आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली वार्तापत्र: मृत्यूनंतरचे किळसवाणे राजकारण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाम अादमी पार्टीने १० लाख रुपयांची मदत िदल्यावर गजेंद्रची बहीण म्हणते, मी १० लाख रुपये देते तुमच्यापैकी काेणीतरी मरून दाखवा. िपकाच्या कारणावरून वडिलांशी झालेला वाद, िदल्लीला येणे डाेक्यात संताप ठेवून झाडावर चढणे फांदीवरून पाय घसरणे या घटनाक्रमाची िचकित्सा प्रसारमाध्यमांनी का केली नाही?
बुधवारी गजेंद्र िसंग या शेतकऱ्याने जंतरमंतरवर अायुष्याचाशेवट केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी अाहे. याचे काेणीही समर्थन करणार नाही. काेणासाेबतही असे घडू नये. मात्र, त्याच्या मृत्यूचे राजकारण्यांनी, िदल्ली पोलिस आणि प्रसारमाध्यमांनी जे राजकारण केले ते अत्यंत िनंदनीय अाहे. केवळ स्वार्थासाठी काेण कुठल्या पातळीवर उतरू शकताे. याचा प्रत्यय देणारी ही कृती अाहे. ही घटना घडली तेव्हा जंतरमंतरवर केवळ काही हजार लाेक उपस्थित हाेते. परंतु त्यानंतर पुढचे चार िदवस इडिएट बाॅक्सने जाे तमाशा केला ताे भयावह अाहे. देशातील काेट्यवधी लाेकांना वेगळे आणि ब्रेकिंग असे काहीतरी दाखवित असल्याचे भासविणे हा प्रकार कंबरेचे साेडून, डाेक्याला बांधण्याचा अाहे.
भूमी अधिग्रहण िवधेयकाचा िवराेध एकट्या अाम अादमी पार्टीने केला असे नाही. १९ एप्रिलला श्रीमंत असलेल्या काॅंग्रेसने रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन केले. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी भव्य शामियाना उभारण्यात अाला हाेता. लाखावर लाेक हे छताखाली हाेते. अन्य पक्षानींही या िवधेयकाची िनंदा करीत शेतकऱ्यांच्या िहताचा नसल्याची प्रखर टीकाही केली हाेती. जेव्हा जेव्हा या िवधेयकाच्या िवराेधात अन्य राजकीय पक्षाने अावाज उठवला तेव्हा भाजपच्या पाेटात दुखणे भरलेले िदसून येत हाेते. परंतु राजकारणाचा चांगला अनुभव असल्याने भाजप त्या पक्षांचे ताेंड बंद करण्यात अपयशी हाेत गेले. ज्यांनी अायुष्यात राजकारण केले नाही, चळवळीतून पुढे येत िदल्लीची सत्ता काबीज केली, त्या अाम अादमी पार्टीचे नशीब मात्र काही चांगले िदसत नाही. राजकारण कुठल्याही थराला जाऊ शकते त्याचे अनुभव िदल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यायला लागले अाहेत. भारतीय जनता पार्टीही अाम अादमी पार्टीला कसे अडकवता येईल याचाच प्रयत्न करीत असते आणि अनेकदा ते त्यात यशस्वी हाेतात. केवळ राजकारणाचे डावपेच माहिती नसल्याने हा प्रकार घडत अाहे. परंतु स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेस, भाजप आणि अन्य पक्षाने घाणेरडे राजकारण करून भ्रष्टाचार महागाई, श्रीमंत-गरीब, उद्याेगपती-कष्टकरी अशी जी फळी उभारली अाहे ती लाेकशाहीची लक्तरे टांगणारी अाहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अांदाेलनाच्या िनमित्ताने देशाला अाशेचा िकरण िदसायला लागला हाेता. गरीब माणूसही स्वाभिमानाने जगू शकेल असे िचत्र निर्माण झाले हाेते. अाम अादमी पार्टीचा उदय याच चळवळीतून झाला. उच्चविद्या िवभूिषत तरुणांनी सुराज्याची संकल्पना या व्यासपीठावर मांडली खरी, परंतु अापल्या अस्तित्वाला धक्का देत असल्याचे जाणवताच काॅंग्रेस-भाजप हे सामािजक तथा राजकीय चळवळीला संपविण्याचा संकल्प करीत अाहेत.
