आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हा छळले गेले मुक्तिबोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे विडंबन "नदी में खडा कवि'मधून घेतले गेले आहे. यात शरद जोशी यांच्या रचनांचे संकलन आहे. जे त्यांची मुलगी नेहा शरद यांनी २०१२ मध्ये केले आहे. या रचनांमध्ये एका साहित्यिकाच्या मरणानंतर लोक आणि त्यांचे आपले जवळचे नातेवाईक वा स्नेह्यांसंबंधी काय काय करतात त्याचा उल्लेख आहे.

शरद जोशी, प्रसिद्ध विडंबनकार
(जन्म- २१ मे १९३१, निधन- ५ सप्टेंबर १९९१.)

मरण पावलेला कवी व्यवस्थेसाठी मोठा उपयोगी सिद्ध होतो आहे. जिवंतपणी तो ज्या व्यवस्थेवर टीका करत होता, खंगून-खंगून त्याने ज्याच्याविरुद्ध कविता लिहिल्या, विधाने केली, त्याच्या मरणानंतर तीच व्यवस्था त्या स्वर्गवासी कवीच्या नावाचा सहारा घेऊन बाजारातील गर्दीतून यश मिळवताना दिसते आहे. तर, कवी मरणानंतर अशा प्रकारच्या सर्व लोकांच्या मोठ्या कामाची वस्तू होऊन जातो. मेलेला हत्ती सव्वा लाखाचा असतो. जिवंतपणी मग भले त्या हत्तीने कधी सोंड वर केली नसेलही.

मरण पावलेला मुक्तिबोध, नरकयातनांच्या कष्टातून गुजरल्यानंतर आता स्वर्गवासी मुक्तिबोध, अजूनही मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक ध्वजावर लटकलेला दिसतो आहे. या ध्वजाखाली नेता, अधिकारी, लुंगेसुंगे नेते,रिकामटेकडे, भुरटे चोर, गुन्हेगार, तथाकथित बुद्धिजीवी, जनतेच्या करावर पॅरेसाइटप्रमाणे (परजीवी) सुख उपभोगणारे साहित्यिक एक-दुसऱ्याला मधुर कोपरखळ्या मारत, स्मितहास्य करत उभे आहेत. किती कामाची गोष्ट आहे ही मुक्तिबोध! त्यांचे नाव घेताच प्रतिभाहीन पीतप्रसिद्धीत रमणारे कवी डावे होण्याचे सुखासीन जीवन जगताहेत. त्याची समीक्षा करा अथवा आपल्या समीक्षेत त्यांचा उल्लेख टीकाकाराने करावा. तो यात एक जमिनी पकड असलेला टीकाकार सत्य समीक्षेने एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचतो. त्यांच्या रचनांचे संकलन केल्याने वा अंकात घेतल्याने आपणास संपादक म्हणवून घेण्याचा गौरवही मिळतो.

शिवाय पुरस्कार त्याचे आयोजन नातेवाइकांना सन्मानामुळे भेटणे, खाण्या-पिण्यासाठी एक महत्त्वाचा हक्काचा बहाणाही मिळतो. खरेच विचार करा किती आनंद देतो आहे माझा मरण पावलेला ऊर्फ स्वर्गवासी कवी मुक्तिबोध. ध्वजावर लटकलेला आज तो किती स्वार्थ आणि स्वार्थी सिद्धांतांना प्रतिष्ठा मिळवून देत आहे. बजेट फुंकण्याचा (वारेमाप खर्च करण्याचा) एक भावनात्मक बहाणाही देत आहे मुक्तिबोध. हे श्राद्ध- पक्षाच्या ब्राह्मणांनो, प्रत्येक लॉनवर दारू तुमची प्रतीक्षा करत आहे. तर्पण करा यजमानांनो, ओंजळभर पाण्याने भरभरून. जयजयकार करा त्या गेलेल्या कवीचा. पैसे फुंकण्याचे साहित्यिक अनुष्ठान मात्र सुरूच आहे. बंगल्याच्या बाहेरील तारेवर बसलेला कावळा आपल्या भिरभिरत्या नजरेने पाहत आहे. तो नजरेत म्हणतो तुम्हालाही मिळेल. अभयमुद्रेत हात उचलून म्हणतोय, सरकारी अश्वमेधाचा वाजपेयी पुरोहित - त्यामुळे सर्वांना मिळणार.

ध्वजावर लटकलेला मुक्तिबोध हे सर्व पाहतो आहे. संपूर्ण जीवन जणू एक चहाचा कप, विडीचे बंडल आणि कविता पूर्ण करण्याची आतुरतेने वाट मुक्तिबोध पाहत आहे. रुग्णालयात त्यांच्या बिछान्याजवळ वसुली करताहेत बाबू लोक. साहित्य, संस्कृती आणि सरकारचे हे बाबू लोक. जीवनभर तो हे समजावत राहिला की स्वार्थ, शोषण आणि व्यवस्थेच्या या मोठमोठ्या इमारतींखाली काही गल्ल्या आहेत, ज्या आपसात एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यातून लोक येत-जात असतात. आणि गुप्त सभा म्हणजे व्यवहाराच्या भेटीगाठी होतात. षड््यंत्र, कटकारस्थाने रचली जातात आणि त्याला अंतिम रूपही दिले जाते. मुक्तिबोध हे जाणत नव्हता की साहित्य आणि कलेच्या भवनाखालीही अशाच गल्ल्या (व्यवस्थेच्या) आहेत.

