आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्या नियोजनासाठी किती बचत करावी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांचे शिक्षण हा कुटुंबातील महत्त्वाचा विषय असतो. महागाई पाहता त्यासाठी किती आणि कसे पैसे जमा करावेत, याचे नियोजन करणे आवश्यक ठरते. तुम्ही कशा प्रकारची गुंतवणूक करू शकता आणि जोखीम कशी घेता यावर ते अवलंबून आहे.
राहुलकुमार यांचा मुलगा अर्णव एका पब्लिक स्कूलमध्ये जातो आहे. एक यशस्वी इंजिनिअर आणि मॅनेजमेंटची पदवी त्याने घेण्याची इच्छा राहुलकुमार बाळगून आहेत. अर्णवला शिक्षणासाठी पुरेसा पैसा मिळावा यासाठी त्यांनी कशा प्रकारे नियोजन केले, जाणून घेऊया-
गरज किती?
अर्णव आता ५ वर्षांचा आहे. ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेताना १८ वर्षांचा होईल. पीजीला त्याचे वय २२ असेल. याचा अर्थ राहुलकुमार यांना १५ ते १७ वर्षे पैसे जमा करावे लागतील. त्याला पदवी घेण्यासाठी १० लाख आणि पीजीसाठी १५ लाख रुपये तरी लागतील. महागाई ९ टक्क्यांनी वाढते आहे. याचा अर्थ अर्णवच्या शिक्षणासाठी ३० लाख ६५ हजार रुपये ग्रॅज्युएट करण्यासाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ६४ लाख ९१ हजार लागतील.

किती बचत करावी लागेल?
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूक करण्याचे त्यांनी ठरवले. एक तर मुदत ठेवी, पोस्टात गुंतवणूक, बाँड किंवा डायरेक्ट इक्विटी, रिअल इस्टेट इत्यादींमध्ये पैसे गुंतवू शकतात.

जोखीम पाहता तीन पर्याय पडताळून पाहावे लागतील. परतावा कसा मिळेल? दरमहा गुंतवणुकीच्या गरजा बदलत राहतील का? पैसे १० वर्षांहून अधिक काळासाठी गुंतवणार आहेत का? अशा प्रकारे वर्षाला परतावा खालीलप्रमाणे राहील.

- फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंटमध्ये कर कपातीनंतर गुंतवणुकीवर ७ टक्के परतावा असेल. यात राहुल यांचा कराचा स्लॅब २० टक्के इतका आहे.

- करकपातीनंतर इक्विटी एमएफमध्ये परतावा १४ टक्के इतका आहे. (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स इक्विटीवर शून्य आहे)
{ पहिला पर्याय - राहुल यांना भांडवली गुंतवणूक करणे जोखमीचे वाटते. यामुळे ते मुदत ठेवी, एनएससी इत्यादींमध्ये गुंतवणूक करू इच्छितात. जास्त जोखमीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कमी पैसे गुंतवतील. यामुळे ते लार्ज कॅप म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतील.
असे गृहीत धरूया की, ७५ टक्के पैसे मुदत ठेवीत आणि २५ टक्के इक्विटी म्युच्युअल फंडात लावतील. राहुलचा पोर्टफोलिओ त्यांना ८.७५ टक्के परतावा देईल. या पर्यायात त्यांना ग्रॅज्युएशनसाठी दरमहा १० हजार ६१४, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १३ हजार ९१२ रुपये बचत करावी लागेल.

- दुसरा पर्याय - नवा दृष्टिकोन (भांडवल वाचवून जास्तीचा पर्याय आणि कमी जोखीम)
जर राहुल जोखीम घेण्यास तयार असेल तर काही मर्यादेपर्यंत जोखीम असलेले गुंतवणूक करू इच्छितात. यासाठी फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंटसह राहुल डायव्हर्सिफाइड व बॅलन्स्ड इक्विटी फंडात पैसे लावू शकतात. जर अर्धी गुंतवणूक फिक्स्ड इन्कम आणि उर्वरित ५० टक्के इक्विटी एमएफमध्ये लावली, तर अशा स्थितीत राहुलना १०.५० टक्के इतका सरासरी परतावा मिळेल. ग्रॅज्युएशनसाठी दरमहा ९२७४.१२ पैसे, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ११,५६० रुपये बचत करावी लागेल.
- तिसरा पर्याय - वेगळा दृष्टिकोन (भांडवली बचत करण्यावर लक्ष अधिक आणि जोखीम जास्त)
राहुलकुमार जर जास्त जोखीम घेऊन भांडवल गुंतवत असतील तर २५ टक्के फिक्स्ड इन्कम आणि ७५ टक्के इक्विटी एमएफमध्ये. अशा परिस्थितीत त्यांना १२.२५ टक्के परतावा मिळेल. तिसऱ्या पर्यायात राहुलकुमार यांना ग्रॅज्युएशनसाठी ८०७३ रुपये आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ९५४८.२२ रुपये बचत करावी लागेल.

वस्तुस्थिती: इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशननुसार भारतात १४ लाख शाळा आणि ३५ हजार उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत.

लेखिका सेबीच्या अधिकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड आॅफ इंडियाच्या सदस्य.
बातम्या आणखी आहेत...