आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत कायम राखता येईल का? (शेखर गुप्ता)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागल्या - मोदींच्या विजयाने जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.एखाद्या राष्ट्रास त्या नेत्यांच्या लोकप्रियतेवर किंवा त्यांच्या जागतिक प्रतिष्ठेवर स्वार होता येत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. वास्तव तर याविरुद्ध आहे.एखादा नेता जितका शक्तिशाली किंवा प्रतिष्ठित असतो, तितके ते राष्ट्रही असते.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत खूप काही लिहून आणि बोलून झाले आहे. अजूनही चर्चा चालूच आहे. अमेरिकी माध्यमे आणि लोकांमध्ये पोप हेच खरे स्टार आहेत. त्यानंतर काही अंतरावर चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा क्रमांक लागतो; परंतु मोदींनी केलेल्या वातावरणनिर्मितीमुळे हा दौरा संपूर्णपणे मैत्रीपूर्ण आणि वादापासून दूर राहिला. ग्लोबल सीईओंशी मुलाखत आणि सिलिकॉन व्हॅलीतील हायटेक कंपन्यांना दिलेल्या भेटीमुळे अत्याधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या अवतीभोवती निर्मित नव्या ब्रँड्सना भक्कम करण्यास मदत मिळाली.

आजपर्यंतच्या दौऱ्यात मोदींनी दोन महत्त्वाची कार्ये केली. एक, सुरक्षा परिषदेत सुधारणा आणि भारताला स्थायी सदस्यत्व केंद्रस्थानी ठेवून त्यांनी या दौऱ्यास राजकीय स्तरापेक्षाही वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले. माझ्यातील विश्लेषकाच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय पॅशन म्हणून या सदस्यत्वाला जागतिक व्यासपीठावर महत्त्वाचे पद या दृष्टीने पाहत आहोत. हे पद मिळाल्यानंतरही इतर जुन्या राष्ट्रांप्रमाणे नकाराधिकार (व्हेटो) मिळणार नाही, याची आपणास जाणीव नाही; परंतु भौगोलिक आणि घरातील वाद न्यूयॉर्कमधील सभेत आणण्यापेक्षा हे कधीही चांगले. दहशतवादी कारवायांना उत्तेजन देणे बंद करण्यास पाकिस्तानला सांगावे, अशी मनधरणी एकानंतर दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाकडे जाऊन करण्यापेक्षा नव्या जी-४ मध्ये शिंजो अॅबे, अँगेला मर्केल आणि डिल्मा रौसेफ यांच्यासमवेत ते खूप सन्मानजनक वाटतात.

दुसरे, आपल्या सहकारी जागतिक नेत्याशिवाय ग्लोबल सीईओंसोबत जास्त वेळ राहून त्यांनी पहिल्यांदा व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. जर अर्थशास्त्र म्हणजेच नवी कूटनीती आणि मुख्य व्यूहरचना करण्यात फायद्याचे असेल, तर मोदींनी या दिशेने जबरदस्त परिवर्तन केले आहे. आम्ही भारतीय नको तितका उत्साह दाखवतो. म्हणजे एकदा-दोनदा झटके बसूनही आपले अवसान गळून जाते. त्याचप्रमाणे आपण एका लहानशा चांगल्या वार्तेने किंवा यशाने हुरळून जातो. अगदी तसेच पंतप्रधानांना जागतिक नेत्यांत रॉकस्टार म्हणून प्रशस्तिपत्र देऊन टाकले. ते सेलिब्रिटी आहेत यात शंका नाही, पण त्यांचे महत्त्व आपल्या अनिवासी भारतीयांपुरतेच मर्यादित आहे, याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतो आहोत. इंदिरा गांधींनंतर जगात त्यांची ओळख बनलेले पहिले नेते आहेत, हे जरी खरे असले तरीही ज्या देशाचे महत्त्व जास्त, तितका नेता मोठा असतो. जागतिक स्तरावर भारत हा प्रमुख देश म्हणून पुढे आलेला आहे, असा गैरसमज आमच्या माध्यमात आणि अनिवासी भारतीयांत नसावा. यासाठी आपल्याला स्वदेशातच खूप मेहनत घेण्याची गरज आहे. कोणत्याही राष्ट्रास आणि त्याच्या नेत्यास जागतिक स्तरावर खरोखरच महत्त्व प्राप्त करून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर त्यास चीनसारखी प्रभावी आर्थिक शक्ती किंवा जर्मनीसारखा दबदबा असलेला देश बनावे लागेल. रशियासारखे स्ट्रॅटेजिक धोका किंवा दुसऱ्या बाजूने पाहायाचे ठरवले तर पाकिस्तानसारखा आंतरराष्ट्रीय डोकेदुखी ठरणारा देश (हे माझे नव्हे, तर मॅडलिन अल्ब्राइट यांचे वाक्य आहे) बनूनसुद्धा उद्दिष्टप्राप्ती करता येते. भारताची अर्थव्यवस्था वाढते आहे, तसेच त्याला चांगले भवितव्यही दिसून येते आहे; परंतु खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी आपली अर्थव्यवस्था आहे आणि विकासदराच्या बाबतीत आपण चीनलाही मागे टाकू शकतो, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. महाशक्तीच्या तुलनेत आपल्या अर्थव्यवस्थेचे आकारमानही लहान आहे आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण खूप खाली आहोत, या वास्तवाकडे डोळेझाक केली जात आहे. साधारणत: उर्वरित जगात आपली प्रगती आणि भवितव्याचे स्वागतच होते आहे; परंतु आज संपर्काचे वाढते महत्त्व आणि भारतावर लक्ष केंद्रित झाल्याने आपल्यातील त्रुटी ठळकपणे दिसून येत आहेत. यात असमानता, जातीयता, स्वच्छतेचा अभाव, हवेतील वाढते प्रदूषण, महिलांवरील वाढते अत्याचार आणि नव्याने ओढवून घेतलेली आपली बंधनातील संस्कृती यांचा समावेश आहे.