ज्यावेळी गजेंद्र झाडावर चढत हाेता तेव्हा पाेलिसही तिथे हाेते. प्रत्येक कृती ही त्या पोलिसांच्या आणि हजाराे लाेकांसमाेर हाेत हाेती. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी माेठ्या उत्साहाने त्याचे िचत्रण करण्यात गंुतले हाेते. काहींचे माेबाइल हे दृश्य िटपत हाेते. मात्र, काेणीही त्याला अडविले नाही. पोलिस त्याच्याकडे पाहून हसत हाेते. हे दृश्यही कॅमेरामध्ये कैद झाले अाहे. काेणालाही असे वाटले नाही की झाडावर चढणारा गजेंद्र हा अात्महत्या करेल. गजेंद्र झाडावर चढला, गळफास लावला आणि काही वेळाने फांदीवरून पाय घसरल्याने त्याच्या जीवनाचा शेवट झाला. अाम अादमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीतून त्याला रुग्णालयात नेले. त्याला मृत घोषित करण्यात अाले. ही संपूर्ण घटना केवळ २०-२५ मिनिटातील अाहे. गजेंद्रला मृत घोषित करण्यात अाल्यानंतर मात्र जे कॅमेरे शूटिंग करीत हाेते ते केजरीवालांच्या िवराेधात अाग अाेकायला लागले. भाजपचे कार्यकर्ते अवघ्या दहा मिनिटांमध्ये जंतरमंतरवर पाेहाेचले. सगळ्यांचा प्रश्न एकच खुनी काेण? मीडिया आणि भाजप केजरीवाल यांनाच दाेषी धरायला लागले. अाम अादमी पार्टी घटना घडू नये म्हणून आणि झाल्यानंतर काय करावे यासाठी याेग्य िनर्णय तातडीने घेऊ शकली नाही. त्याचे परिणाम ते भाेगताना गेले पाच िदवस हा देश पाहताे अाहे. केंद्र सरकारने यात खूप माेठे राजकारण केले. गृहमंत्री राजनाथ िसंग यांनी पोलिस किती बराेबर आणि अाम अादमी पार्टीचे कार्यकर्ते चुकीचे कसे वागले हे लाेकसभेत सांिगतले. जे माेदी भूमीअधिग्रहण िवधेयक केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या िहताचे अाहे, असे सांगतात त्यांच्याच सरकारकडून लाेकसभेत पाेलिसांची बाजू घेतली जाते ही बाब त्या शेतकऱ्याच्या अात्महत्येची िवटंबना करणारी अाहे. जे पोलिस घटनास्थळी हसताना आणि स्वत:च्या माेबाइलवर व्यस्त िदसतात त्यांनीच म्हणे माेठ्या धडपडीने गजेंद्रला रुग्णालयात दाखल केले. ज्या लाेकांनी वाहिन्यांवर ही घटना पाहिली त्यांनी राजनाथ िसंग किती चुकीची माहिती देतात हेसुद्धा स्पष्ट झाले अाहे.
केजरीवालांच्या घरापुढे भाजप आणि काॅंग्रेसचीही िनदर्शने झालीत. अरविंद केजरीवालांना या घटनेमुळे बरेच काही िशकायला िमळेल. परंतु एक िवचार डाेक्यात येताे गेल्या तीन महिन्यांत १२०० शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्यात. िवदर्भात सर्वाधिक झाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी िकती जणांसाठी दु:ख व्यक्त केले. िकती काॅंग्रेस-भाजपवाल्यांनी त्यांच्या घरापुढे िनदर्शने केलीत. िकती प्रसारमाध्यमांचे कॅमेरे अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घराकडे वळले. िकती जणांनी त्याचे वार्तांकन केले. खरे तर हे १२०० शेतकरी नापिकी, कर्जबाजारी, नैसर्गिक अापत्ती यामुळे अायुष्याला कंटाळले हाेते. यातील िकती जणांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये िमळाले? मुख्यमंत्री फडणवीस छातीठाेकपणे सांगत अाहेत की िपकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा झाली अाहे. अनेक शेतकऱ्यांना रक्कम िमळाली नाही. एकाच गावातील काहींना मदत िमळते आणि काहींना नाही हा भ्रष्टाचार लवकरच बाहेर येण्याचे संकेत अाहेत. सधन शेतकऱ्यांच्या शेतात दाेन-तीन िवहिरी आणि घर बांधायला याेजनेतून पैसेही िमळाले अाहेत, परंतु अनेक शेतकऱ्यांना सरकारची यंत्रणा ठेंगा दाखवते त्याचे काय? काेणतेही अधिकारी या कष्टकऱ्यांशी सन्मानाने वागत नाहीत त्याचे काय? या नैराश्यातून अात्महत्या हाेत अाहेत. याचे िचंतनही व्हायला पािहजे. गजेंद्र शहीद झाला यानिमित्ताने मूळ िवषयाकडे यावे. १२०० शेतकऱ्यांसारखी गजेंद्रची िस्थती हलाखीची नक्कीच नव्हती. त्याचे कुटुंबीय सांगतात त्यांच्याकडे दीड लाख रुपये हाेते.
अाम अादमी पार्टीने १० लाख रुपयांची मदत िदल्यावर गजेंद्रची बहीण म्हणते मी १० लाख रुपये देते तुमच्यापैकी काेणीतरी मरून दाखवा. गजेंद्र िवविध प्रकारचे फेटे बांधण्यात िनपुण हाेता. िपकाच्या कारणावरून वडिलांशी झालेला वाद, िदल्लीला येणे काहीसा डाेक्यात संताप ठेवून झाडावर चढणे आणि फांदीवरून पाय घसरणे या घटनाक्रमाची िचकित्सा प्रसारमाध्यमांनी का केली नाही? मात्र हे सगळेच अापचे पाप अाहे असे म्हणणे म्हणजे गलिच्छ राजकारणाचा कळस म्हणावा लागेल. माध्यमांनी केवळ केजरीवालांना अाराेपी करणे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र माेदी असते तर त्यांनी काय केले असते हे दाखवणे यामागचे गूढ केवळ प्रकाश वाहिन्यांच्या प्रमुखांना माहिती असेल!