स्पोर्ट्स बेटिंग आणि काल्पनिक खेळातील काळी बाजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जून २०१२ दोन कारणांमुळे असामान्य आणि लक्षात ठेवावा असा आहे. इंटरनेटवर चालणाऱ्या बेटिंग कारभारातील २ कोटी ३१ लाख रुपयांनी भरलेली बॅग घेणारी महिला सामान्य निश्चितच नाही.जॉय टॉमचिन नाव असलेली ही व्यक्ती न्यूयॉर्क इस्टेट डेव्हलपर आहे. प्रमुख समलैंगिक अधिकारासाठी लढणाऱ्या समूहाची मोठी कार्यकर्ता आहे. तिने कोट्यवधी रुपये राजकीय उमेदवारांना दान केले आहेत. मागच्या महिन्यात तिनेच २ कोटी २१ लाख रुपयांची बॅग दुसऱ्या व्यक्तीकडून घेतली. या दोन्ही प्रकरणांबाबत टॉमचीन यांनी, त्यांनी हे पैसे त्यांच्या भावाकडून घेतल्याचे सांगितले. पण फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार या पैशातून ऑनलाइन बेटिंग केले जात असून त्याला आळा घालण्यात अपयश येत आहे. आधी इतर काही करणारे लोकही यात सामील झाले आहेत.
संघनिवडीचे काम संकेतस्थळ चालवणारे करतात. विशेष म्हणजे हे खेळ काल्पनिक असतात. हे खेळ खेळून कोणीही मिलियन डॉलर कमावू शकतो, असा दावा करण्यात येतो. रोज यात स्पर्धा होतात आणि लाखो डॉलरची बक्षिसे दिली जातात. २००६ मध्ये अमेरिकन संसदेतील कनिष्ठ सभागृहात काँग्रेसने याला थांबवण्याचे प्रयत्न केले होते. हे गुन्हेगारी वर्तुळ कसेही करून संपवा असे फिर्यादी पक्षाला सांगण्यात आले होते. तेव्हा एक कायदाही मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मध्यरात्री इंटरनेटवर खेळला जाणारा हा खेळ अनियंत्रित झाला आहे. यामुळे महाविद्यालय आणि व्यावसायिक खेळांच्या एकात्मतेला तडे जात आहेत. ती कायम ठेवण्यासाठी ऑनलाइन व्यवसाय थांबवावा लागेल. तेव्हापासून आतापर्यंत फिर्यादी पक्ष, एफबीआय वा पोलिसांनी हा अवैध व्यवसाय थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासणीत आढळून आले आहे. केवळ ऑनलाइन पैसे हस्तांतरणावर अवलंबून नसल्यामुळे कायद्याने याला पायबंद घालता येत नाही. या धंद्याची आपली स्वत:ची बँकिंग सिस्टिम आहे. लाखो डॉलर पेपरबॅग, कार, मिनीट्रक, कॅसिनो चिप आणि मनी लाँडरिंगच्या अन्य माध्यमातून पैसे पोहोचवले जात आहेत. महाविद्यालयात शिकणाऱ्या ब्रायस मॉरोचे उदाहरण घ्या. आपण काल्पनिक खेळात बेटिंग करून कायदेशीररीत्या सहाआकडी रोख जिंकल्याचे तो अभिमानाने सांगतो. त्याच्या मते हे कायदेशीर तर अमेरिकी सरकारच्या मते बेकायदा आहे. ब्रायस म्हणतो, ही गुंतवणूक आहे. नवे खेळाडू जोडण्यासाठी माझा पोर्टफोलिओ मी सतत बदलत असतो. रोज नवा संघ जुळवण्यात आपले कितीतरी तास वाया जातात, हे तो मान्य करताे. त्याच्या अभ्यासावर याचा वाईट परिणाम होतो. अमेरिकेतील तरुण वर्ग वाईट पद्धतीने या दुष्टचक्रात फसला आहे.
या अवैध धंद्याला कसा आळा घालावा ही अमेरिकी संसदेसमोरील मोठी समस्या आहे. तरुण जुगारी मोठ्या संख्येने बेसावधपणे इंटरनेटच्या माध्यमातून रोज हजारो डाॅलरचे बेटिंग करीत आहे. संकेतस्थळ चालवणारे कर्मचारी कशा प्रकारे आकर्षित करून त्यांचा फायदा करीत आहेत, याचा तपासही सरकारी यंत्रणा लावू शकत नाही. अमेरिकेत कॅसिनो आणि अन्य ठिकाणी जुगाराला कायदेशीर मान्यता आहे. अशात खेळात बेटिंगला कशा प्रकारे मान्यता द्यावी, हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. मान्यता द्यायची नसेल तर कोणत्या उपायांद्वारे हा धंदा थांबवावा, यावरही वाद सुरू आहे. माफियाशी संबंध असलेल्या अनेक जुगारी टोळ्या बंद करून गुन्हेगारांना शिक्षा करणारे क्वीन डिस्ट्रिक्टचे अटाॅर्नी रिचर्ड ए. ब्राऊन यांनी, यात एकदा सामील झालेल्याला नेहमी धमक्या मिळतात, असा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे होणारा फायदा दुसऱ्या गुन्हेगारी कृत्यासाठी पायव्याचे काम करतो.
जुगाराविरुद्ध स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख अधिकारी मि. व्हाइट यांच्या मते अवैध बेटिंग आणि काल्पनिक खेळांचे बेटिंग यांची आपसात सरमिसळ होत आहे. अशात कोण कुठे पैसे लावत आहे हे ओळखणे कठीण आहे.
© The New York Times