आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनामा पेपर्स लीकमुळे भ्रष्ट नेते, काॅर्पोरेट्स आणि लॉ फर्म यांची अभद्र युती उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅब्रियल जॅकमॅन सहा.  प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ  कॅलिफोर्निया - Divya Marathi
मॅब्रियल जॅकमॅन सहा. प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया
पनामा पेपर्स लीकमुळे भ्रष्ट नेते, काॅर्पोरेट्स आणि लॉ फर्म यांची अभद्र युती उघड
जगातील अनेक नामांकित व्यक्तींनी निनावी "शैल कंपन्यां'च्या माध्यमातून अमाप धनसंपत्ती लपवण्याचे काम केले. मात्र, काही रक्कम घेऊन असे काम करणारी पनामाची लॉ फर्म गोपनीयता प्रदान करते. त्यातून लाखो डॉलरची कायदेशीर बचत होते. यावर तज्ज्ञांची मते.

आर्थिक निर्बंध आणणे हाच एकमेव मार्ग
अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशात हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. ब्रिटिश व्हर्जिन आयलँड, पनामा आणि कॅमन आयलँडसारख्या ठिकाणी वित्तीय अनियमिततेतून व्यवसाय वाढवणाऱ्या कंपन्यांना रोखण्यासाठी निर्बंध आणणे हाच एकमेव कठोर उपाय आहे. या बेटावर जेव्हा व्यवसायच होणार नसेल, बाहेरील आर्थिक उलाढाली हाेणार नाहीत तेव्हा कुठे बेनामी शैल कंपन्यांचे काम बंद पडेल.

कर चुकवण्यासाठी स्वर्ग असलेल्या अशा बेटावर जर निर्बंध आणण्याबाबत निर्णय होत असेल तर ते कडक व्हायला हवेत. यात टुरिझम आणि टेरिफचा समावेश असावा. याद्वारे या बेटांचे उत्पन्न थांबवता येईल. बेनामी कंपनीच्या मालकांची ओळख पटल्यानंतर किंवा ज्यांना फायदा मिळत असेल त्यांचा पत्ता समजल्यानंतरच व्यवसायावरील निर्बंध हटवण्याची अट असेल. पनामासारख्या ठिकाणी ज्या पैशाचा वापर गुन्हेगारीसाठी होत असेल तर अशा आर्थिक उलाढाली का चालू देत आहोत? अमेरिकेत आर्थिक पारदर्शकता वाढली पाहिजे. या बेटावरील कंपन्यांचा पैसा न्यूयॉर्कमधील स्थावर मालमत्तेपासून बाँड-इक्विटी आणि युरोपपर्यंत गुंतवला जातो. निर्बंधामुळे हा कारभार रोखता येतो. यामुळे आर्थिक पारदर्शकता वाढेल. मनी लाँडरिंगला आळा बसेल. आणि दहशतवाद आणि गुन्हेगारीस आर्थिक मदत मिळणार नाही.
पुढे वाचा... कार्ड तयार करण्यापेक्षाही कंपनी चालू करणे सोपे