आम्ही भूतकाळात आपल्या नेत्यांना जागतिक प्रतिष्ठा प्राप्त होताना पाहिले आहे, त्याची कारणेही स्पष्ट आहेत. जवाहरलाल नेहरूंना त्यांची बुद्धिमत्ता, अनेक उत्तम ग्रंथांचे लेखक आणि स्वातंत्र्य चळवळीत असलेली त्यांची भूमिका यामुळे जागतिक दर्जा मिळालेलाच होता. परंतु भारत गरीब देश आहे, ज्यांनी शांततामय मार्गाने आंदोलने करून स्वातंत्र्य लढा उभारला, मग देशातील विविधतेला सामावून घेत उदार, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष घटनेची निर्मिती केली, यामुळे नेहरूंना महत्त्व प्राप्त झाले. चीनबरोबर १९६२ मध्ये हार पत्करल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान नेहरू यांच्याबरोबरच जगात भारताचा दर्जाही घटला. परंतु भारताची आर्थिक व सैन्याची ताकद तो दर्जा गाठू शकली नाही.

अशाच प्रकारे इंदिरा गांधी यांनाही नाम देशाच्या नेत्या म्हणून महत्त्व प्राप्त झाले होते. निक्सन-किसिंजर यांचा विरोध झुगारून बांगलादेश युद्धात यश प्राप्त केल्याने त्यांची जागतिक प्रतिष्ठा वाढली होती; परंतु पुन्हा १९७१ नंतर मुख्यत्वे डाव्या विचारसरणीकडे त्यांचा वाढता कल पाहून तसेच त्यांच्या विवेकशून्य आणि हेकेखोर निर्णयामुळे भारताची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. इंदिरा गांधी यांच्याकडे घृणेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. भारताचा इतिहास असा आहे की तो एक चकाकत्या अशा अद् भुत गोष्टीचे आश्वासन देतो; परंतु ते सत्याच्या कसोटीला उतरत नाहीत. १९९१ च्या सुधारणांनंतरही आर्थिक विकासदरात विस्फोट आणि २००० व २०१० दरम्यान खूप चांगल्या दशकानंतर काही तरी गोंधळ उडाला आणि राजकारण किंवा वैचारिक गोंधळ उडाला. हे दोन्ही सावरताना तोही हरवून गेला. तीस वर्षांनंतर लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळवून मोदींच्या विजयाने जगाच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. आता भारत पुन्हा अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करून जगाला निराश करू शकत नाही.
एखाद्या राष्ट्रास त्या नेत्यांच्या लोकप्रियतेवर किंवा त्यांच्या जागतिक प्रतिष्ठेवर स्वार होता येत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. वास्तव तर याविरुद्ध आहे. एखादा नेता जितका शक्तिशाली किंवा प्रतिष्ठित असतो, तितके ते राष्ट्रही असते. या कारणामुळेच मोदींना मायदेशी परतल्यानंतर खूप परिश्रम घेण्याची गरज आहे.
शेखर गुप्ता
प्रख्यात संपादक
Twitter @ShekharGupta