ज्या त्याच (म्हणजे वरील वर्णन) तंत्राने जोडल्या गेलेल्या आहेत. आता तो मेल्यानंतरही त्याच्या (मुक्तिबोध) नावाने या भ्रष्टाचाराच्या गल्ल्या पुन्हा जिवंत होणार आहेत. व्यवस्था आपला दरारा कायम ठेवण्यासाटी आणि यश लुटण्यासाठी त्याच्याच नावाचा उपयोग करून घेईल हे नक्की. बिचारे मुक्तिबोध हे जाणत नव्हते की, एक दिवस त्यांच्याच रक्ताने लिहिलेल्या त्यांच्याच रचना त्यांच्याच पत्नीला भेटून वर्तमानपत्रात छापण्यासाठी मात्र आपले स्वत:चे ताजे फोटो काढून छापवून आणेल ही व्यवस्था. जीवनभर जो माध्यमही बनू शकला नाही. तोच कवी मरणानंतर मात्र कसे माध्यम वा प्रसिद्धीच्या झोतात आला. लोकांनी छळलेला मुक्तिबोध आज वाईट पद्धतीने स्वार्थाने बरबटलेल्या या नकली, नाटकी जगात त्यांच्यावर एक न समजून येणारी अजब फिल्म बनवून खिशात रुपया टाकून परतून गेला एक फिल्मवाला आपल्या शहरातून. अमूर्ततेच्या आपल्याच बनवलेल्या मायाजालात फसलेला तथाकथित समजदार प्रेक्षक ते पाहून टाळ्या वाजवू लागतो. हे न समजून घेता की त्याचेही हात कठपुतळीच्या हातासारखेच आहेत. जे वरती बांधलेल्या दोराच्या नियंत्रणामुळे मजबुरीतून टाळ्या वाजवत आहेत.
तुम्हाला त्रासवले गेले मुक्तिबोध. आणि तुम्ही कसे छळले गेलात यावर फिल्मदेखील कधीही बनणार नाही. सर्वहारांच्या कवीला येणाऱ्या पिढ्या नकली सरकारी आयोजने आणि न समजणाऱ्या फिल्ममध्ये ओळखतील. मुक्तिबोध, तू दोन गटांमध्ये स्वत:च फसलाहेस. जसे तू स्वत: केलेल्या कवितेत लिहिलेले होतेस, तुझ्या मृतदेहावर चढून चोर व्यवस्थेतील लोक आपली उंची-प्रतिमा मात्र वाढवून गेले. तुझे शत्रू, तुझे मित्र.

तुला पाजलेल्या प्रत्येक चहाच्या स्मृतीला सरकारी काउंटरवर दारूची बाटली आणि क्रॉस्ड चेकमध्ये होरपळलेल्या त्या लोकांनी ज्यांच्याविषयी तू जन्मभर या भ्रमात राहिलास की ते तुझी कविता समजतात व जगतात. तू गेल्यानंतर मला चाहणारे, तुझ्या कवितांचे समजदारपणे अचूकपणे संपादन करणारे त्याच व्यवस्थेत अधिकारी, नेते झाले आणि तेच सर्वकाही करू लागले. खरे म्हणजे ज्यांच्या दहशतीमुळे तू कविता लिहिल्या होत्या, त्यांना तुझ्या कविता आणि तुझ्या नावाच्या उल्लेखाचा मोठा उपयोग झाला तुझ्या मरणानंतर. तू कुणाचे बळ वाढवले याचा तुलाही पत्ता नाही. कुणाला फायदा पोहोचला हे तुलाही माहीत नाही. ते तुला जाणतात की नाही ही गोष्टही मिथ्या आहे. मेला कमिटीला हे जाणून काय करायचे आहे की समाधी कुणाची आहे. त्यांना तर मंडप आणि माइकवाल्याच्या बिलातील कमिशनशी मतलब आहे. प्रत्येक कविता पूर्ण करून मुक्तिबोध, तुम्ही समजून सांगत होतात की, एक अंकुर फूटलाय. तो अंकुर आता ध्वज झाला आहे. कवी, ज्याला घेऊन तेच लोक शोभायात्रा काढत आहेत, ज्यांनी या जमिनीला उजाड बनवून टाकले आहे. ते पूर्ण लवाजम्यासह त्या अंकुरांना डोक्यावर घेऊन त्याच उजाड जमिनीवर बागडत नाचत आहेत. ते हे जाणतात की अंकुर (विचार)धोकादायक आहेत उजाड जमिनीसाठी, त्या रोपांच्या आपल्या उखडण्याच्या खोडीवर लोक आश्चर्यचकित होऊ शकतात. ते समीक्षेच्या भाषेत मंत्र म्हणत पूर्ण गाजावाजा आणि गडबड-गोंधळात त्या अंकुराला उखडून डोक्यावर घेऊन नाचत आहेत. हा आहे तो अंकुर-विचार जो बंदरात क्रांती आणेल. अंकुराचा म्हणजे विचारांचा कसा सन्मान होत आहे पाहा.

>तुम्ही फार वाईट छळले गेले मुक्तिबोध : जर का या नाटकी आणि सोनेरी आयोजनाने तुमचा आत्मा प्रसन्न होत असेल तर मी म्हणेन, तुमचा आत्मा मूर्ख आहे. हे सांगितल्याबद्दल मला माफ करा मुक्तिबोध!